अनवती

Submitted by सई गs सई on 30 September, 2013 - 06:48

धुंद उभारी उसासे कोवळे.. घट्ट मिठी, ह्रदय पाणी जसे
निःश्वास सोडले दीर्घ कधी.. कधी जीवाला क्षुद्र दिलासे

लाजिरवाणे तर कधी लाजरे.. धीट कधी, कधी वेंधळे हसे
डोळा भेटी जिवा गाठी पडती.. म्हणे मोकळे रे सोड जरासे

का उभारला भयान पट हा.. गरजांची बुळबुळ, स्वप्नं रुसे
ईश्वरतेचे अन् जातीधर्माचे.. नाटक सगळे जगी विलासे

नश्वरतेने सहज सोपे केले.. माझे इवलेसे जगणे असे
शरीरमनाच्या ओढीला देवू.. उगा कशाला व्यर्थ खुलासे

येईल कशी पापण्यांना नीज.. पुन्हा स्वप्नं आज नवे दिसे
मज हाकेला प्रतिसाद जसा.. सुगंध तुझा वाऱ्यासवे येतसे

- सई

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई , फॉर्म छान, आशय जरा विस्कळीत वाटला. जावेद अख्तर यांची एक सुरेख कविता आहे या बांधणीत.

भारती,
अगदी अगदी! मलाही आशय विस्कळीतच वाटलाय इथे. पण असली duality हीच त्यातली सल असल्याने राहू दिली कविता तशीच. आणि हो, कवी लोकं असा काही फॉर्म वापरतात हे माहीत नव्हतं, मी आपलं ओळीला ओळ जोडण्यासाठी वापरला.. जमुन आलाय म्हणायचं थोडाफार अन् काय! Happy

Thanks नेत्रा! आयुष्यात एकतरी गझल लिहीता यावी अशी माझी इच्छा आहे.. तिकडे झुकत चाललिय कविता म्हणजे शक्यता आहे म्हणायची! Happy