देवा समोर डोके आपटीता तो .

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 September, 2013 - 14:05

देवाजीच्या समोर तो
तुमचे डोके आपटतो
मान हातात पकडून
दूर ढकलून देतो

तो तर फक्त त्याचे
काम करीत असतो
सांगणारा त्याला
दुसराच कुणी असतो

नाही तर लाईन
संपेल तरी कशी
दानाची पेटी त्यांची
तुडुंब भरेल कशी

पैशाने येत असते
बेदरकार मुजोरी
संघटनेने येते अन
बेताल बळजोरी

हे तर जगाला
सारेच माहित आहे
वर्षानो वर्षापासून
असेच चालू आहे

साऱ्याच देवळात हे
असेच घडत आहे
तुमच्या कँमेरात फक्त
आता दिसत आहे

बरे त्यांनी तुम्हाला का
निमंत्रण दिले होते
तुमच्याच मनी आशेने
इमले बांधले होते

लग्न व्हावे पद मिळावे
घर हवे पोर हवे
व्यापारात वृद्धी हवी
दुष्मनाचे नाव मिटावे

रोगातून बरे व्हावे
आणि काय काय हवे
इच्छा संपत नाही
तोवर मागत राहावे

म्हणून सांगतो तोवर तरी
दु:ख मानू नका
त्यांच्या त्या वागण्याची
खंत ठेवू नका

त्याला मान पकडू द्या
देवा पुढे आपटू द्या
रडू नका पडू नका
नवस फेडण्या जरूर या

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरे त्यांनी तुम्हाला का
निमंत्रण दिले होते
तुमच्याच मनी आशेने
इमले बांधले होते >>>>> हेच खरे आहे .....

>> वर्षानो वर्षापासून
असेच चालू आहे
साऱ्याच देवळात हे
असेच घडत आहे >>

बडवा हा शब्द भडवा याचा अपभ्रंश तर नव्हे?