पहा लक्ष देऊन हसण्याकडे..

Submitted by रसप on 2 September, 2013 - 04:17

पहा लक्ष देऊन हसण्याकडे
तिच्या कोरड्या पापणीला तडे

मला दु:ख दे पारिजाता तुझे
टिपे गाळताना पडावे सडे

समांतर तुला चाललो जीवना
तुझी वाट घेते वळण वाकडे

जळावे असे वाटलेही तरी
कधी आग नव्हती, कधी लाकडे

'जितू' धर्म झाल्यावरी आंधळा
दिसावे कसे सारखे आतडे ?

-------------------------------------------------------

नको वाटते हे तिचे पाहणे
उतरली नसे अन् नव्याने चढे

....रसप....
२ सप्टेंबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/09/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला दु:ख दे पारिजाता तुझे
टिपे गाळताना पडावे सडे

समांतर तुला चाललो जीवना
तुझी वाट घेते वळण वाकडे

जळावे असे वाटलेही तरी
कधी आग नव्हती, कधी लाकडे<<<
हे फार आवडले .:)

मला दु:ख दे पारिजाता तुझे
टिपे गाळताना पडावे सडे
>>
वाह!
सगळेच आवडले पण हा जास्त

खूप दिवसांनी मस्त गझल, आवडल्या सर्व द्विपदी रणजीत, पण
'जितू' धर्म झाल्यावरी आंधळा
दिसावे कसे सारखे आतडे ?
हे नाही स्पष्ट झालं ..

जळावे असे वाटलेही तरी
कधी आग नव्हती, कधी लाकडे>>

व्वा!, 'ही' चे प्रयोजन समजले नाही.

>> कणखरजी,
'जळावे' असे वाटलेही होते. मनात आलेही होते. 'सुद्धा' ह्या अर्थाने.....

-----------------------------------------------

'जितू' धर्म झाल्यावरी आंधळा
दिसावे कसे सारखे आतडे ?
हे नाही स्पष्ट झालं ..

>> भारती ताई,

'एकाच आतड्याचे' म्हणजे 'भाऊबंद' ... ('एक रक्ताचेच आहो साक्ष देई आतडे').

म्हणायचं असं होतं की.... धर्मांध झाल्यावर कुणीच आपला भाऊबंद वाटत नाही.. काईण्ड ऑफ..

------------------------------------------------

फसले वाटतं दोन्ही शेर..!! Sad

कधी आग नव्हती, कधी लाकडे <<सर्वोत्तम ओळ
सगळे शेर आवडले
शेवटचा मलाही समजला नव्हता पण् त्या आतड्यावरून तू म्हण्तोय्स ते स्पष्ट होत नसावे असे वाटते आहे

उतरली नसे अन् नव्याने चढे << हेही फार आवडले विषय माझ्याही जिव्हाळ्याच्घा असल्याने असेल बहुतेक Wink )

समांतर तुला चाललो जीवना
तुझी वाट घेते वळण वाकडे...हासिल-ए-गझल !

नको वाटते हे तिचे पाहणे
उतरली नसे अन् नव्याने चढे .......आवडलाच !!