"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेस चेन्ज करून वॉल्डर फ्रेला एकट्याला नाही मारत आर्या , त्या मुलीचा फेस लाऊन फ्रे ला आणि फ्रे चा फेस लाऊन इतर अनेक सैनिकांना/ अख्या फ्रे स्टाफलाही पॉयझन वाइन देऊन मारते जिथे रेड वेडींग घडलेलं असतं ती सेम जागा.
त्या आधी आर्या ब्रावोसच्या ब्रोथेल मधे फेस चेन्ज करून सर मेरीन ट्रँटला सुध्दा भोसकते , जॉफरीच्या आदेशानी सिरिओ फोरेलला मारतो तेंव्हा तिच्या लिस्टवर असतो, अचानक ब्रावोस मधे दिसतो.
बाकी मै + १
तो झोप लागलेला सिझन पहा पुन्हा आर्याच्या ट्रेनिंगचा, फेसलेस गॉड पुजणारे माणसाचे चेहरे सोलून चिकटवण्याची कला आत्मसात करतात , या शिवाय माणसांना मारायची फाइन किलिंगची टेक्निक्स, पण माणुस प्राणी नाही बनत कै Biggrin
ड्रोगॉन मारणे इतके सोपे नाही, ड्रोगॉन आहे म्हणून डॅनी सर्वात जास्तं पॉवरफुल आहे, ड्रोगॉन नही तो कुछ भी नही !
आर्याच काय कोणीही योध्दा ड्रोगॉनला सहज मारु शकत नाही म्हणून तर सगळी अग्निवर्षा झाली , तो काही साप नाही सपासप मारून स्किन सोलायला Proud

Stark kids are so well mannered. Bran said thank you. Arya said thank you.

तिसरा ड्रॅगन जानरावांना वश होइल. तो बहुतेक नो ड्रकारीस असे ओरडेल मग ड्रॅगन आग गिळून गप बसेल.

पुस्तकात दोन टार्गेरियन जिवंत दाखवलेत आणि जॉन कोण आहे ते गुलदस्त्यात आहे. मार्टिनबाबा कसे जोडतो ते धागे कोणास ठावूक

>>फेस लेस गॉड कडे इतकी वर्षे धुणी भांडी केर लादी करुन त्याचा ढिम्म काही उपयोग करू शकत नाहीये आर्या.<<
मलासुद्धा ते खटकलं. पण यात दोष आर्याचा नाहि, लेखकांचा आहे, असं मानुया. Happy

फेसलेस मेन आर ऑल्वेज ऑन ए मिशन; ते कधी भावनेच्या आहारी जाउन मिशन अ‍ॅबॉर्ट करत नाहित. हाउंडच्या विनंतीला मान देउन आर्या मागे फिरली; ये बात कुछ हजम नहि हुइ. होपफुली तिने तिचं सगळं ट्रेनिंग अनडन केलं नाहि अशी आशा बाळगुया... Proud

तिला कोणी सुपारी दिलेली नाही सर्सीची. त्यामुळे अबॉर्ट असं नाही म्हणता येत. पण अ गर्ल हॅज सेड अ नेम. म्हणजे सर्सी चा बळी मेनी फेस्ड गॉड ला मिळणारच होता. तो मिळाल्याशी कारण.

>> पण यात दोष आर्याचा नाहि, लेखकांचा आहे >> राज, अहो आर्या काय किंवा इतर कुणीही! कुठल्याही पात्रांच्या पोट्रे केलेल्या स्वभावाच्या विपरित वागणूक दिसली आणि ते करण्याची शून्य मिमांसा दिली तर दोष नेहेमीच लेखलाचा असणार ना?

अपवाद अर्थात खालिसी. कायम चेहेर्‍यावरची माशी न उडता वागणे, राग, लोभ, आनंद, बिट्रेअल सगळ्यात भावनाशून्यता तोंडावर ठेवून वागणे इज अ स्किल! लेखक कॅन नॉट पोट्रे! Wink

थ्रोन जर किंग्स लँडिंग मधेच आहे .. तर आता आगीने वितळल असणार
मग आता कशावर बसायच ? परत थ्रोन बांधव लागेल
डॅनी ने वन साईड मॅच मारली.. एकच हिटर शिल्लक होता तरी
हिरो टू व्हिलन झाली एकाच एपिसोड मध्ये Sad
सर्सि ला अजून मरायच नव्हत .. अग बाई तुझ्या माजूरड्या पनामुळेच
निरपराध प्रजा मेली.. तिला ड्रॅगननी जाळल असत तर भारी वाटलं असत मला
टिरीयन -जेमी सिन भारी होता
बाकी दोन बायकांच्या हट्टापायी सुंदर शहर आणि लोक्स कोळसा झाले

गेम ऑफ थ्रोन्समधील आठव्या सिझनमधील पाचवा भाग हा युद्धाची तिसरी बाजू आपल्यासमोर अतिशय प्रखरपणे सामोरे आणतो. युद्धात लढणारे दोन पक्ष तर असतातच परंतु जी सामान्य जनता युद्धात आकारणपणे ओढली जाते, होरपली जाते, भरडली जाते त्याचे अतिशय प्रभावी चित्रण या भागात केले आहे. राजकारणात आणि युद्धात पाटावरचे मोहरे दुसरेच कोणीतरी दूर बसून हलवत असतात. तसेच प्रसंगी संधी मिळाली तर सज्जन वाटण्याऱ्या व्यक्तीही क्रूरतेने वागू शकतात. मानसिक संतुलन हरवलेल्या व्यक्तीकडे जर अमर्याद शक्ती असेल तर त्याला थांबविण्याचे सर्वांचे प्रयत्नही तोकडेचे पडतात.

युद्धातील नरसंहार आणि रक्तपात अगदी पूर्वापार चालत आलेला आहे. सम्राट अशोकालाही कलिंगातील युद्धात झालेली प्राणहानी आणि विध्वंस बघितल्यानंतरच उपरती झाली होती. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातही लाखो लोकांचा बळी गेलेला आहे.
हुकूमशदेखील फक्त कोणत्या एका कारणामुळे तयार होत नाही तर त्यापाठीमागे कारणांची एक शृंखालचं असते. दुसऱ्या महायुद्धापूर्वी हिटलरचाही उदय याचप्रकारे झाला होता. जेव्हा मित्र राष्ट्रांनी जर्मनीतील बर्लिन ताब्यात घेतले तेंव्हादेखील अशा प्रकारचा काहीच हिंसाचार झालेला नसेल असे कोणी ठामपणे सांगू शकणार नाही. कदाचित त्याची व्याप्ती आणि प्रकार ज्यूंच्या छळाच्या प्रमाणात सौम्य असू शकेल. जपानवर झालेला अणुबॉम्ब हल्ला कोणी विसरू शकेल काय ...
आणि फाळणीच्या जखमा अजूनही भारतीय उपखंडात ताज्या आहेत.

या युद्धात डॅनेरिसने वेस्टरोजवर Total War (सर्वंकष युध्य) लादले. अशाच प्रकारची निती चंगेज खान आणि मंगोल आक्रमकांनी १२ व्या शतकात वापरली होती. त्याकाळी मंगोल सैन्याने शहरेच्या शहरे संपूर्णपणे उध्वस्त केलीली होती. इतक्या प्रचंड प्रमाणात नरसंहार आणि प्राण्यांचाही कत्तली केल्या होत्या की घटलेल्या लोकसंख्येमुळे पृथ्वीचे तापमान कमी होऊन अत्यल्प काळासाठी एक छोटेसे हिमयुग आले होते.

पुस्तकात दोन टार्गेरियन जिवंत दाखवलेत आणि जॉन कोण आहे ते गुलदस्त्यात आहे. >>> गुलदस्त्यात कुठे? सगळ्या मेन लोकांना माहिती आहे की तो टार्गेरियन आहे ते..

नवीन Submitted by सच्चा on 14 May, 2019 - 15:43
<<
परिक्षेत अमुक उतार्‍याचे सार लिहा स्टाईल प्रश्न ५ मार्काला आला की कसं लिहितात? तसं वाटलं वाचून. Light 1

की घटलेल्या लोकसंख्येमुळे पृथ्वीचे तापमान कमी होऊन अत्यल्प काळासाठी एक छोटेसे हिमयुग आले होते.
<<
वॉर इज द बेस्ट रेमेडी फॉर ग्लोबल वॉर्मिंग. इट्स अ वॉर्मिंग थॉट. लय भारी बर्का.

ग्लोबल वॉर्मिंग पोस्ट नंतर एलिझाबेथ मे नाव वाचून काहीतरी वेगळं एक्सपेकट केलेलं Lol
एलिझाबेथ मे कॅनडा मधील ग्रीन पार्टि ची लीडर आहे.

आर्या faceless नाही झाली. शेवटी ती त्या faceless म्हणते ना "girl has name aarya stark" तिला technique येते पण ती त्या पंथाची सदस्य नाही. जसा जॉन नाइट वॉचचा मेंबर नाही.

वॉर वॉज नॉट प्रिव्हेंटेबल. (जळून उरलेल्या) लोकांच्या मनात भय निर्माण झालं पाहिजे. राजा (राणी) बद्दल जनतेत भय पाहिजे असं खालिसीला वाटतं. प्लस आग ओकणार्‍या व्हीएफएक्स इंजिनिअरची रिक्वायरमेंट फिल झालेली. Wink

चौथा सिझन बघून झाला. बऱ्यापैकी आवडला.
थिऑन ग्रेजोयचं काय करून टाकलंय त्या रामसेने. आणि थिऑनला सोडवायला गेलेली यारा, रामसेने तुरुंगाला आतून चावी लावून बंद केलं तरी बाहेर कशी येते? रामसेशी निगोशिएट करून? आणि तो देतो तिला सोडून एवढया सहज?
टिरियनसोबत व्हेरीसपण गेला का किंग्ज लँडिंगसोडून?
आणि सान्सा लिटल फिंगरला सिड्यूस करायचा प्रयत्न करतेय कि सेक्स केलं त्यांनी?

आणि I will answer injustice with justice म्हणणारी खलिसी फंडामेंटली गुड, सद्उद्देश वगैरे असणारी नाहीय हे हळूहळू लक्षात येतंय.

>>टिरियनसोबत व्हेरीसपण गेला का किंग्ज लँडिंगसोडून<<
हो, बहुतेक. (माझ्या मते वेरसचं कॅरेक्टर वाया घालवलं आहे पुढे. हि इज सपोज्ड टु बी ए किंगमेकर)

>>आणि सान्सा लिटल फिंगरला सिड्यूस करायचा प्रयत्न करतेय कि सेक्स केलं त्यांनी?<<
इट्स अदर वे अराउंड. नाहि/नसावं (बाकि मार्टिनकाकाच जाणे...)

प्रत्येक एपिसोडच्या शेवटी (क्रेडिट्स स्क्रोल नंतर) डायरेक्टर्स्/रायटर्सची कामेंटरी आहे. त्यात बर्‍यापैकि उत्तरं सापडतील...

> हो, बहुतेक. (माझ्या मते वेरसचं कॅरेक्टर वाया घालवलं आहे पुढे. हि इज सपोज्ड टु बी ए किंगमेकर) > हम्म. पळून जावं लागलं त्याला, टिरियनमुळे..

> इट्स अदर वे अराउंड. नाहि/नसावं (बाकि मार्टिनकाकाच जाणे...) > लिटल फिंगरने सान्साला किस केलं आणि तिने (थोड्या वेळाने) त्याला ढकलून दिलं इथेपर्यंत सान्सा निर्मळ वाटते. पण पुढे लायसाच्या मृत्यूच्या चौकशीत ती (लिटल फिंगरच्या बाजूने) खोटी साक्ष देते त्यानंतर तिने लिफिला दिलेला लूक, नंतर तो तिच्या खोलीत येतो तेव्हा ती तोंडात जीभ घोळवत I think I know what you want म्हणते. इथे सीन कट झालाय. यानंतर ती जेव्हा दिसते तेव्हा तिने क्लिवेज दिसेल असे सिडक्टिव्ह कपडे घातलेत आणि ती-लिफि परत एक्सचेंज लूक.

> प्रत्येक एपिसोडच्या शेवटी (क्रेडिट्स स्क्रोल नंतर) डायरेक्टर्स्/रायटर्सची कामेंटरी आहे. त्यात बर्यापैकि उत्तरं सापडतील... > माझ्याकडे असलेल्या पायरेटेड कॉपीजमध्ये नाहीय हे.

माझ्याकडे असलेल्या पायरेटेड कॉपीजमध्ये नाहीय हे.>> हॉट स्टार प्रिमीअम वर एच डी व्हर्जन पण उपलब्ध आहे. मला परवाच लक्षात आले. व्हिडीओ चे आटो से टिंग आहे व त्या खाली एच डी , फुल एच डी अश्या ऑप्शनस आहेत. काल मी आर्या ने केलेले खून असा री कॅप बघत होते
ट्युब वर. शिकत शिकतच मोठी झाली आहे आर्याबाई. सर्व सुरु वातीला काय लहान व गोड दिसतात.

त्यात लिटिल फिंगर ची मरायच्या आधीची साक्ष आहे. जीव वाचवायचा शेवटचा उपाय म्हणून तो सान्साला आय लव्ह यू म्हणत तो तर ती फ्रीझिन्ग लुक देते.

> तो सान्साला आय लव्ह यू म्हणत तो तर ती फ्रीझिन्ग लुक देते. > लिफिचे आपल्यावर प्रेम आहे अशा समजुतीत सान्सा कधीच नसते पण त्याला आपल्या शरीरात (आणि टायटलमधे) रुची आहे हे तिच्या लक्षात आले आहे. ती त्याला फक्त लांबूनच खेळवतीय की तिने शरीराचा वापर चालू केलाय हे कळत नाहीय (कारण मी वरती सांगितलेला सीन कट झालाय, मुद्दाम केलाय)

Pages