जीवनदान

Submitted by सखा on 20 September, 2013 - 10:32

र ला र ट ला ट
यमकं जोडून
बहुत मजेनं
गाणं केलं

कागदाची होडी
पावसाचं पाणी
होडी वर गाणी
सोडून दिली

तो संगीतकार
मनात विचार
गाणी ही भिकार
आजकाल

आत्महत्या बरी
तळ्यात घे उडी
गाण्याची ती होडी
सापडली

गाणी सिनेमात
त्यानी मग नेली
अशक्य गाजली
चोहीकडे

जीव आणखीन
आता वाचवीन
जळात सोडून
नव्या होड्या

-सत्यजित खारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुप्तहेर बबन बोंडे शत्रूच्या कानावर "कविता बॉम्ब" फेकून त्याला नामोहरम करतो.
शत्रू आता बॉसच्या ऑर्डर्स नीट ऐकू शकणार नाही. घोटाळा ही घोटाळा होणार.