आनंद

Submitted by जयदीप. on 16 September, 2013 - 11:31

चालणे ज्यांनी शिकवले होते
पाय त्यांचेही घसरले होते

सोडली पाण्यात सगळी तत्वे
का मनी पाणी सोडले होते

आज देव्हार्यात इतकी गर्दी
देव केव्हाचेच विरले होते

या जगालाही बघ तुझ्या माझ्या
क्लिष्ट नात्यांचे गज नको होते

यात ही आनंद मजला आहे
शब्द दु:खाला समजले होते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतीशय छान द्विपदी सर्वच्या सर्व
खूप आवडल्या
वृत्त (मीटर) तेवढे लक्षात आले नाही माझ्या

असो

शुभेच्छा

चालणे ज्यांनी शिकवले होते
पाय त्यांचेही घसरले होते

व्वा. आश्वासक.
आता वृत्त, रदीफ इ. तांत्रिक बाबींचेही पाहाल.