साहित्य आणि कलाकृती पाठवण्याविषयी सूचना आणि नियम

Submitted by संपादक on 23 September, 2013 - 02:27

हितगुज दिवाळी अंक २०१३

bullet 2_0.jpgलेखन पाठवण्यासाठी सूचना आणि नियमbullet 2_0.jpg

१. आपले साहित्य आम्हांला या दुव्यावर पाठवा.

२. दिवाळी अंकासाठी पाठवायचे साहित्य दिलेल्या तारखेला पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारा वाजेपर्यंत संपादक मंडळाकडे पोहोचायला हवे.

कृपया नोंद घ्या:
साहित्य पाठवण्याची मुदत आता २० ऑक्टोबर, २०१३पर्यंत वाढवण्यात आली आहे.

३. दिवाळी अंकासाठी स्वलिखित आणि संपूर्णपणे अप्रकाशित साहित्य पाठवावे. साहित्य सॉफ्टकॉपीमध्ये आणि देवनागरी लिपीतच पाठवावे. देवनागरीत नसलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही. तसेच मायबोलीकर नसलेल्या कोणाकडून विशेष साहित्य आणले असल्यास ते दिवाळी अंकासाठी पाठवणार्या मायबोलीकराने देवनागरीकरण करून सॉफ्टकॉपीमध्ये पाठवावे. हे लेखन युनिकोडमध्येच केलेले असावे. पीडीएफ फाइल शक्यतो पाठवू नये.

४. साहित्य पाठवताना ते शक्यतो व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या नियमांत बसेल असे पाहावे. 'मराठी साहित्य महामंडळ'-प्रणीत व शासनमान्य मराठी लेखन-नियमावली येथे वाचावयास मिळेल.

५. साहित्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार संपादक मंडळ राखून ठेवत आहे. साहित्य नाकारण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण देण्यास संपादक मंडळ बांधील नाही. याबाबत संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.

६. आपल्या दिवाळी अंकात याही वर्षी काही साहित्यकृतींसोबत रेखाटने असतीलच. रेखाटन समिती आणि संपादक मंडळ रेखाटनासाठी साहित्य निवडण्याबाबतचा निर्णय घेतील आणि तो अंतिम असेल.

७. दिवाळी अंकात आपली मायबोलीवरची ओळख प्रसिद्ध व्हावी की आपले खरे नाव हे तुम्हीच ठरवायचे आहे. साहित्य पाठवताना ते कृपया नमूद करावे. तसेच आपले नाव प्रसिद्ध करायचे असेल तर ते आपल्याला जसे प्रसिद्ध व्हावे असे वाटत असेल, तसे कळवावे. उदाहरणार्थ, पूर्ण नाव की फक्त नाव की नाव आणि आडनाव.

८. साहित्य मिळाल्याची व स्वीकारल्याची पोच शक्य होईल तशी पाठवली जाईलच.

bullet 2_0.jpgदृक्श्राव्य विभागासाठी कलाकृती पाठवण्याविषयी सूचना आणि नियमbullet 2_0.jpg

१. दृक्श्राव्य विभागासाठीच्या कलाकृती आम्हांला sampadak@maayboli.com येथे पाठवा.

२. आपली कलाकृती कुठेही पूर्वप्रकाशित झालेली नसावी. ध्वनिफितींची (audio) व चित्रफितींची (video) संपूर्ण निर्मिती (चित्रीकरण, संकलन, ध्वनिमुद्रण इ.) प्रकाशनास योग्य असणे, ही सादरकर्त्या मायबोलीकराची जबाबदारी आहे. यावर मायबोलीचं संस्करण (दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ व मायबोलीचा लोगो घालणे) संपादक करतील.

३. चित्रफितीचा आकार 2GBपेक्षा जास्त नसावा.

४. ध्वनिमुद्रण वा चित्रफीत यांतलं संगीत प्रताधिकारमुक्त असावं. अधिकृत पूर्वपरवानगी घेतलेली असेल तर तसा स्पष्ट उल्लेख केलेला असावा.

५. ध्वनिमुद्रणं व चित्रफिती आपण http://www.yousendit.com या संकेतस्थळावर अपलोड करू शकता. (या साईटवर डाव्या बाजूला Send a File Try it now असे लिहिलेले आढळेल. पाठवणार्याचा पत्ता वरती आणि त्याच्या खाली संपादकांचा पत्ता (sampadak@maayboli.com) लिहावा. नंतर योग्य ती फाईल अपलोड करून SEND ITची कळ दाबावी.)

६. चित्रफीत अपलोड करताना फितीचा आकार कमी करण्यासाठी winzip अथवा winrar यांपैकी एका सॉफ्टवेअरचा उपयोग करू शकता. तसंच कमी आकाराच्या दुसर्या एखाद्या फॉर्मॅटचाही वापर करता येईल. चित्रीकरण केल्यानंतर Camtasia Studio, Adobe Premier यांसारखे सॉफ्टवेअर वापरून, अगोदर संकलन करून नंतर फितींमध्ये आवाज घालू शकता. यामुळे चित्रफिती अधिक देखण्या होतील. ही सॉफ्टवेअरं आंतरजालावर मोफत उपलब्ध आहेत.

७. आपल्या कलाकृती संपादक मंडळाकडे दिनांक ११ ऑक्टोबर २०१३पर्यंत [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारा वाजेपर्यंत] पोहोचायला हव्यात.

८. या चित्रफिती आपण www.youtube.com वर upload करणार आहोत, याची नोंद घ्यावी. याविषयीची अधिक माहिती http://www.google.com/support/youtube/bin/topic.py?hl=en&topic=16560 इथे मिळू शकेल.

९. ध्वनिमुद्रणं व चित्रफिती यांचा दिवाळी अंकात समावेश करायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल.


bullet 2_0.jpgप्रताधिकारांबद्दल घ्यायची काळजी bullet 2_0.jpg

१. लेखात चित्रं व / किंवा प्रकाशचित्रं वापरली असल्यास प्रकाशचित्रांचं / चित्रांचं श्रेय आणि प्रताधिकार यांचा उल्लेख कृपया करावा. ही चित्रं व प्रकाशचित्रं वापरण्यासाठी लेखी परवानगी घ्यावी व त्या लेखाखाली तसा स्पष्ट उल्लेख करावा.

२. कवितांच्या किंवा / आणि इतर लेखांतल्या काही ओळी वापरल्या असतील, तर त्यांच्या प्रताधिकाराचाही उल्लेख करावा. या ओळी वापरण्यास कवी / लेखक व प्रकाशक यांची परवानगी अर्थातच घ्यावी.

३. रसग्रहण करताना किंवा समीक्षात्मक लेखन करताना संपूर्ण कविता लिहू नये. तशी लिहायची असल्यास, किंवा कवितेच्या ओळी वापरायच्या असल्यास कवीची व प्रकाशकाची परवानगी घ्यावी.

४. कथा / लेख यांचा अनुवाद असल्यास मूळ लेखकाची व प्रकाशकाची लेखी परवानगी घ्यावी व अनुवादात तसा उल्लेख करावा. या परवानगीची एक प्रत इमेलद्वारे मायबोली प्रकाशनाकडे पाठवावी.

५. ध्वनिमुद्रणांसाठी पार्श्वसंगीत प्रताधिकारमुक्त असावं, किंवा ते वापरण्यासाठी लेखी परवानगी घेतलेली असावी.

७. कविता, कथा, लेख यांची ध्वनिमुद्रित वाचनं अथवा गाणी सादर करायची असल्यास लेखकाची / कवीची व प्रकाशकाची लेखी परवानगी घ्यावी.

८. चित्रं, प्रकाशचित्रं, पार्श्वसंगीत, कथा / लेख / कविता यांच्या ओळी यांच्या वापरासाठीच्या लेखी परवानगीबद्दल संपादक मंडळाला इमेलद्वारे कळवावे.

या परवानग्या मिळवण्यास काही अडचण आल्यास, किंवा काही मदत लागल्यास कृपया संपादक मंडळ व मायबोली प्रशासनाशी संपर्क साधावा.

काही प्रश्न, शंका अथवा सूचना असल्यास आम्हांला इथेच अथवा sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर जरूर संपर्क साधा. संपादक मंडळ तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

*

सुशांत खुरसाले, नियम ३ मध्ये लिहिलंय की साहित्य संपूर्णपणे अप्रकशित असावे.
मायबोलीवर किंवा इतर कुठेही आधी प्रकाशित केलेलं साहित्य चालत नाही दिवाळीअंकासाठी.
तुम्ही नविन लिहा ना. Happy