फोन

Submitted by चाऊ on 28 August, 2013 - 06:58

तुझा कधीचाच स्वर माझ्या कानात जागतो
वेळी-अवेळी हा खुळा फोन उगाचच वाजतो

झाले सांगून बरेच तरी कितीक राहिले
शब्द सांडले सगळे, सारे स्वर ते उरले

ताल धावत्या दिलाचा, बोल अधीर श्वासांचा
ओल्या पापण्यांच्या आड, किती आषाढ वाहिले

कधी भेटेल साजण, कधी तुटेल अंतर
दुराव्याचा हा सल, कधी मिटेल? वाटले,

पुरे दुरुन संवाद, डोळे भरुन पहावे
स्पर्शाचा हा झुला, त्यात झुलावे, वाटले

कधी सखा, कधी रिपु, तरी एकटा आधार
फोन झाला दूत, आज का, न वाजतो?

तुझा कधीचाच स्वर माझ्या कानात जागतो
वेळी-अवेळी हा खुळा फोन उगाचच वाजतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users