सावज

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 August, 2013 - 14:04

तसे प्रत्येक स्त्रीला
हे माहित असते
ती केव्हाही कुठेही
सावज होवू शकते
कुठलाही चेहर्‍यामागे
इथल्या असू शकतो
पाशवी कामांध पशु
या जगात जिथे तिथे
लावलेले आहेत
शेकडो फास
शेकडो पारध्यांनी
जे तिच्या न कळत
तिचे सर्वस्व
हिरावून नेवू शकतात
पुन:पुन्हा अन पुन:पुन्हा
मैत्रीच्या नाटकात
प्रेमाच्या आशेत
लग्नाच्या आमिषात
सावज बळी पडतच असतात
एकटेपणी आडजागी
अनोळखी पशूंनी
केलेला हल्ला
असतो क्लेशकारक
अस्तित्वाच्या मुळावर
आघात करणारा
पण त्या विरुद्ध निदान
न्याय तरी मागता येतो
अन त्या पशूंना
कधीकधी तरी
कोंबता तरी येते
कारागृहाच्या अंधारात
पण मैत्रीच्या सावलीत
प्रेमाच्या हिरवळीत
नात्याच्या जवळकीत
लपलेल्या सापांचे
काय करायचे
त्यांना कसे ठेचायचे
हा मोठा प्रश्न आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users