"विचार__"

Submitted by अनिल आठलेकर on 10 September, 2013 - 14:54

कोडे अवघड उलगडताना
कुठे न मिळती धागेदोरे
अखंड फिरती सूत्रे भरभर
धुंडाळत सुनसान किनारे .....

अविरत चर्चा, प्रश्न हजारो
यांचे काही त्यांचे काही...
अखेर हाती एकच उत्तर
"येथे नाही तेथे नाही.......!"

सत्याचीही वाचा गेली
उलटेसुलटे तर्क निघाले
उधाण भलत्या आरोपांचे
अफवेसरशी गेले आले....

स्वातंत्र्याची नाकाबंदी
कोणी केली कोणी केली?
अशी दुकाने कोणाची या
झंझावाताखाली आली....?

अजून कोठे ठिणगी विझली?
अजून वणवा शमला नाही
असा कधीही बळजबरीने
विचार केंव्हा सरला नाही...

भ्याडांनो लक्षात असू दया
अजून रण गारठले नाही
प्रकाश गिळणे आजवरीही
काळोखाला जमले नाही......!

विचार धगधगता अन हृदयी
ज्योत तेवती अखंड आहे
वार झेलण्या ध्येयासाठी
इच्छाशक्ती प्रचंड आहे......!

~ अनिल आठलेकर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून कोठे ठिणगी विझली?
अजून वणवा शमला नाही
असा कधीही बळजबरीने
विचार केंव्हा सरला नाही...

भ्याडांनो लक्षात असू दया
अजून रण गारठले नाही
प्रकाश गिळणे आजवरीही
काळोखाला जमले नाही......!

....व्वा..क्या बात है!!

मस्त..... Happy

भ्याडांनो लक्षात असू दया
अजून रण गारठले नाही
प्रकाश गिळणे आजवरीही
काळोखाला जमले नाही......!

हे जास्त आवडले Happy

भ्याडांनो लक्षात असू दया
अजून रण गारठले नाही
प्रकाश गिळणे आजवरीही
काळोखाला जमले नाही......!

विचार धगधगता अन हृदयी
ज्योत तेवती अखंड आहे
वार झेलण्या ध्येयासाठी
इच्छाशक्ती प्रचंड आहे.
.....!

सुंदर फ्लो .......... मस्त एक्स्प्रेशन............. उत्तम मांडणी.. :)... व्व्वा............