काळोख

Submitted by जयदीप. on 18 September, 2013 - 08:17

गोंजारल्या दुखांना का व्यर्थ हे उफाळे
दाटून कंठ येतो नाही मुकाट डोळे

सोसायला उन्हाळे तेफोल थाट भोळेे
जाळून खास गेले ते आप्तसे जिव्हाळे

मागून मीच घ्यावी का ती विशाल भाळे
का अर्थहीन माझे हे रोजचे उगाळे

काबीज मी करावे कोठून हे पन्हाळे
विद्रोह आठवांचा काही करोत चाळे

कोठून जाग यावी झोपून तेच सगळे
काळोखल्या जगीया काळोख तो उजाळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुका होतातच.<<<
फार दिवस चालत नाही कि नै हे उत्तर ...कधीनकधी चुका सुधाराव्याच लागतात ना जय जी Happy
वृत्त व यमक ~काफिया ,अंत्ययमक~रदीफ या बाबत अधिक माहीती मिळवा मग त्या पद्धतीने सराव सुरू ठेवा Happy

माफ करा.<<
आपण कुणाचीतरी माफी बीफी मागावी असे काहीच घडले नाही आहे ..कृपया असे नका म्हणू!! वाईट वाटून नका घेवू !! Happy

अवांतर : आपला SMS मिळाला धन्यवाद पण तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला?