हाय! गझलेचे हवे जय श्वास आता!

Submitted by जयदीप. on 26 September, 2013 - 15:44

व्हायचे होऊन गेले भास आता
शोधतो जोतो स्वत:ची रास आता

घ्यायचे घेऊन गेले लोक सारे
मागतो मी जे हवे सर्रास आता

मिरवणे त्यांचेच घोडे फार झाले
तोडतो माझे लगामच, बास आता!

वादळाची चूक झाली, मज गिळाया
शोधते तेही चवीचे घास आता

लागले लागायचे जे दीप सारे
हाय! गझलेचे हवे जय श्वास आता!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. व्रुत्त : मंजुघोषा
२. रदीफ : आता
३. काफिये : रास, बास, घास...
४. अलामत 'आ'

तंत्रात बसली आहे असं वाटल्याने गझल मध्ये टाकली आहे.
बाकी तज्ञ सांगतीलच.

मंत्राचं माहित नाही...

वैभवजी...वाट बघतो...