बाहुलीचे लग्न मी लावीत आहे.....

Submitted by जयदीप. on 29 September, 2013 - 14:19

रात्र होणारच तुला, माहीत आहे
घास मी बाबा तुझा, तोडीत आहे

आज मी बागेत धडपडलेच ना रे
ये नं तू, मी औषधे ना पीत आहे

झोपले की प्रेम तू करतोस ना रे
मी तुला दिवसा घरी शोधीत आहे

गोष्ट ती रविवारची छोट्या परीची
रोज मी आईस समजावीत आहे

बाहुलीचे लाड तू करतोस ना रे
बाहुलीचे लग्न मी लावीत आहे..

मूळ रचना:
रात्र होणारच तुला, माहीत आहे
घास मी बाबा तुझा, तोडीत आहे

आज मी बागेत धडपडलेच ना रे
तू हवा, मी औषधे ना पीत आहे

झोपले की प्रेम तू करतोस ना रे
मी तुला दिवसा खरी शोधीत आहे

गोष्ट ती रविवारची छोट्या परीची
रोज आईलाच समजावीत आहे

बाहुलीचे लाड तू करतोस ना रे
बाहुलीचे लग्न मी लावीत आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात्र होणारच तुला, माहीत आहे
घास मी बाबा तुझा, तोडीत आहे

झोपले की प्रेम तू करतोस ना रे
मी तुला दिवसा खरी शोधीत आहे

गोष्ट ती रविवारची छोट्या परीची
रोज आईलाच समजावीत आहे

बाहुलीचे लाड तू करतोस ना रे
बाहुलीचे लग्न मी लावीत आहे..<<<

खयालांतील नावीन्य थक्क करणारे! पुन्हा वाचायला हवी.

बाहुलीचे लाड तू करतोस ना रे
बाहुलीचे लग्न मी लावीत आहे..

छान.
रचनेला दु:खाची किनार जाणवली.
विचारांतली सफाई येता-येता येईलच.
शुभेच्छा.

भुषणजी , समीरजी...खूप खूप आभार.

अजून तितकी सफाई, शब्दांची निवड मला जमत नाही आहे.
प्रयत्न चालू आहेत.
वैभवजींच्या भाषेत..' मंत्र' मला खरोखर जमत नाही आहेत.
पण तुमच्या सगळ्यांचे वाचून शिक ण्याचा प्रयत्न करतो आहे.

या शिकण्यातून मिळणारा आनंद अवर्णनिय आहे.

जमली रे जमली... आणि एकदम जबरदस्त जमली...
अगदी पहिल्या षटकातच चौकार जय भाऊ... आता षटकाराची वाट पाहत आहोत..
Happy
(य)

बाहुलीचे लाड तू करतोस ना रे
बाहुलीचे लग्न मी लावीत आहे..>>

मी तुझी बाहुली आहे आणि तू माझे लाड करतोस,
(तसेच मी माझ्या बाहुलीचे लाड करते)

आज मी माझ्या बाहुलीचे लग्न लावत आहे...
तुला सांगायचं कारण हे की...
( तुझ्याही बाहुलीला एक दिवस लग्न करून जायचं आहे)

हे मला इथे म्हणायचं होतं.

नाविन्य बाबत बेफीजी +१ विषय कमालीचेव हटके आहेत
सफाई बाबत समीरजी +१ हळू हळू येइल सफाई पयत्न सुरू ठेवा ...दिशा तरी बरोबर वाटते आहे तुम्ही निवडलेली आगे बढते रहो बस .....

शुभेच्छा