दिवाळीसाठी मी (रंगकाम) केलेल्या पणत्या

Submitted by _हर्षा_ on 21 September, 2013 - 03:48

रोज कुंभारवाड्याजवळुन जात असताना सुचलेल्या कल्पनेनुसार दिवाळीपूर्वीच १ / १.५ महिना आधी पणत्यांची खरेदी केली. मग त्या धुवुन, वाळवुन मगच पुढील रंगकाम केले. आणि योगायोगाने माझ्या पहिल्यावहिल्या रिकामपणच्या उद्योगाला खुप भरभरुन प्रतिसाद मिळाला.
त्याची एक झलक तुमच्यासाठी खास!!!

DSC00994.JPGDSC00995.JPGDSC00998.JPGDSC00999.JPGDSC01002.JPGDSC01006.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स अवि, उदय, सृष्टी Happy
अवि, मागच्या दिवाळीत ३ ते ४००० पणत्या विकल्या मी...या दिवाळीला पण करेन थोड्या बघु ऑर्डरी किती येतात त्यावर अवलंबुन आहे गं! Happy
तुला हव्या आहेत का उदय?

अदिती रंग खूप फ्रेश आहेत. आणि पर्ल मध्ये रंगवल्यामुळे अजूनच आकर्षक वाटत आहेत. सोनेरी बॉर्डरमुळे खास उठाव आलाय. पण पणत्यांचे आकार आणि चित्रांमध्ये विविधता असती तर आणखी मजा आली असती. असो यावेळी कर. शुभेच्छा.

धन्स चनस, ड्रीमगर्ल Happy
ड्रीमगर्ल बरोबरे तुमचं.... आकार आणि डिझाईन मधे विविधता देण्याचा विचार आहे यावर्षी. पहिल्यांदाच केल्या होत्या ना मागच्या वर्षी Happy

ओके. पण अ‍ॅक्रेलिकमध्ये प्रकार असतात का.. पर्ल मध्ये रंगवल्याच म्हणल्यामुळे confuse झालेय..
सॉरी फारच अज्ञानी आहे कलर्स च्या बाबतीत..

आदिती१-मला सगळ्या पणत्या आवडल्या Happy खास करुन तु संस्कारभारतीच्या रांगोळ्याची चिंन्हे वापरलेले बघून जास्त छान वाटलं Happy

pritee1, k anajali, kalpu, kaalajivahu aani archana puranik khup khup dhans!!!
arachana me sanskar bharti rangolyanchi fan ahe so jikdetikde sawayinusar ti chinhe yetatach... mala rangoli kadhayla suddha khup awadate Happy

मस्तच!
मला हव्यात Happy
विकणार असशील तर सांग नाही तर स्वतःच्या बनवशील त्यात माझ्यासाठी पण बनव Proud

मस्त !

आदिती१-संस्कारभारतीच्या रांगोळ्या हा माझा छंद म्हणुन सहजच लिहल Happy आसो पण मग तुझ्या रांगोळ्या बघायला आवडतील फोटो असल्यास टाक Happy

आर्यातै, मुकु धन्स! Happy
रिये, यावर्षी वेगळे पॅटर्न करणारे विकायला. कधी येतेयस ते सांग? रांगोळ्या पण बनवतेय गं!
अर्चना, मी रांगोळ्या जागेअभावी फारशा काढु शकतच नाही गं! Sad माहेरी अंगण / मोकळी जागा होती भरपुर पण इथुन पुढे कधी काढल्या की नक्कीच फोटु काढेन गं!!! Happy

Pages