अध्यात्माची महती

Submitted by मिरिंडा on 27 August, 2013 - 04:37

आम्ही बरे भोगी
योग नको तुमचा
चौकट ज्याची असे
अध्यात्माची

योग, अध्यात्माचा जगी
नित्य असे दणका
देह भोगणारा
तळमळतसे

अजूनही शमली
नाही वासनाही
अध्यात्माची शाल का
पांघरावी ?

अध्यात्म अवघे
बजबजले अनंती
उपयोग शून्य त्याचा
व्यवहारामधी

कुणी म्हणे शांतीसाठी
कुणी म्हणे साठीसाठी
अद्यात्माचा दवा
अतिउत्तम

तुम्हा सांगतो ऐका गोष्ट
अध्यात्माची नशा
नाही उतरत
सर्वदाही

मदिरेच्या नशेला
काळाचे बंधन
अध्यात्माची नशा नुतरे
कधीही

देवादिक असती
त्याच्या सभोवताली
आम्हीच रंगविले
हवे तसे

रोजचीच मारामारी
जगणे झाले अशक्य
अध्यात्म सांभाळिता
लुळे पडलो

सहिष्णुता भिनली
विनाकारण अंगी
दाबणारा दाबी
हवा तसा

अध्यात्म धरूनी
होई शोध गुरूचा
तोही सापडला
भोगवादी

अध्यात्म वेगळे
ज्याचे त्याचे असे
परी अंतरंगी स्वार्थ
सारखाची

आता श्रीचरणी
असे प्रार्थना ही
आवरी अध्यात्म आणि
गुरुचा सुळसुळाट

गंगाधरसुत म्हणे
ऐसी अध्यातमाची महती
जगण्यासाठी निष्प्रभ
ठरते जे

Group content visibility: 
Public - accessible to all site users