कधी वाटे ...

Submitted by मी मी on 26 September, 2013 - 14:02

कधी वाटे आसमंत माझाच आहे सारा
हे गंध, हे रंग अन सळसळता वारा
ओढून घ्यावे सारे ओंजळीत भरावे
गार गार गारा आणि पावसाच्या धारा .....

कधी वाटे एकटंच भटकत जावं
कधी फुल तर कधी फुलपाखरू व्हावं
मनातला पिसारा मनसोक्त पसरून
मोर होऊन आकाशी निर्भय विहरावं

कधी कधी वाटतं उगाच रागवावं
खळीच्या गालांना नखरयात फुगवावं
आपण करतो न रोज काळजी सर्वांची
आपल्यालाही कोणी लाडात वागवावं

कधी कधी मन विषन्न होतं
जगाच्या कायद्यापासून भिन्न होतं
रोजचेच जगणे, अन अविरत धावणे
नको नको म्हणता सर्व सुन्न होतं

नको नको म्हणता सर्व सुन्न होतं !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

Thnx Happy