तसे औत्सुक्य ते आता विकत नाहीत

Submitted by वैवकु on 26 August, 2013 - 14:25

बरा नाही कशाने होत हा आजार
जगावे वाटण्याचा मोह अवघड फार

तसे औत्सुक्य ते आता विकत नाहीत
कसा धाडू तुला माझ्या मना मी तार

नका येऊ असे सांगूनही आलेत
किती हे पारवे वळचण कशी पुरणार

गुलाबीसर छटा गझलेमधे येईल
तुझ्या शैलीत माझी वेदना साकार

खुबीने कत्ल माझा साधतो दररोज
तुझा निर्दोष वर्णावा असा शृंगार

तुझे मी बीज माझे विठ्ठला तू झाड
नको बनवूस माझा ..' वृक्ष डेरेदार '

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगावे वाटण्याचा मोह अवघड फार

नका येऊ असे सांगूनही आलेत
किती हे पारवे वळचण कशी पुरणार

तुझ्या शैलीत माझी वेदना साकार

मस्त!

किती हे पारवे वळचण कशी पुरणार>>> ह्या मिसर्‍याला व्वा व्व्वा व्वा!

औत्सुक्य चं spelling चुकलंय हे एक. आणि तो शेर समजलाच नाही. तार बंद झाली त्याबद्दल आहे का हे?

सर्वांचे खूप खूप आभार
ज्ञानेशजी विशेष ...टायपो सुधारला अहे
पारिजाता ; होय तसेच आहे ते

पुनश्च धन्स

वृक्ष डेरेदार - शेर आवडला. तसेच इतर काही ओळीही आवडल्या. मात्र एकुण गझल फारशी भिडली नाही. मे बी, सध्याचा माझा मूड गझल वाचनास सुयोग्य नसावाही.

नका येऊ असे सांगूनही आलेत
किती हे पारवे वळचण कशी पुरणार

गुलाबीसर छटा गझलेमधे येईल
तुझ्या शैलीत माझी वेदना साकार

हे दोन सर्वात विशेष वाटले.

नका येऊ असे सांगूनही आलेत
किती हे पारवे वळचण कशी पुरणार

तुझे मी बीज माझे विठ्ठला तू झाड
नको बनवूस माझा ..' वृक्ष डेरेदार '

वरील दोन शेर मस्त…

शुभेच्छा.