Submitted by सुप्रिया जाधव. on 17 September, 2013 - 15:17
बोलते आहे तुझ्याशी हिकमतीने
टाळते माझी मला मोठ्या खुबीने
बोल वा बोलू नको, चालेल दोन्ही
मामला सुटणार नाही ताकदीने
टाळुनी कित्येकदा पायात येते...
हात सोडावा उन्हाचा सावलीने ?
निर्णयावरती कशी रे ठाम राहू ?
चित्त डळमळतेच ना घडल्या कृतीने !
कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने
एकदा उमलायचे होते तिलाही
उमलण्याआधी मिटावे पाकळीने ?
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह क्या बात !!! बाकीचे
वाह क्या बात !!!
बाकीचे फेस्बुक्वर बोलून झालेच आहे आपले ......
छान, आवडली.
छान, आवडली.
बोलते आहे तुझ्याशी
बोलते आहे तुझ्याशी हिकमतीने
टाळते माझी मला मोठ्या खुबीने
आवडला गं!
टाळुनी कित्येकदा पायात
टाळुनी कित्येकदा पायात येते...
हात सोडावा उन्हाचा सावलीने ?...दोन्ही मिसरे उत्तम, पण सुटॅ
कोरडा असतो मनाचा एक
कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने<<< व्वा
गझलही आवडलीच
कोरडा असतो मनाचा एक
कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने
<< क्या बात !
बोलते आहे तुझ्याशी
बोलते आहे तुझ्याशी हिकमतीने
टाळते माझी मला मोठ्या खुबीने
कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने
हे दोन शेर आवडले. इतर शेरांत सुधारणांना वाव दिसला.
छान !!!
छान !!!
सर्वांग सुंदर गजल .....
सर्वांग सुंदर गजल ..... आवडलीच ....
पापणीचा शेर मस्तच
पापणीचा शेर मस्तच
गज्गझल आवडलीच..पण
गज्गझल आवडलीच..पण त्यातही
<<कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने
>>
अगदी आरपार आहे.. बहोत खूब
छान...........!
छान...........!
chhan
chhan
फार सुंदर… अ फा ट……!!!
फार सुंदर… अ फा ट……!!!
>> कोरडा असतो मनाचा एक
>>
कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने
<<
क्या बात!
प्रत्येकाचे मनःपुर्वक आभार !
प्रत्येकाचे मनःपुर्वक आभार !
कोरडा असतो मनाचा एक
कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने>> सुरेख !
टाळुनी कित्येकदा पायात येते...
हात सोडावा उन्हाचा सावलीने ?>>व्वा!
उत्तम गझल.
खूप छान!
खूप छान!
खूप आवडली..
खूप आवडली..
ओहो. आहा.
ओहो. आहा.
खुप छान
खुप छान
बेस्ट ... पुनर्प्रत्ययाचा
बेस्ट ... पुनर्प्रत्ययाचा अनुभव.
कोरडा असतो मनाचा एक
कोरडा असतो मनाचा एक कप्पा
पापणी पाणावते त्याच्या वतीने
मस्तं.
मतला आणि पापणी - काय शेर
मतला आणि पापणी - काय शेर लिहिलेत सुप्रियाताई!!
मनःपुर्वक धन्यवाद मंडळी.
मनःपुर्वक धन्यवाद मंडळी.
सुंदर गझल
सुंदर गझल