"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी परवा एपिसोड बघताना जीओटी इन्स्पायर्ड गोड पदार्थ बनवला होता. साधारण खोलगट डिश मध्ये व्हेनिला आइसक्रीमची अर्धगोल किम्वा आयता कृती फ्रोझन वडी ठेवली उभी. त्याला लागून. हापूस आंब्याचे जर्द केशरी तुकडे लांबट ठेवले. फायर व आइस. असेल घरी तर मध्येच
जर्द लाल रंगाचा स्ट्रोबेरी सॉस चे ठिपके टाकता येतील व प्लास्टिकचा ड्रॅगन रोवता येइल.

आइसक्रीमचा चमचा तलवारीच्या मुठी सारखा डिझाइन असलेला मिळाला तर ग्रेटच. करुन बघा एकदा बंधु भगिनिन्नो.

काय नुसते मेलीसांद्रे करत बसलाय. आयपीएल फायनल बघा नीता भाभीनी तंत्रशक्तीच्या जोरावर सामना एकहाती जिंकवून दिलाय.

बादवे s04e07 मधे बाथटबात बसलेली मेलिसांद्रे नेकलेस न घातलेली आणि तरीही तरुण आहे बरं का Proud

मला आवडला एपिसोड. काही ठिकाणी धक्के आहेतच. पण ऑव्हरॉल मस्त. आता प्रिक्वीलच्या प्रतीक्षेत.

क्वीन इन द नॉर्थ!!!

मला पण एपिसोड आवडला. ग्रे वर्म इतक्या झटकन रिकव्हर होईल असे मात्र मला वाटले नव्हते.
त्या भिक्कारड्या ब्रॉनला मास्टर ऑफ कॉइन बनवणे म्हणजे शुद्ध मुर्खपणा पण टिरियनकडून अजून काय अपेक्षा करणार! मला टिरियनचा रोलच आवडला नाही आख्ख्या सिझनमध्ये. शेवटी जॉनने घोस्टला कुरवाळलं हे बघून भारी वाटलं.

थोडक्यात काहीही काँट्रीब्युशन न देता बॅनराव सत्ता उपभोगते झाले. टिरियन आणि त्याचे क्रोनीज ह्या त्रिकालज्ञान्याच्या परस्पर फालतुगिरी करू धजतील असे वाटत नाही. तरी जनतेचे भले व्हावे यासाठी पॅशनेट असणारा वॅरीसनंतर कोणीही नसणार आहे.

*स्पॉयलर

मला जाम आवडला शेवट. ब्रानला जेव्हा जेमीने पहिल्याच एपिसोडला ढकलून दिल होतं ना, तेव्हाच बॉलीवूड स्टाईलमध्ये वाटलं होतं, ये बच्चा आगे जाके हिरो बनेगा. तसलं काही न होताना बघून वाईट वाटायचं, पण आज अचानक तसं होताना बघून आनंद झाला.
माझ्यासाठी तरी हा शेवट गोड गोड झाला. सांसा, आर्या, ब्रान जानराव सगळे जिवंत राहण्याची शक्यता फार कमी होती, पण राहिलेत हे बघून तर अजूनच आनंद झाला.
टीरियनच पात्र मात्र शेवटाकडे येताना 'बिचारा बौना' असंच झालं.
डॅनीविषयी कधी काही वाटलंच नाही, त्यामुळे तिच्या मरणावर दुःख झालं नाही. तिचा शेवटही टिपिकल बॉलीवूड स्टाईल झाला. जॉन मेला असता तिच्याबरोबर तर अजून आनंद झाला असता.
आता उत्सुकता आहे पुस्तकाची. मात्र मार्टिनबाबा असा सपक शेवट करणार नाही याची खात्री आहेच.

तिचा शेवटही टिपिकल बॉलीवूड स्टाईल झाला. >>> ती सत्तांध व मह त्वाकांक्षेने वेडी होत होती. लोकाचे फ्यु चर बदलायचे, जग चांगले बनवायचे पण त्यात त्यांना काही चॉइस नाही. ही ठरव णार, मेगॅलो मॅनिआचे क्लासिक लक्षण. वॅरेसने जॉनला सांगितले होते मेन विल डिसाइड हु बिकम्स रुलर. डेनी एकदम जबरी वाटत होती सीझन सिक्ष परेन्त. काल मी तिचे इव्होलुशन पाहिले युट्युब वर ४६ मिनिटाचा व्हिडीओ आहे. तेव्हा लक्षात आले कि ती पहिल्या पासूनच जाळपोळ करायला उत्सुक व थंड हृदयाने लोकांना मारायला काही कमी करत नाही. टार्ली लोकांना मारले जाळू न तेव्हा पासून तिच्या वरचे प्रेम कमी होत गेले. आता तर काय जगच जिंकायला निघालेली बहुतेक असेच. जाळून. ड्रॅगन तिला मोर्न करतो व बॉडी घेउन जातो ते एकदम बघताना भरून आले. आई ती त्याची. ड्रॅगन तिन्हीजगाचा आई विना ड्रकारिस.

ब क वा स!!! काही म्हणजे काहीही आवडलं नाही शेवटच्या एपिसोड मधलं. शेवट बंडल केलाच डायलॉगही अगदीच सपक.
कशाचा कशाला पत्ता नाही. पहिली इतकी डिटेल आणि ठाशीव घडवलेली कॅरेकटर एकदम वेड लागल्यागत पायपोस नसल्यागत वागताना बघून क्लेश झाला.
लोकांनी शेवट बदला ची पिटीशन केल्येय अशी बातमी गेल्या आठवड्यात वाचून हसायला आलेलं, आता ती पिटीशन साईन करावीशी वाटत्येय.
Angry

काल मी अपडेट्स मध्ये वाचले की जॉर्ज आर आर मार्टिन साहे बांच्या पुस्तका नुसार प्रत्येक व्यक्तिरेखेस न्याय देउन क्लोजर द्यायचे तर अजून पाच सीझन लागले असते. तेव्हा अगदी मनापासून वाटले की करायचे होते ना पाच सीझन. किसने मना किया था. एव्ढा लॉयल प्रेक्षक वर्ग आहे. काय बिघडले असते.

आता प्रिक्वील येणार आहेत त्या पुस्तका नुसा रच हव्यात.

भग्न शहराचे अवशेष , राखेतून चालणारे लोक वगैरे दृश्ये आवडली. म्हणजे चांगली घेतली आहेत. जॉन कसाही करून गोड दिसतो. जेल मध्ये सुधा. केस छान वाढलेले व काय ग्रे कलरचा टॉप घातला होता त्यात एकदम क्युट क्युट दिसत होता. जेमी सर्सी वाचतील असे मला वाटत होते पण नाही. वारलेच ते. डेनीचा स्पीच एकदम हिटलरची आठव्ण करून देत होता. शहारे आले. सत्ता माणसाचे काय करू शकते. असे
वाटले.

सान्सा बाई नेहमी प्रमाणे मुत्सद्दी गिरी करून स्वातंत्र्य पदरात पाडले. व शेजारी भाउच राजा सो इट इस अ स्वीट डील फॉर हर. काय दिसते राणी म्हणून वा वा. आईबापे गेली तरी सर्व मुलांचे चांगले झाले . जुना मोल्ड कचर्‍यात घालून सर्व नव्याने सुरुवात. असा शेवट.

आजचा शेवट काही आवडला नाही. एकतर रियलिस्टिक म्हणून सिरियलची सुरुवात झालेली होती आणि शेवट अगदीच बॉलीवूड पद्धतीने....
मग आधीच्या लोकप्रिय पात्रांची विनाकारण आहुती दिली या सिरियलच्या यज्ञकुंडात.

या भागात दोन गोष्टी पाहताना समाधान वाटले.
१) डेनेरीस जेव्हा ड्रॅगनवरून उतरून चालत येते आणि पार्श्वभूमीवर ड्रॅगनचे पंख असतात तेव्हा असे वाटते कि तीच ड्रॅगन आहे.
२) डेनेरीसला जॉनने मारल्यावर ड्रॅगन सिंहासन आगीत वितळवून टाकतो, ज्या सिंहासनासाठी भयानक युद्ध झाले तेच नष्ट झाले. जणू ड्रॅगन माणसांना संदेश देतोय. काव्यात्मक न्याय (Poetic Justice)

शेवट अगदीच उरकल्यासारखा झालाय. राजा झालेला ब्रान नक्की आहे तरी कोण ? ब्रान स्टार्क की थ्री आईड रेवण ? ब्रानने त्याच्या स्वप्नात ड्रॅगॉनची सावली किंग्स लँडिंगवरून जाताना बघितली होती. याचा अर्थ पुढे काय होणार हे नक्कीच माहीत असणार. आणि तो राजा होणार हेदेखील त्याला कळलेले असणार. एवढा मोठा संहार आणि विध्वंस त्याने का थांबविला नाही ? थ्री आईड रेवणने जाणीवपूर्वक ब्रानला निवडून त्याचा अंश ब्रानमधे राहील अशी व्यवस्था केली, परस्पर नाईट किंगचा काटा काढला, डेनेरीसकडून संहार घडेपर्यंत वाट पाहून योग्य वेळ येताच स्वतःची निवड घडवून आणली.
थ्री आईड रेवण हा चिल्ड्रेन ऑफ फॉरेस्टचा (जंगलाची मुले) प्रतिनिधी होता. आणि आता तोच राजा आहे. प्रथम माणूस आणि जंगलाची मुले यांच्यातील लढाईत, चिल्ड्रेन ऑफ फॉरेस्टनी अप्रत्यक्षपणे आपला प्रतिनिधी राजा बनवून वेस्टरोजवर सत्ता प्रस्थापित केली आहे??

अमा, मस्तं पोस्ट Happy
आज खरच हिटलरची आठवण आली तिची डिक्टेक्टरशिप बघून, फायनली आइस अँड फायर पर्वं संपलं !
डॅनीची जग जिंकायची मह्त्त्वांकांक्षा, मातृभाषेत व्हिक्टरी स्पिच , त्या आधी ड्रॅगनवरून ग्रँड आगमन, तिच्या कळ्या ड्रेसच्या बॅक्ग्राउंडला जेंव्हा ड्रोगॉनचे पंख दिसतात, डोथराखींचा जल्लोष, ड्रोगॉनचा जल्लोश, फार मस्तं जमून आला तो सीन !
असो, तर फिनाले...
आज चक्क अपेक्षेप्रमाणे झाल्या बर्याच गोष्टी !
महापराक्रमी डॅनीला आयर्न थ्रोनपाशी पोचूनही शेवटच्या क्षणाला नो आयर्न थ्रोन , ब्रॅन बद्दल फॅन्सच्या अफवा खर्या निघाल्या आणि अ‍ॅक्चुअली मेड सेन्स , पहिल्या एपिसोडपासून गेम ऑफ थ्रोनचा ब्रॅन मेजर पार्ट होता आणि ३ आय रेव्हन बनल्यापासून तोही हा गेम खेळत होता Happy
तो आधीही बरेचदा म्हंटला कि त्याला कुठलाच लॉर्ड बनायच नव्हतं, कारण त्याला ‘द किंग’ बनायच होतं Happy
व्हाय हि ट्रॅव्हल्ड ऑल द वे टु किंग्ज्लँडींग अफ्टरॉल Wink
ड्रोगोन त्याच्या अग्निमातेला घेऊन दूर पूर्वेला उड्डाण करून गेला , कदाचित एखाद्या नवीन रेड वुमन प्रिस्टच्या शोधात जी डॅनीला आयुष्यात पुन्हा परत आणेल !
जाण्या आधी ड्रोगॉनने आयर्न थ्रोन वितळवलं कारण नव्या राजाला कस्टम व्हिलचेअर लागते.
बाकी स्टर्क पुत्रं , कन्या जीवन्त राहिल्या , आपापल्या परीने जिथे खुष रहातात तिथेच गेले, आज क्रिप्ट मधल्या पूर्वजांना , नेड कॅटलिन रॉब फायनली ऑल विल रेस्ट इन पिस !
जॉन नाइटवॉचला गेला, सान्सा स्वतंत्र राज्याची the queen of North, आर्या नोवन द एक्स्प्लोअरर नवीन किनारे शोधत निघाली , टिरिय्स्न किंग्ज हँड , ब्रॉन हायगार्डनबरोबर मास्टर ऑफ कॉइन्स ??? सॅम द ग्रँडमिस्टर , सर डोरास कमांडर ऑफ नेव्ही, अनसालिड गेले मिसांडेच्या नाथांबरोबर नाथला, expected Brienne to stay with Sansa as per her oath.

जाता जाता .. जॉनवर कर्णा सारखाच अन्याय झालाच ! तो बास्टर्डच राहिला असता तरी फरक पडला नसता..टार्गेरियन असल्याची जोड कशाला असं वाटून गेलच, अर्थात तरीही शेवटी जॉन तिथेच खुष आहे हे ही खरेच , घोस्टला हग मिळाली, खरा गोड शेवट !

घोस्टला हग मिळाली, खरा गोड शेवट !>> हो घोस्टुल्या पपुल्या लगेच सर्वांच्या पुढे बाहेर पडल्यावर. मागे फॅण्टम सारखा जॉन राव घोड्यावर.
आता त्यांना भीती दाखवायला तिथे कोणी नाही. त्याचा जीव तिथे बर्फातच शांत रमतो बहुतेक. बाहेर घालवलेली बिना फॅमिलीची माण से सुखात राहिली.

थ्रोन जळले तेव्हा मला कसे तरी झाले. सत्तेचे चिन्हच ते. मोह असतोच आपल्या मनात. इतक्या जवळ येउन तिला काही मिळाले नाही ते.
आर्या बेस्ट एक्स्प्लोअर करायला दूर निघून गेली. खरे तर घराच्या वाटण्या झाल्यावर येते तस्ले रिकामे फीलिन्ग आले. मुले आपापल्या दिशांना निघून गेली. टिरीअन आणि कंपनी किंग्ज लँडिंग मध्ये मौज मजा करत ऐयाशी करत वेळ घालव णार. कौन्सिलच्या आधी टिरेअन खुर्च्या नीट करतो तो सीन मस्त आहे. त्याच्या डोळ्यात कळते की खरी सत्ता त्याच्याच हातात आहे. एक क्षण डोळे अगदी कठीण होतात.

पण आता सर्वांनी केस कापावेत एकदा तरी व आंघोळ दाढी करावी असे माझे विनम्र मत आहे.

बाय द वे, ते ‘ब्रॅन द ब्रोकन‘ टायटल इन्स्नेसिन्सिटिव् नाही का वाटलं Happy ??
आता पहिल्या सिजनचे भाग आठवतायेत.. मेकर्सनी खरच सगळं आधीपासूनच विचार केलेलं होतं का ?
टिरियनला पहिल्याच भेटीत ब्रॅन बद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होतो ,त्याच्यासाठी कस्टम हॉर्स सिट डिझाइन घेऊन पुन्हा व्हिनिट करतो !
I have a tender spot in my heart for cripples and bastards and broken things ~ Tyrion
जॉन बद्दलही पहिल्याच भेटीत सॉफ्ट कॉर्नर असतो त्याला यामुळेच !

बाकी तो वेडु रॉबिन लैच ताडमाड वाढला, कोणीतरी ट्विट केलं होतं कि बहुदा रॉबिनने व्हेलमधे बास्केटबॉल टिम जॉइन केली Biggrin

आर्या बेस्ट एक्स्प्लोअर करायला दूर निघून गेली. खरे तर घराच्या वाटण्या झाल्यावर येते तस्ले रिकामे फीलिन्ग आले. मुले आपापल्या दिशांना निघून गेल
<<
True !
Pack of wolves survives, a lone wolf dies Sad
That's why it's bitter sweet I guess.

मला इतका काही बकवास नाही वाटला एपिसोड. त्यातल्या त्यात फिटिंग शेवट.
व्हिजुअल्स फार भारी होती एकेक! जळून बेचिराख झालेले किंग्ज लँडिंग, भग्न पायर्‍यांवर उतरलेला ड्रोगॉन आणि त्याच्या मॅजेस्टिक विंग्ज च्या बॅकग्राउंड ला चालत येणारी डॅनी!! खतरनाक होता तो सीन!
दुसर्‍या सीझन मधे हाउस ऑफ अनडाइंग मधे दिसलेल्या व्हिजन प्रमाणेच डॅनीला थ्रोन जवळ पोहोचूनही ते न मिळणे, तिथेच तिचा जॉन च्या हातून म्रूत्यू हे फिटिंग होते एकदम. ड्रोगॉन ने थ्रोन जाळणे पण जॉन ला न मारता डॅनीला घेऊन दूर उडून जाणे हेही.
शेवटी सगळे उरले सुरले लॉर्ड्स जमले ते बघून डिप्रेस्ड व्हायला झाले खरोखर! काय एकेक ग्लोरियस लोक होते वेस्टरोस मधे - नेड, टायविन, ओलेना, ओबेरिन, जेमी, सर्सी, व्हॅरीस, लिटलफिंगर सगळे डोळ्यापुढे येऊन गेले .... आणि हे राहिलेले लॉर्ड्स सगळे एक से एक लूजर्स नाहीतर उपटसुंभ ! इन अ वे हे इनएव्हिटेबल होतेही( महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती ? Lol )
शेवटी ब्रान किंग होणार ही थिअरी फिरत होती सो.मि. वर. पण विरक्ती आलेल्या ३ आइड रेव्हन ने किंग होणे आणि गुंत्यात पाय अडकवून घेणे हे फिटिंग आहे की नाही हे अजूनही ठरवता आले नाही. स्टार्क किड्स चा एकूण त्यांना हवा तसा शेवट झाला. जॉन चे मात्र स्टेटस ( ना स्टार्क्स का ना टार्गॅरियन्स का !) पुन्हा तिथेच आले!! तेही फिटिंगच वाटले त्याचा एकंदर ग्राफ पहाता. त्याला कधीही कुठलीही पोझिशन लाभलीच नाही. (एखाद्या स्टॉक ची प्राइस वाढून ऑल टाइम हाय होऊनही तो योग्य वेळी कॅश न करता पुन्हा पडून त्याच किमतीला आल्यामुळे ते प्रॉफिट व्हर्चुअलच राहणे तसे काहीसे! Happy )
सो धिस इस इट! वर्षानुवर्षे चाललेला थरार, चर्चा, असंख्य थिअरीज, धक्के, हार्टब्रेकिंग आणि हार्टवार्मिंग सीन्स .... सगळंच मॅजिकल होतं! काउंटलेस मेमरेबल मोमेन्ट्स !! गुडबाय गॉट!!

<<जॉनवर कर्णा सारखाच अन्याय झालाच >>
अगदी! जॉन पण कर्णासारखाच. खरे कळले तरी त्याचा फायदा न घेता, त्याच्या मते जे कर्तव्य तेच केले. नाहीतर त्याला राज्य मिळाले असते, त्याची इच्छा असती तर.

तर मंडळी, ब्रॅनच सगळी सूत्र पडद्यामागुन हलवत असतो असं समजायला हरकत नाहि. जॉनचं जन्मरहस्य सांसा द्वारे फोडण्यापासुन टिरियनचा योग्य वापर (मला शंका आहे कि जेंव्हा जॉन टिरियन ला तुरुंगात भेटायला जातो तेंव्हा टिरियननेच डॅनीला मारायची आयडिया त्याला दिली असावी); असो. शोच्या शेवटाबाबत माझ्या मिक्स्ड फिलिंग्ज आहेत. बिच्चार्‍या डॅनीच्या नशिबात अगदि सुरुवाती पासुन शेवटा पर्यंत संघर्षच आला...

हा सिझनंच घाईघाईत उरकल्यासारखा वाटला. निवांतपणे अजुन दोनतरी सिझन करुन मालिका संपवायला हवी होती. दोन वेगळ्या प्रिक्वेलच भूत प्रोडुसर्सच्या मानेवर असल्याचं हे फळ असावं...

हो दोन सीझन्स हवे होते नक्कीच. एक नाइट किंग बॅटल आणि दुसरा गेम ऑफ थ्रोन साठी. खूपच काही उरकावे लागले ६ भागात. कसेही केले तरी रश्ड वाटणारच होता हा सीझन.

अतिशय सुमार लेखक Dan & Dave यांनी शेवटचे २ सिझन गुंडाळुन ठेवले.
जसे GRRM चे लिखाण संपले तसे सिझन बाळबोध झाले.
पार वाट लावली अतिशय सुंदर सिरिज ची.

मी कुठेतरी वाचले की HBO तयार होतं शेवटचा सिझन १० भागांचा करायला पण D&D ला घाई होती. त्यांना Star Wars च्या ३ ही भागांच्या लेखनाची जबाबदारी दिली आहे.

Pages