मुलासाठी मुलगी हवीच

Submitted by हेमंत पुराणिक on 28 September, 2013 - 12:35

हळद पिवळी लावुनी अंगा
बोहोल्यावरी मी आले
माप सांडुनी ऊंबरठ्यावरी
सून म्हणून मी नांदले

सासर माहेर दोन्ही माझी
बहु शिकले सवरलेले
गुण्या गोविंदात माझी मी
संसारात सुखावले

लोटले काही दिवस लग्ना
दिवस गेले मजला
सासू सासरे आई बाबा
लागले विचार करायला

आई बाबांना ध्यास लागला
मुलगीच झाली तर
सासू सासरे सांगू लागले
कुलदीपक हवा आम्हाला

नवरा माझा खात्री देतो
मुलगाच होणार तुजला
कुळासाठी कुलदीपक द्याया
मुलगीच लागते ना

सांगाल का हो कुणी मजला
मुलाने जन्म दिला मुलाला
मुलगा असो वा मुलगी असो ती
उदरी स्त्रीच्याच वाढणार ना

मुलगा झाला तर भाग्याची मी
मुलगी झाली तर करंटी का?
मुलगा असो वा मुलगी असू दे
जो तो येतो जन्माला

बदला आपुल्या मूर्ख विचारा
बदला आपुल्या संस्कृतीला
भेद नका कधी करु असा हा
हाच विचार देते तुम्हाला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेमंत,

कविता छान , विषय ही खूपच निवडक आहे.

छांगले लिहिता, माझ्याकडुपिपुढील लेखनास शुभेच्छा.

मूळ कुठले तुम्ही पुराणिक ?

नमस्ते.