Submitted by राजपुर on 28 September, 2013 - 08:31
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ कार्ल सगान ह्यांचे एक कोटेशन पाहिले, " आपण ( म्हणजे मनुष्य ), ह्या पृथ्वीवरचे एक बुद्धिमान प्राणी आहोत आणि आपली ही बुद्धिमत्ता आपल्याला आनंद देऊ करते ".
मला नाही वाटत, कारण ह्या आनंदाची व्याख्या आधी काय आहे हे महत्वाचे. आपले काय विचार आहेत ते ईथे लिहुन चर्चा करावी.
नमस्ते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
हे कशासंदर्भात आहे आणि त्याची
हे कशासंदर्भात आहे आणि त्याची पार्श्वभुमी काय आहे हे महत्त्वाचं.
कार्लचे म्हणणे हे भौतिक
कार्लचे म्हणणे हे भौतिक सुखालाच धरुन आहे हे निश्चित, कारण आधी भौतिक आणि अध्यात्मिक आनंद काय
ह्याचा त्याला अंदाज वा ओळख होती कि नाही हे माहिती नाही.
कारण माझ्या मते हे सर्व सुखे वा आनंद फक्त काही काळासाठीच असतात, चीरकाल टिकणार्या आनंदा बद्दल म्हणत आहे मी.
नमस्ते.
लोकांच्या ईच्छा, आकांक्षा,
लोकांच्या ईच्छा, आकांक्षा, महत्वकांक्षा यांची पुर्तता होणे म्हणजे आनंद. जीवनाचा खरा अर्थ आणि कारण म्हणजे आनंद. मानवाच्या अस्तित्वाचा स्त्रोत म्हणजे आनंद.
पण तरीही व्यक्तीपरत्वे आनंदाचा अर्थ वेगवेगळा आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टीत आनंद शोधत असतो. कुणी कामामध्ये, कुणी प्रेमात, कुणी कुटुंबाच्या धाग्यादोर्यात, मित्रपरिवारात, धर्मसंकल्पनांत. प्रत्येक व्यक्तीसाठी आनंद वेगळ्या गोष्टीत सामावलेला आहे.
मात्र एक गोष्ट मात्र नक्की की जर 'समाधानाची वॄत्ती'च नसेल तर कुठलीही भौतिक सुखे, मालमत्ता तुम्हाला आनंद देउ शकणार नाही.
>>कारण माझ्या मते हे सर्व
>>कारण माझ्या मते हे सर्व सुखे वा आनंद फक्त काही काळासाठीच असतात, चीरकाल टिकणार्या आनंदा बद्दल म्हणत आहे मी. <<
वाक्याचा पुर्वार्ध हा उत्तरार्धाशी विसंगत वाटत नाही का?
रमा, मात्र एक गोष्ट मात्र
रमा,
मात्र एक गोष्ट मात्र नक्की की जर 'समाधानाची वॄत्ती'च नसेल तर कुठलीही भौतिक सुखे, मालमत्ता तुम्हाला आनंद देउ शकणार नाही. > > >
फारच सुंदर प्रतिसाद, आभारी आहे इतकं छान लिहिल्याबद्दल. खरोखर छान वाटलं वाचुन,
---------------------
प्रकाश,
थोडे आणखीन स्पेसीफिक पणे सांगाल का ?
>>प्रकाश, थोडे आणखीन
>>प्रकाश,
थोडे आणखीन स्पेसीफिक पणे सांगाल का ?<<
मला अस म्हणायच आहे कि वाक्यात सुखे वा आनंद अल्पकाळ असतात असे म्हटले आहे. अस असेल तर चिरकाल टिकणारा आनंद ही संकल्पना स्वतःच्या पहिल्या गृहितकाशी विसंगत आहे.
मायबोलीवरचे काही धागे बघितले
मायबोलीवरचे काही धागे बघितले की मला कार्ल सेगनच्या hypothesis विषयीच शंका येते, अनुमान तर दूरची गोष्ट आहे.
चीरकाल टिकणार्या>>>> अजुन
चीरकाल टिकणार्या>>>> अजुन एखादी चिरकाल टिकणारी गोष्ट कोणी शोधुन काढली असेल असे वाटत नाही. प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षणी बद्लत असते असच मी समजत आलोय, अगदी सगळेजण. बाकि यातल काही कळत नाही.
पण वरचे काही / इतर हल्लीच्या धाग्यावरचे काही तत्वज्ञान वाचले कि असे वाटते कि " चिरकाल टीकणारा आनंद काही लोकांना नक्किच मिळालाय "
काहि लोक दु:खात देखिल आनंदी असतील का? काही लोक आनंदात देखिल दु:खी असतील काय?
दु:खात आनंद शोधत असतील का? तसेच आनंदात दु:ख शोधत असतील का? आनंद म्हणजे काय?, दु:ख म्हणजे काय ? हे माहित असेल काय?
त्यापुढे जाउन, बुद्धिमत्ता नसलेले लोक कायमच दु:खी असतील काय? अध्यात्मिक सुखाच्या मागे आयुष्यभर लागुन लोक दु:खी रहात असतील काय? दुसर्याचे भौतिक सुख बघुन अध्यात्मिक लोक दु:खी होत असतील काय?
चार पावले पाठी येउन, हे टायपताना मला दु:ख होतेय कि आनंद? छ्या छ्या अगदी परफेक्ट क्न्फ्युजन
प्रश्नशिरोमणी :निवांतः
कारण माझ्या मते हे सर्व सुखे
कारण माझ्या मते हे सर्व सुखे वा आनंद फक्त काही काळासाठीच असतात,
बरोबर, पण जेव्हढा वेळ टिकतात तेव्हढा वेळ आनंद देतात.
मात्र एक गोष्ट मात्र नक्की की जर 'समाधानाची वॄत्ती'च नसेल तर कुठलीही भौतिक सुखे, मालमत्ता तुम्हाला आनंद देउ शकणार नाही.
बरोबर. पण समाधानी होण्यापूर्वी स्वतःकडून जास्तीत जास्त प्रयत्न करून, ज्ञान, संपत्ति, व भौतिक सुखे वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. न च जमले तर मग समाधान मानावे.
समाधानी राहून शास्त्रज्ञांना नवीन शोध लावता आले नसते, रोगांवर औषधे निघाली नसती. स्वातंत्र्य मिळाले नसते, उच्च ज्ञानप्राप्ति, बुद्धीचा विकास हे काही होणार नाही. तेंव्हा प्रयत्न करणे, स्वतःची सर्व प्रकारे उन्नति करून घेण्याचे प्रयत्न करणे सुटणार नाही.
आनंद म्हणजे काय?, दु:ख म्हणजे काय ? हे माहित असेल काय? अ ओ, आता काय करायचं
हा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे. कित्येकांना शिकत रहाण्यात, श्रम करत रहाण्यात आनंद वाटतो, काहींना उद्दिष्ट साध्य होइस्तवर कशातच आनंद वाटत नाही. तुमचा आनंद कशात आहे हे माहित असेल, तो मिळवायचा कसा हे माहित असेल तर मिळू शकतो.
हा अत्यंत वैयक्तिक प्रश्न
हा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे. कित्येकांना शिकत रहाण्यात, श्रम करत रहाण्यात आनंद वाटतो, काहींना उद्दिष्ट साध्य होइस्तवर कशातच आनंद वाटत नाही. तुमचा आनंद कशात आहे हे माहित असेल, तो मिळवायचा कसा हे माहित असेल तर मिळू शकतो.>>> झक्कि काका तुमचा आय्डी बहुदा हॅक झालाय आणि त्यामुळे १० मि. खर्च करुन टायपलेले बरोबर दुर्लक्षित होणार
बरोबर दुर्लक्षित होणार होईना
बरोबर दुर्लक्षित होणार
होईना का! कुणि निंदा कुणि वंदा, लिहीणे हा आपला धंदा. मनातले विचार लिहून काढण्याने मला आनंद मिळतो, जर कुणाला दुखवतील असे विचार मनात येत असतील, तर लगेच लोक तिकडे माझे लक्ष वेधून घेतील, नि मी ते विचार मनातून काढून टाकीन. जसजसा राग, द्वेष, गर्व कमी होत जाईल तसतसा माझा आनंद आपोआप वाढतो
माझ्या मते कमी बुद्धि म्हणजे कमी आनंद असे काही नाही. आनंद, दु:ख दोन्ही केवळ कालसापेक्ष आहेत, बुद्धि असलेले नि नसलेले दोन्ही प्रकारचे लोक कधी आनंदी असतात कधी दु:खी. त्या आनंदाचे किंवा दु:खाचे
कारण कदाचित बुद्धीवर अवलंबून असेल. पण तो वेगळाच प्रश्न आहे.
खरे तर आनंद, मन, बुद्धि, संस्कार, शिक्षण, ज्ञान, कर्तव्य या सर्व गोष्टी एकत्र विचारात घेतल्या पाहिजेत.
या सर्वांचा एकमेकांशी काय संबंध आहे, त्यातून ऐहिक व पारमार्थिक सुख (म्हणजे काय हे, देव असला तर, त्यालाच माहित!) कसे मिळवावे या बद्दल गेल्या हजार वर्षात भरपूर लिहिण्यात आले आहे.
प्रश्नशिरोमणी :निवांतः
प्रश्नशिरोमणी :निवांतः
व्वा झकी, छान विचार आणि
व्वा झकी,
छान विचार आणि लिहिता ही छानच,
नमस्ते.
----------------------
निवांत,
एकदम !
उत्तरेण समाधानाय : सत्वर :
अतिशय सा धे वाक्य आहे. " आपण
अतिशय सा धे वाक्य आहे. " आपण ( म्हणजे मनुष्य ), ह्या पृथ्वीवरचे एक बुद्धिमान प्राणी आहोत आणि आपली ही बुद्धिमत्ता आपल्याला आनंद देऊ करते "
उदा. इतर प्राणी लि हु -वा चू श क त ना ही त. ते कविता, सा हि त्य ह्या आनंदा ना मुकता त. खेळ, पर्यटन, को डी सो ड व णे, वि नो द, चित्र निर्मिती अ शी अनेक उ दा ह र णे दे ता ये ती ल ज्या सा ठी बुद्धी ला ग ते आ णि त्या तू न आनंद मि ळ तो.
अजबराव, मनुष्य प्राणी हा
अजबराव,
मनुष्य प्राणी हा कुठल्याही गोष्टी सातत्याने न करणारा प्राणी आहे, त्याला कंटाळा फार लवकर येतो, ह्या आपण लिहिलेल्या गोष्टी त्याने शोधुन काढलेला विरंगुळा म्हणु शकता.
त्यात आनंद कसा येणार ?
मला वाटते, आजकाल कुठलीहि गोष्ट करतांना मनुष्य त्रस्त अथवा कंटाळलेला जास्त असतो.
आपणच शोधुन काढलेल्या गोष्टी तो जास्त एंजॉय करु शकत नाही, त्याला नित्य नविन प्रकार हवे असतात.
कैक पट गोष्टी ज्या त्याने बुद्धिमत्ता वापरुन बनविल्या वा शोधल्या त्यात जास्तीत जास्त गोष्टी त्याला अंती काळजी, दु:ख, मानसिक तणाव हे जास्त देतात. नाही ?