प्रार्थना

Submitted by सई गs सई on 23 September, 2013 - 12:44

हा पदर तो पदर
उसवलेले धागे..
कसलीशी मुकाट
दाबलेली सल..
ऊन सावल्यांचे
भलावण कवडसे..
अंगावरून सरकून
गेलेले रानवारे..
फुलांचे धीट इशारे
वाटांचे धुमारे..
सारे सारे स्मरू दे..
बोटांचे वेडे छंद
अन् लाघव बटांचे..
साठलेले विसर
विसरलेले आठव..
सारे सारे झरू दे..
पुन्हा रे वितळू दे
पाणी नितळू दे..

- सई

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि हो, तिच्या लाघवी बटांना कुरवाळण्याचा त्याच्या बोटांना लागलेला छंद.. ही माझी पर्सनल फेवरेट छटा बरं का! Wink त्या दोन ओळींतून ते कितपत व्यक्त झालंय याबद्दल मला शंका आहे म्हणून सांगावसं वाटलं, बाकी काय.

छान.