नीळा कृष्ण

Submitted by चाऊ on 29 August, 2013 - 01:08

Krishn.jpg

नीळा कृष्ण, ह्याच डोळा पाहु दे
मला गोकुळाला जाऊ दे
गोपिका बनुन रास-रंग खेळु दे
मला गोकुळात राहु दे

दूध दही लोण्याचे, उंच घडे फोडूनी
बाल सवंगड्यांसवे मनोभावे खाउनी
उष्ट्या, दही भरल्या हरीमुखातुन
विश्वाचे प्रगट रुप पाहु दे

मीरेचे विष पियुनी, कंसाला संपवूनी
दैत्यांचे दमन करुनी, कालीयास मर्दुनी
गलीत गात्र पार्थाला भगवदगीत सांगुनी
पांडवांना विजयताना पाहु दे

गोप गोपिकांचा तो प्रिय गिरीधर,
गाई गुरां मोहवी, रानातून बासरीचा स्वर
मी पण सारे हरूनी, मायेने कृष्णाच्या
श्री चरणी एकरुप होऊ दे

नीळा कृष्ण, ह्याच डोळा पाहु दे
मला गोकुळाला जाऊ दे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy