भोग..

Submitted by रमा. on 27 September, 2013 - 02:43

प्रेम हे मजला मिळाले भरभरूनी,
द्यावया कोणास ते उरणार नाही

हुंदके जरी दाटले माझ्या उराशी,
नयन परी अश्रूंनी भरणार नाही

सोसण्याचा छंद ना मजला तरी,
भोग हा भाग्यातला सरणार नाही

आहेत माझीही गिर्‍हाणे सांगावयाला,
मांडावयाचा खेळ मी करणार नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहेत माझीही गिर्‍हाणे सांगावयाला,
मांडावयाचा खेळ मी करणार नाही.... >>>> मस्त

आवडली कविता.

गिर्‍हाणे -

गार्‍हाणी म्हणायचे आहे की ग्रहणे?

गिर्‍हाण हा शब्द ग्रहणचा अपभ्रंश आहे(उदा. दे दान सुटे गिर्‍हाण) खरे म्हणजे पण ओळींतल्या आशयानुसार गार्‍हाणी म्हणायचे आहे असे दिसत आहे.

विजयजी, 'गार्‍हाणे' च म्हणायचे आहे, फक्त, गिर्‍हाणे जरा नीट मीटर मध्ये बसते असं वाटून ते घातले.. Happy