एकदा तरी......

Submitted by आशिष पवार on 12 September, 2013 - 07:11

एकदा तरी......
प्रश्न विचारलास का?
तुझ्या मनाला!
का! ओढ लागते
या जीवाला.............

प्रश्नांनचा झंझावात
अचानक हेलकावण्या देउन,
का? निघुन जातो
कातरवेळेला............

लुड-बुड विचारांची..
अधिक-उणे करुन
पेचात टाकते का?
या नश्वर देहाला.......

घुटमळ एकांती.
का?बरं होती
तडफड करीत
नैराशाच्या वाटेला....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेलकम बॅक !!!
खूप आनंद झाला परत आलेला पाहून...
धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धत ..