मोकळी........

Submitted by mrsbarve on 23 September, 2013 - 00:29

नेहमी प्रमाणे ती एकटीच किचन मध्ये आवराआवरकरत होती.टी.व्ही.समोर मुले आणि नवरा बसलेले होते.सिंक मध्ये भांड्यांचा ढीग ,दुखणारी बोटं,तिला झालेली सर्दी सगळं काही नेहमीसारखच!

सगळी झाकपाक करून ती देवासमोर आली.आजचा दिवस पार पाडल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले.किचन मधला दिवा घालवून तीही दोन मिनिटे टी.व्ही.समोर बसली.इतक्यात धाकटा राजू झोपून गेला सोफ्यावरच.तिने काही न बोलत त्याला उचललं,आणि अंथरुणात नेऊन ठेवलं.

त्याच दप्तर आवरून तिने थोरलीला बेडरूम मध्ये नेल,तिला पुस्तक वाचून दाखवलं,ती झोपल्यावर लाईट बंद करून,ती आपल्या बेडरूम मध्ये येउन बेडवर कोसळली.पाच मिनिटं उद्याच्या डब्याची तयारी,पोस्टाची कामे,बँकेची कामे,इत्यादीची मनात उजळणी झाली.

अन हलकेच निद्रादेवीच्या कुशीत ती शिरून गाढ झोपून गेली.तेव्हढ्यात तो ही बेडरूम मध्ये
आला,तिला झोपलेली पाहून काहीसा निराश होत त्याने दिवा बंद केला.तिच्यासाठी आणलेलं छानसं पुस्तक तिच्या डोक्याशी ठेवून दिलं.तो हि झोपी गेला.
सकाळ झाली,तो ऑफिसला ,मुले शाळेला गेली,तिने भरभर स्वत:चं आवरलं ,महत्वाची कामे उरकून घरी आली,तर काय आश्चर्य!तो चक्क ऑफिसमधून लौकर घरी आलेला!किचन मध्ये मस्त फिश चा घमघमाट!तिच्या हातात चहाचा कप आयतागरमागरम...!

तिची आवडती गाणी सीडी वर लावलेली.. टेबलावरच्या फुलदाणीत तिची आवडती केशरी गुलाबाची फुले....ती हे सारे पाहून सुखावली.....आणी रडायलाच लागली कितीतरी दिवसांनी माहेरचं कोणी भेटल्यावर रडतात तसं!

त्याला काहीच कळलं नाही. पण शांतपणे तिच्या डोक्यावर तो थोपटत राहिला.
आणी ती मोकळी होत राहिली....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

खूपच मस्त बर्वेकाकु :),

अस मोकळ होण्याची खरच खूप गरज असते आणि एखाद्याला न सांगता आपल्या मनातल समजल तर ते सोन्याहुन पिवळ