"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन वेगळ्या प्रिक्वेलच भूत प्रोडुसर्सच्या मानेवर असल्याचं हे फळ असावं... प्रिक्वेल GRRM लिहिणार आहे, किंवा मार्गदर्शन तरी असेल. नशिबाने D&D चा आता याच्याशी काहि संबंध नाही.

अगदीच फुस्स झालं की.
नाईट किंग कोणीतरी आपल्याला माहित असलेला असेल त्याची काहीतरी बॅक स्टोरी असेल असं वाटत होतं पण त्याला असाच उडवला.
जॉन स्नोच्या आईबापाची नेमकी काय स्टोरी होती हेही कळलं नाही. ब्रॅन ला किंग बनवणं असंच आपलं उगाच टाईप.

मार्टिन बुक कधी संपवेल देव जाणे.

व्हिज्युअल ट्रीट होता, पण मला नाही आवडला शेवट!
डॅनीचं ब्रेकिंग बॅड आणि शेवट जरी अपरिहार्य म्हटला तरी उरकल्यासारखा वाटला.
नॉर्थमध्ये जाण्याचा निर्णय जॉनचा स्वत:चा असायला हवा होता - ते येडंच आहे पण एक! ही सीरियसली नोज नथिंग!
टिरिअनला 'अजून नाइट्स वॉच आहे होय!' आणि आर्याला 'व्हॉट आर यू डूइंग हिअर्? व्हॉट हॅपन्ड टु यू?' असले धन्य प्रश्न तो एकटाच विचारू शकतो!
सर्सीच्या शरण आलेल्या सैनिकांची मुंडकी उडवणारे अनसलीड जॉन आणि टिरियनला जिवंत का ठेवतात? हे सो कॉल्ड काउन्सिल तिथे आलं नसतं तर त्यांचा पुढे काय प्लॅन होता?
किंग्ज लॅन्डिंगची अवस्था बघितल्यावरही यारा 'आमच्या क्वीनला का मारलं' म्हणून कशी काय फणकारू शकते? मग तुमची क्वीन अडचणीत होती तेव्हा तुम्ही कुठे होतात?!
तो किंग कोण हे ठरवण्याचा भाग तर सर्वात मोठा जोक होता - ईव्हन विदाउट द वॉटर बॉटल! त्यापेक्षा दहा-वीस-तीस करून ठरवलं असतं तरी जास्त लॉजिकल वाटलं असतं!
सान्साला आता नॉर्थ वेगळी हवी असण्याचं आणि देण्याचं प्रयोजन काय?!

अमा म्हणाल्या तशी हुरहूर वाटली बाकी संपताना. Happy

शेवटचा सीझन घाईघाईत उरकल्यासारखा वाटला पण ते अगदीच क्षम्य. मूळ स्टोरीशी त्यातील सरप्राईज एलिमेंटशी प्रतारणा हे सगळ्यात अक्षम्य होतं!
नाईट किंग युद्धात काहीच धक्कादायक झालं नाही. (झालं नाही तरी कसं म्हणू! इतक्या सपकपणे आर्या डायरेक्ट ड्रॅगन ग्लासचा खंजिर खुपसेल आणि क्षणात सगळे डेड री-डेड होतील हे अजिबात म्हणजे अजिबात वाटलं न्हवतं. सो ते फडतुस असलं तरी अँटिक्लायमॅक्टिक धक्कादायकच होतं)
डॅनी सगळं शहर उध्वस्त करणार हे तिच्या वागण्या बोलण्यातुन कळुन चुकलेलं, ते उध्वस्त होताना बघणं नेत्रसुखद असलं तरी धक्कादायक अजिबात न्हवतं. जॉन 'माय क्विन' 'माय क्विन' करत गोंडा घोळवत येणार हे ही माहित होतं आणि नंतर तोच तिला संपवणार हे ही जणू गिव्हनच होतं. परत संपवलं कसं? तर साधा खंजिर ह्रदयात खुपसुन!!! तो ही फक्त एकच वार!
मुंडकं छाटलं नाही की गळा चिरला नाही, की गेला बाजार शंभर वार केले नाहीत. किमान वलेरिअन स्टीलची तलवार पोटाततून आरपार करुन नंतर लागलेलं रक्त कापडाला पुसलेलं दाखवलं असतं तरी पैसे वसुल झाले असते. नॉन वलेरिअन स्टीलच्या फडतुस डॅगरच्या एकाच वाराने मृत्यू!!! तो ही आमच्या खालिसीचा #टोटलीनॉनगॉट सर!
आणि सगळे उरलेले स्टार्क सुस्थळी पडले हा साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ सप्रुण शेवट! भुक्कड चातुर्मास कहाणी करुन टाकली आमच्या गॉटची!
कुठे फेडाल ही पापं!

Bran know everything and does nothing. Jon known nothing but he does everything. Dany does everything and get nothing

आर्या डायरेक्ट ड्रॅगन ग्लासचा खंजिर खुपसेल आणि क्षणात सगळे डेड री-डेड होतील हे अजिबात म्हणजे अजिबात वाटलं न्हवतं. >>> हे ही गिव्हन च होतं की Happy म्हणजे एक व्हा. वॉ मेला की त्याने निर्माण केलेले वाइट्स मरतात आणि ना. किं. मेला की सगळे व्हा वॉ आणि वाइट्स मरणार, ही नोन फॅक्ट होती की. आणि आर्याने ड्रॅगन ग्लास नाही, व्हॅलेरियन स्टील चा डॅगर वापरला!
'अजून नाइट्स वॉच आहे होय!' आणि आर्याला 'व्हॉट आर यू डूइंग हिअर्? व्हॉट हॅपन्ड टु यू?' >>> Lol खरंय

एम्टीने दिलेला मॅप परत काढून पाहायला हवा. आर्या वेस्ट ऑफ वेस्टरोस करत दुसर्‍या बाजूने नाथला पोचून ग्रेवर्मला शिक्षा करणार बहुतेक! Proud

>>> आणि सगळे उरलेले स्टार्क सुस्थळी पडले हा साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ सप्रुण शेवट
अगदी! Lol

जॉन आणि घोस्टमधली मोमेन्ट ही माझ्यासाठी या एपिसोडची सेविंग ग्रेस होती! Happy

>> 'अजून नाइट्स वॉच आहे होय!' आणि आर्याला 'व्हॉट आर यू डूइंग हिअर्? व्हॉट हॅपन्ड टु यू?'
दहा-वीस-तीस करून ठरवलं असतं तरी जास्त लॉजिकल वाटलं असतं! >> Biggrin

>>टिरिअनला 'अजून नाइट्स वॉच आहे होय!' आणि आर्याला 'व्हॉट आर यू डूइंग हिअर्? व्हॉट हॅपन्ड टु यू?' असले धन्य प्रश्न तो एकटाच विचारू शकतो!<<
नाइट वॉच आहे कि नाहि हा प्रश्न वाजवी आहे ना? कारण आता नाइटकिंग/व्हाइटवॉकर इतिहासजमा झाले आहेत आणि वाइल्डिंग्ज तर खांद्याला खांदा लावुन नॉर्दनर्स बरोबर लढले आहेत, तर मग आता नाइट वॉचची गरज आहे का या अर्थी जॉनने तो प्रश्न विचारला असावा...

शेवटी ती एझर अहायची प्राफसी गुलदस्त्यातच राहिली म्हणायची...

ब्रॅनला थ्री आईड रेवन बनवला ते ठीकच होतं. 'द ब्रोकन' माणूस मेला नाही तर आणखी काय करेल? पण मग रेवन केलंय ना आता त्याचा वाट्टेल तसा फायदा घ्या आणि स्टोरी कशीही वळवा हे काही आवडलं नाही.
त्या आर्याला फेसलेस गॉड कडून दीक्षा मिळालेली सो तिने सर्सीचं तोंड लावून डॅनीला मारलं, डॅनीला कोणी मारलं की तिचं तोंड लावून काही तरी करताना जॉन आला आणि त्याच्या बरोबर सेक्स झालं आणि भलभलत्या गॉ(ट)मती केल्या असत्या आणि नंतर अश्वत्थाम्यासारखी भाळीची जखम काही बरी होत नाही असा डार्क शेवट तिच्या पात्राचा केला असता तर गॉटी झालं असतं का?

सर्व लोक्स एक महत्वाचा मुद्दा विसरले लिहायला . जी ड्रॅगनमाता गेल्या पाच-सहा वर्षांपासून इतका अकांड-तांडव करून शेवटी ज्या आयर्न थ्रोन साठी आली होती त्या आयर्न थ्रोन ला फक्त काही क्षण न्याहाळून एक क्षण स्पर्श करायला भेटला फक्त. त्यावर बसायच्या आधीच भाच्याने घात केला बिचारीचा... तेवढी एक चुट -पुट लागून गेली मला काही काळ....

>>> नाइट वॉच आहे कि नाहि हा प्रश्न वाजवी आहे ना?
अहो पण हा प्रश्न इतरांनी त्याला विचारायचा! इतके दिवस तो वन ऑफ द डिसिजन मेकर्स होता ना?! खरा वारसदार वगैरे?! Proud

बाकी टिरिअनशी बोलेपर्यंत त्याची अवस्था अगदी रथात शस्त्रं टाकून बसलेल्या अर्जुनासारखी झालेली दिसत होती. 'ती माझी क्वीन आहे, तिला मी कसं मारू?!'

>>> एझर अहायची प्राफसी गुलदस्त्यातच राहिली
पुस्तकातच राहिली Proud
शो मध्ये त्याचा कधीच उल्लेख आला नव्हता ना?

डॅनीचं भाषण ऐकताना 'ये तो पहली झाँकी है - काशी मथुरा बाकी है' घोषणेची आठवण कोणाकोणाला झाली?

फारच सपक वाटला शेवट.
व्यवस्थीत शेवटासाठी अजून एक सिझन हवा होता किंवा हा सिझन तरी १० एपिसोड्सचा हवा होता.
एनिवेज, Bye Bye GOT!

भुक्कड भुक्कड. शेवट तर फालतू गमजा करण्यात गेला. तो टली उठून भंपक भाषण करतो आणि सान्सा त्याला नजरेच्या जरबेने खाली बसवते. टिरियन खुर्च्या नीट लावतो आणि बाकीचे येउन भसाभसा बसतात, ते साँग अँड फायरचे पुस्तक आणि त्यात टिरिअनचा उल्लेख नसणे जा जोक वगैरे.
ड्रॅगनने आयर्न थ्रोन जाळणे हे प्रतिक म्हणजे हिंदी सिनेमातल्या 'मेरे दिल के शीशे में तेरा चेहरा' अशी लाइन आल्यावर लगेच हिरोच्या हातात मोठा आरसा आणि त्यात धोतर-चोळी घातलेली हिरॉइनच्या नृत्यमुद्रेतले प्रतिबिंब दिसणे या प्रतिकाइतके क्लिशेड होते.
आर्याला एकदम कोलंबसचा किडा का चावला? आधी कधी ती मार्को पोलोच्या उत्सुकतेने हिंडताना नाही दाखवलेली.

>>शो मध्ये त्याचा कधीच उल्लेख आला नव्हता ना?<<
आय थिंक होता, मेलसँड्रे म्हणते जॉनच्या संदर्भात - प्रिंस दॅट वॉज प्रॉमिस्ड वगैरे...

डॅनीवर जीवापाड प्रेम करणारा जॉन तिला ठार मारण्याचं धैर्य कसं गोळा करतो, हे या संवादांवरुन स्पष्ट व्हावं -
टिरियन - आय नो यु लव हर, आय लव हर टू. नॉट अ‍ॅज सक्सेस्फुली अ‍ॅज यु. बट आय बिलिव्ड इन हर; लव इज मोर पावरफुल दॅन रिझन
जॉन - लव इज दि डेथ ऑफ ड्युटि
टिरियन - यु जस्ट केम अप विथ दॅट?
जॉन - नो, मेस्टर एमन सेड इट टु मी लाँग टाइम अ‍ॅगो
टिरियन - समटाइम्स ड्युटि इज डेथ ऑफ लव...

जॉनवर कर्णा सारखाच अन्याय झालाच ! तो बास्टर्डच राहिला असता तरी फरक पडला नसता..टार्गेरियन असल्याची जोड कशाला असं वाटून गेलच >>> अगदी अगदी... तसं पहायला गेलं तर तो ही शेवटचा टार्गेरीयन लॉर्ड उरला होता, फक्त ग्रेवर्मच्या सांगण्यावरून त्याला आऊटलॉ केलं.. स्टार्क घराणं आता सगळ्यात ताकदवान आहे, आणि ते जे म्हणतील, ते होऊ शकत असतांना, एकट्या जॉनलाच फक्त शिक्षा मिळाली आणि टिरीटिला हँड ऑफ द किंग???

हुश्श ! संपला शेवटी सिहासनाचा खेळ, सिहासन तरी कुठं राहिल म्हणा
हा सीजन बघताना मात्र सतत काहीतरी राहिल्याची भावना येत राहिली
डॅनी बद्दल खूप वाइट वाटलं आयुष्यभर एकाच ध्येयाचा पाठलाग केला
आख्या जगाशी लढली आणि सगळं साध्य करून काय तर प्रेमाच्या माणसाकडून
मरण. ती नसती तर आज नाईट किंगच राज्य असत.. मिस यु डॅनी
शेवटी टिरीयन म्हणतो त्याप्रमाणे लोकांना काय एकत्र आणत? तर स्टोरीज
ब्रान कडे ते आहे त्यामुळे वेस्ट्रोजला सुखाचे दिवस येतील आता
पण एक प्रश्न पडला किंग्स लँडिंगला तर प्रजाच राहिली नाही
मग आता काय उरलेले लोक लपाछपी खेळतील का काय ?
त्यांनाच प्रजा वाढवावी लागेल आता Happy

असो सगळ्याच बाबतीत जब्राट एक्सपेरियन्स दिला गॉट ने ..
अलविदा गेम ऑफ थ्रोन्स

आज ५ वा भाग पाहिला. काही तरी च शेवट केला आहे. अगदी पटापट उरकून टाकला असे वाटले. पण आता थोडा twist हवा

1. Game of thrones cast at Canon O'Brian part 1 https://youtu.be/jEVP7lrENFM
2. Game of thrones cast at Canon O'Brian part 2
https://youtu.be/n4jX3KV6tRU

खूप लोकं नाहीएत यात पण तरीही खूप दिवसांनी सगळ्यांना बघायला ऐकायला मजा आली. GoT चा शेवट जरी अपेक्षाभंग करणारा होता तरी ही सिरीज सर्वोत्तमांपैकी एक आहे यात शंकाच नाही! सध्या वेळ असल्याने अनेकांना हे भाग बघता येतील म्हणून इथे लिंक्स दिल्या आहेत!
Lone wolf dies but pack survives!

3 दिवसा आधी सिरिजि पाहून संपवली, 3 दिवस इथली चर्चा वाचली, शेवट एकदम खराब झाला, एक म्हणजे आपली राणी मारून टाकली तरी डोथ्राकी आणी अनसलीड ने जॉन ला जीवन्त ठेवलंच कस? तो तीन डोळ्या कावळा काय प्रकरण आहे ते नीट कळलंच नाही, जॉन ने डेनिरीयस ला का मारलं हे त्याला ही माहीत नाही. आर्या एकदम उडत येऊन नाईट किंग ला मारते लाखो जीवन्त असलेले मूडदे पार करून?? शेवटचे दोन सिजन गंडलेत, आर्याच्या पोटात चाकू मारून देखील ती जीवन्त राहते तिथूनच सर्व काही गंडायला सुरुवात झाली.

Pages