मायबोली गणेशोत्सव २०१३- उपक्रम - माझ्या गावचा गणपती

Submitted by संयोजक on 11 September, 2013 - 04:29

Mazyaa gaavacha ganapati.jpg

आपल्या गावचा गणपती म्हणजे आपला खास जिव्हाळ्याचा विषय... मग तो गावच्या जुन्या देवळातला असो की नव्याने बांधलेल्या मंदिरातला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा असो की आपल्या घरातला- त्याला आपण आपल्या मनाच्या गाभार्‍यात जपून ठेवतो. तसेच त्याची स्मृती कायमची कोरली जावी म्हणून आपल्या कॅमेर्‍यातही छायाचित्राच्या रुपात जतन करतो. आता वेळ आली आहे ती छायाचित्रे आपल्या मायबोलीकर मित्रांसोबत शेअर करण्याची.
तर मित्रहो, लवकर लवकर कामाला लागा आणि आपापले फोटो ह्या धाग्यावर अपलोड करा.

हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६) फोटो इथेच प्रतिसादात द्यायचे आहेत.

काय म्हणता? तुम्ही अजून काढलेच नाहीत? मग चला! लवकर लवकर फोटो काढा आणि सर्वांना दाखवा बरं!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला लोकहो, तुमच्या घरच्या बाप्पाचं दिलंत, तसंच गावच्या बाप्पाचंही लवकर दर्शन द्या! आम्ही वाट पहात आहोत.. Happy

रेडी हे गाव कुठे आहे?

अष्टविनायकांच्या गावी रहाणारे कोणी माबोकर नाहीतच की काय?

मावळंगे हे गाव पावस पासुन ६-७ किमी अंतरावर आहे. तिथे एका आमराईत डागडुजी करताना एक गणेशमुर्ती सापडली. त्या आमराईतच, आमराईचे मालक शिंदे यांनी हे मंदिर बांधले.

मंदिराच्या दारातून एक झरा बारा महिने वाहत असतो. मंदिराच्या दाराजवळ दोन मोठे वटवृक्ष एखाद्या द्वारपालासारखे उभे आहेत.

अतिशय शांत, रम्य आणि छोटेसेच मंदिर आहे. गावकरी मंडळी सोडुन विशेष कोणी येत नाही. त्यामुळे कलकलाट वगैरे नसल्याने अगदी प्रसन्न वाटते.

हे बाप्पा

हे मंदिर

हे तिथेच एका झाडाच्या खोडात प्रकटलेले बाप्पा

पुणे-बंगलोर हाय-वे वरील कोल्हापुर नजिक ८० फुट ऊंच चिन्मय गणेश..

IMG_1621.JPG
गणपतीच्या कपाळावर टिळा नसुन ते मधमाश्यांचे पोळे आहे..
IMG_1622.JPG

सारा महाराष्ट्रच माझा, महाराष्ट्रातील सगळी गावेही माझीच Happy
लेण्याद्री गिरिजात्मज

सगळे बाप्पा सुंदर. सर्वांना नमस्कार.

चिन्मय-गणेश किती भव्य आहेना, मस्तच. मधमाशांचे पोळे टीळयासारखेच भासतेय.