फोड डोळे, तोड हात..

Submitted by प्राजु on 25 August, 2013 - 01:42

अंधारल्या वाटेवर पेटव तू वणव्याला
फ़ोड डोळे, तोड हात, जातील जे पदराला

लांडग्यांचे गाव सारे, लचकेच तुटतील
गोल बसून ते सारे, मजा तुझी लुटतील
येण्याआधी जग सारे, इथे तिथे निषेधाला
फ़ोड डोळे, तोड हात, जातील जे पदराला

वाट कोणाची बघशी, इथे भ्याड भरलेले
षंढपण मिरवाया, मेणबत्त्या घेतलेले
फ़ेड सभ्यतेला आणि, नेस चन्डिकेचा शेला
फ़ोड डोळे, तोड हात, जातील जे पदराला

कर चुथडा चुथडा, लिंग ओळखू न यावे
तुला स्पर्शण्याच्या आधी, हात जळूनच जावे
न्याय यंत्रणाच नको, शिक स्वत: झोडायला
फ़ोड डोळे, तोड हात, जातील जे पदराला

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायभूमीत होणार्‍या अबलांवर होणारे अत्याच्यार बघितले की उसगावातल्यांच्या लेखण्या नुसत्या तलवारी होतात.