मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. १ (अल्पना)

Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 06:03

मायबोली आयडी : अल्पना
पाल्याचे नाव : आयाम देपुरी
वय : सव्वापाच वर्षे

Aayam (Alpana)_letter to Bappa.JPG

या पत्रातले शब्द, वाक्य पुर्णपणे मुलाचे आहेत. त्याला पत्र नक्की काय असतं हे माहित नव्हतं. त्यासाठी मी त्याला गणेशोत्सवाची जाहिरात वाचून दाखवली होती. तसेच पत्राचे मायने काय काय असतात, शेवटी काय लिहितात हेही सांगितले होते. त्याने पत्राचा मजकुर मला सांगितल्यावर मी आधी पत्र लिहून काढले आणि मग त्याला डिक्टेट केले. त्यासाठी त्याला कुठे काना /मात्रा/ वेलांटी द्यायची हे सांगितले.
अजून तो देवनागरी मुळाक्षरे लिहायला शिकतोय. काना-मात्रा-वेलांट्या, जोडाक्षरं आणि स्वर अजून शिकवले नाहीत, त्यामूळे ते कसे देतात हे त्याला सांगावे लागले. या उपक्रमामूळे त्याचा काना, मात्रा, उकार आणि वेलांट्या कळाल्या.

धन्यवाद.
अल्पना

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिय आयाम,
नमस्कार!
तुमचे बाप्पाला लिहिलेले प्त्र वाचले आणि खूप खोप आवडले. तुमच्या आईने तुम्हाला बर्खामध्ये खेळू देणार, चॉकलेट देणार असं प्रॉमिस केलं आहे तेव्हा आता तिला डांटायची गरज नाही Happy
तुमचं पत्र फार वेगळं आणि छान आहे. तुम्ही खरच खूप शहाणा मुलगा आहात.
गॉड ब्लेस!

आईला डांटा हे बाप्पापर्यंत नाही पोचलं तरी मायबोलीकर बाप्पाच्या वतीने ते करतील Happy
मस्त लिहिलंय पत्र !

कुदू नकोस, कुदशील तर पिटीन म्हणणारी आत्या आठवली मला !

सगळ्या मावश्या, काका, मामांना आयामकडून मोठ्ठं थँक्यु आणि पारी पण. Happy

त्याला सगळ्यांच्या कमेंट्स वाचून दाखवल्या. खूप खुश झाला होता इतक्या सगळ्या स्मायलीज मिळालेल्या बघून. त्याने शाळेत आणि बसमध्ये पण त्याच्या मित्र-मैत्रिणींना सांगितलंय - "मैने मायबोली पे गणपती बाप्पा को लेटर लिखा था मराठी मे .. मराठी भी एक लँग्वेज होती है, तुम्हे नही पता होगा. और मुजे बहोत सारे स्मायलीज भी मिले है." या स्मायली मिळाल्याच्या आनंदात काल शाळेतून येताना बसमध्ये त्यांनी चॉकोज आणि बिस्किट्स खावून पार्टी पण केली म्हणे. Happy

त्याने परवा बाबाला पण पत्र दाखवलं आणि वर हेही सांगितलं - मराठीमे है, आपको नही समझेगा. मुझे मराठी आती है. Happy

त्याने परवा बाबाला पण पत्र दाखवलं आणि वर हेही सांगितलं - मराठीमे है, आपको नही समझेगा. मुझे मराठी आती है. स्मित
>>>>> Lol

आयाम, बाप्पाला पत्र आवडले!
बाप्पा तुला लवकरच चॉकलेट देणार आहेत! Happy

(अल्पना, त्याला माझ्याकडून एक चॉकलेट नक्की दे!)

Pages