आज्जी आणि तिच्या गोष्टी (शतशब्दकथा)

Submitted by कविन on 29 August, 2013 - 05:32

दिवेलागणीची वेळ म्हणजे शुभंकरोती, उदबत्तीचा सुगंध, आणि आजीच्या गोष्ट. रोज वेगळी गोष्ट. रामायण, महाभारतापासून जादुगारापर्यंत अगदी कुठलीही.

"आज्जी ग! खरच घडलय का ग हे रामायण महाभारत वगैरे?" मी एकदा तिला विचारलं होतं.

"मनु, ह्या गोष्टींना ना आपल्यामधे... आपल्या आजुबाजुला शोधायचं असतं, मग नाही हा प्रश्न पडत" तिने पट्कन सांगितलं होतं

तिच्याकडे जादुसारखी उत्तर मिळायची नेहमीच.

मग मी पण छांदिष्टासारखी आजुबाजुला शोधायला सुरुवात केली आणि जाणवलं घडतय की महाभारत इथेही.

इथे आंधळा धृतराष्ट्र आहे, द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन आहे अगदी विटंबना मुकपणे बघणारा बघा दरबारही आहे... दिसत नाहीये तो फ़क्त द्रौपदीची लाज राखणारा कृष्ण.

ह्या कृष्णाबद्दल आज्जीला विचारायचच राहून गेलं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है....

बरं १०० म्हणजे १००च शब्द असले पाहिजे का? की काही कमी-अधिक चालतात. आजकाल आवडायला लागला हा प्रकार. वेळ जास्त लागत नाही आणि विचार पोचतो. प्रयत्न करुन बघायला हवा.

बाकी अ‍ॅड्मीन, हा वेगळा ग्रूप करता येईल का? शतशब्दकथेचा. म्हणजे शोधायला सोपे जाईल.

Pages