फासावर काय होते

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 19 September, 2013 - 13:48

फासावर काय होते
मला पाहायचे होते
लटकणाऱ्या देहाचे
मला आकर्षण होते

म्हणून एक दिवशी
मीहि ते नाटक केले
बांधूनी गळ्यात दोर
स्टूल ढकलून दिले

छातीमध्ये दुभंगून
प्राण कासावीस झाला
वेदनेत ताठलेला
देह मग शांत झाला

म्हणजे काय घडले
तरी नव्हते कळले
जाणीव आली तेधवा
समोर काही दिसले

कवळून आई मला
करीत आकांत होती
सुन्नपणे बाबा अन
बसले खुर्ची वरती

आलेले पोलीस अन
शेजारी जमलेले ते
संशयी अविश्वासाने
त्यांनाच पाहत होते

आता मजला आईला
स्पर्श येईना करता
आणि बाबांना ती सारी
हकीकत हि सांगता

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विस्मया हरकत नाही .डॉक्टर म्हणून हॉस्पिटल मध्ये जे बघतो ते लिहितो .काय आहे कि आत कुठे टोचले कि कविता जन्मा येते . त्या मुळे माझ्या बऱ्याच कविता न आवडणाऱ्या असू शकतात याची मला कल्पना आहे .कारण ते जग वेगळे आहे .आणि लिहिणे मजबुरी ...
रावण ...धन्यवाद .