झंकार

Submitted by रसप on 24 August, 2013 - 01:15

ती रोज चोरून मला बघते
तिला वाटतं मला कळत नाही
पण मला सगळं समजतं
फक्त मी दाखवत नाही

तिच्या नजरेत मला दिसते
मी जवळ घेईन अशी आशा
तिच्या व्याकुळतेच्या बदल्यात
मी तिला रोज देतो फक्त निराशा

खरं तर मलाही वाटत असतं
की तिला जवळ घ्यावं
छातीला लावावं
तिने गळ्यात पडावं
माझी बोटं तिच्यावरून फिरावीत
गात्रं शहारावीत
थरथरून कंपनं उठावीत
त्या कंपनांचे सूर कानात घुमावेत
मनात रुजावेत
आणि एखादी वेगळीशीच धून वाजावी,
जिची नशा आसमंतास व्यापावी..

पण,
असं काही होत नाही
मी तिची नजर टाळतो
रोजच तिला नाकारतो

मग एक दिवस
तिची आर्तता जिंकते
ती मला जवळ ओढते
मीही तिला बाहूंत घेतो
तिच्या लडिवाळ मिठीत धुंद होतो
तिच्या स्पर्शाने उत्साहाचा तरंग येतो
आणि माझ्या पहिल्या स्पर्शानेच उठतो
तिच्यातून एक धुंद धुंद झंकार
माझ्या हातून स्वत:ला अशीच छेडून घेते
माझी अकॉस्टिक गिटार ! Wink Happy

....रसप....
२१ ऑगस्ट २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/blog-post_24.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

छान आहे.
वाचत असताना 'ती' कोणीतरी वेगळीच असणार असा थोडा अंदाज आला होता.
शेवटी 'ती' कोण हे कळल्यावर मजा आली.

वा रे !! Happy