तिथेच लागते जिथे जखम असते ..........(तरही)

Submitted by सुप्रिया जाधव. on 28 August, 2013 - 04:33

तुझी नजर अमूल्यसे मलम असते
तिथेच लागते जिथे जखम असते

कुठे जुळे समानता विचारांची ?
विचार तेच, वागणे विषम असते !

पुन्हा करू नवा गुन्हा फुरसतीने
नको अताच, बातमी गरम असते !

कुणाकडे असेल झाड पैशांचे
घरात एक लावले कलम असते

(जरी हे मान्य अंध न्यायदेवता)
तरी खरे तिचेच एकदम असते

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाकडे असेल झाड पैशांचे
घरात एक लावले कलम असते<< वा वा

शेवटच्या शेरात लगावली बदलली आहे बहुधा Happy

शुभेच्छा सुप्रिया

कुणाकडे असेल झाड पैशांचे
घरात एक लावले कलम असते>>> व्वा!

'फुरसत' असा शब्द आहे.

'अमूल्यसा' असे शब्द टाळता आले तर उत्तम.

अवास्तव आग्रह वाटल्यास क्षमस्व!

गझल छान आहे…

कुठे जुळे समानता विचारांची ?
विचार तेच, वागणे विषम असते !

कुणाकडे असेल झाड पैशांचे
घरात एक लावले कलम असते

वरील दोन शेर आवडले…

'अमूल्यसा' बाबत कणखरजींशी सहमत आहे.

आणि जरी वापरला तरी तो शब्द 'मलम' साठी असल्याने 'अमूल्यसे' असा नपुसकलिंगी वापरावा लागेल.

शुभेच्छा.

सगळ्यांचे मनःपुर्वक आभार !

विदिपा आपल्या म्हणण्याचा नक्कीच विचार करतेय नेहमीप्रमाणेच !
फुरसत-फुरसद नेहमी गडबड होते Sad असो !

विशेष आभार !!

वैभव फाटक, 'ते' औषध आणि 'तो' मलम ना ?

-सुप्रिया.

http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/

http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%85/index

सुप्रिया, शब्द तपासून घेण्यासाठी ह्या दोन लिंक संग्रही(बुकमार्क करून) ठेवा म्हणजे कायमचा संदर्भ होईल.

राग नसावा सुप्रियाताई,

'ते मलम' असाच शब्दप्रयोग वापरतात. 'तो मलम' असे वापरणे अशुद्ध वाटेल. (चुभूद्याघ्या )