मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. २ (जयु)

Submitted by संयोजक on 9 September, 2013 - 08:21

मायबोली आयडी : जयु
पाल्याचे नाव : प्रांजल
वय : साडेसहा वर्षे

DSC_0405(1).jpg

पत्राचा मसुदा मुलीचाच आहे. मी फक्त जोडाक्षरे लिहायला मदत केली.

हा प्रांजलच्या सीक्रेट खजान्याचा फोटो :-

secret khajana.jpg

- जयश्री

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिकासा मधे ते पत्र क्रॉप करता येईल.
खालती वरती बरीच अनावश्यक जागा आहे.>> धन्यवाद दिनेशदा, पत्र क्रॉप करुन लवकरच पुन्हा टाकतेय.

देवा रे! बाप्पाला चक्क लालूच दाखवलीये. लै भारी! टेम्पलरनची मागणीही सॉल्लिड आहे. शेवटची ती दोन फुलंही भारी गोडुली आहेत. शाब्बास प्रांजल! Happy

नाहि मामी. डिशचा संबंध मास्ट्र्र शेफ ज्यु. शी आहे. आणि मागण्या वेगळ्या.बाप्पा काहिहि करु शकतो म्हणून एका
मिनीटात सगळं पाहिजे. Happy

सो स्विट प्रांजल," मला जेंव्हा पण पाहिजे ते मला पाहिजे एका मिनटात " >>>>>>>>>>>>>सहीच हाहा हाहा हाहा

आणि तुझा सिक्रेट खजाना आम्हाला पण दाखव.मागण्या एकदम छान!! देव तुझ्या सगळ्या मागण्या पुर्ण करो!!>>>> अगदी अगदी!

शिवाय तू नेक्स्ट टाईम बाप्पाला काय डिश बनवशील ती आम्हाला दाखव बरं का!.........:स्मित:

टेंपल रन.... सहा वेळा.... मस्त लिहीलय.. Happy
यंदा बाप्पांचे बरेच रनिंग होणार असे दिसते...
पुढील वर्षी माबो गणेशोत्सवात हा विभाग/पत्र ऊघडायला बाप्पा थोडे घाबरतील की काय असे वाटते.. Wink

वा प्रांजल, भारी मस्त आहे हं तुझा हा खजाना .... बाप्पाला खूप म्हंजे खूपच आवडला आणि मग बाप्पा काय म्हणतो....

कित्ती छान आहे गं
सिक्रेट खजाना प्रांजू तुझा
रंगीत रंगीत तारे टिकल्या
चॉकलेटच्या चांदीचा

नक्कीच येणार तुझ्याकडे
खेळ, दंगा करायला
शिकवशील ना टेंपल रन
प्रॉमिस हवंय बाप्पाला .....

खूप गोड आणि मत्त मत्त खजाना आहे बुवा प्रांजलचा .... अशीच भर पडत जावो याच्यात ....

शशांकजी तुमचे खुप खुप आभार. Happy

बाप्पाच्यावतीने तुम्हि दिलेले प्रतिसाद पाहुन पिलुमंडळी खूपच खुष आहेत. तुमच्या कल्पकतेला सलाम.

धन्यवाद.

कसलं क्युट लिहिलयं. साडेसहा वर्षांच्या मानाने अगदी नीटस लिहिलं आहे.
सीक्रेट खजाना कसला भारी आहे तुझा प्रांजल. Happy

Pages