ध्यासबावळी

Submitted by अज्ञात on 6 September, 2013 - 01:07

आस मिटे ना मन हो चातक थेंब मिळे ना स्वाती
तृषा पाशवी अंतर्यामी असून पाणी भवती
फिरे एकटा मेघ अंबरी आतुर सुकली माती
छळते सावट रंध्रे अनवट ठाव न लागे चित्ती

अंकुर चिंतातूर; दिसे ना किरण सोबती अवती
गुदमर विळखुन विरह दाटला स्तब्ध जाहली नाती
एक साद पवनास विनवते छेड बांधले मोती
झुलव आपला झुला; तोषव ध्यासबावळी धरती

…………………. अज्ञात
Posted by C

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आस मिटे ना मन हो चातक थेंब मिळे ना स्वाती
तृषा पाशवी अंतर्यामी असून पाणी भवती >>>सुरेख!

'ध्यासबावळी'हा शब्द सुद्धा छान आहे. Happy

गुंतवून ठेवते कविता, अज्ञात... वाह!!
काय आवडलं म्हणाल, तर कविता वाचून झाल्यावर मनावर रेंगाळणारा तिचा फील आवडलाय.. बेहद्द खास..

एक साद पवनास विनवते छेड बांधले मोती
झुलव आपला झुला; तोषव ध्यासबावळी धरती>>>

सुरेख!!