"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॅरीस १०० % मरणार आहे, रेड वुमनने सांगितलय त्याला आणि डॅनीनेही सांगितलय कि तिच्याशी डिसलॉयल झाला तर जिवन्त जाळणार त्याला.

गॉट संपल्यावर त्याची कसर भरून काढण्यास कोणते चांगले शो आहेत का ?
मी into the badlands पाहून संपवला काल आणि विशेष म्हणजे त्याचा शेवटचा एपिसोड पण याच आठवड्यात संपला. ऍमेझॉन प्राईम वर आहे उपलब्ध

आत्याबाई आणि तिच्या अमानवीय पोराने तर कहरच केला. त्याच इंधन कधी संपेल याची वाट बघत होतो पण आज तो टाकी फुल करून आला होता.
टिरीअन आणि जेमीच्या शेवटच्या भेटीचा प्रसंग भावला
बाकी जानराव आणि इतर मंडळी आज आठवडी बाजारात फिरत असल्यासारखी वाटत होती.

अरे मॅड क्वीन झाली की खालीसी!
शेवटी आर्या जळालेल्या प्रेताच्या हातात काही तरी बघते ते चटकन जॉन स्नोच्या तलवारीच्या मुठी सारखं वाटलं आणि डार्क वाटू लागलं. मग मागे पुढे करत तो त्या लहान मुलीच्या हातातला घोडा होता याची खात्री पटली.
जळलेलं शहर मात्र भारी दाखवलय!
सांसा वॉज सो राईट. कान्ट ट्रस्ट योर क्वीन जॉन स्नो!
बाकी ग्रेट वॉर मध्ये ड्रॅगन अशी आग त्या नाईट वॉकर वर टाकतील असं वाटत होतं, तर तेव्हा ड्रॅगन एकदम चिडीचूप भलतीकडे उडत बसलेले. ड्रॅगन असून त्या वॉर मध्ये काही उपयोग झाला नाही. आणि आज यड लागल्यागत माणसं जाळली.
हो जिद्दू, जेमी आणि टिरियन चा सीन आवडला.

बाकी ग्रेट वॉर मध्ये ड्रॅगन अशी आग त्या नाईट वॉकर वर टाकतील असं वाटत होतं>>>> त्यानी भरपूर प्रेशर ने आग टाकली होती पण नाईटकिंग च्या अंगावरची धूळ साफ झाली फक्त . नंतर आत्याबाई त्याला घेऊन उडून गेली वैतागून

अमा, टायमिंग आणि चॅनेल सांगा>> अरे मी हॉटस्टा र वर लॅप टॉप वर बघ णार. मेरी मर्जी के अनुसार. घरची सर्व कामे आटोपून. लॅपटोप बोस सिस्टिमला जोड लेला आहे त्यामुळे रामजिन द्विवेदी चे संगीत मस्त ऐकू येते. लेकीला प्रीमीअम घेउन दिले आहे व तिचा आयडी पासवर्ड माझ्या विंडोज सिस्टिम वर टाकवून घेतला आहे.

केबल नाही माझ्याक डे. प्लस वीकांताला बिंज वॉच करेन. आता फिनालेच ना.

Every time a Targaryen is born, the gods flip a coin ~ Cersei Lannister
Targaryen alone in the world is a terrible thing ~ Aemon Targaryen

बरेच निगेटिव सूर ऐकु येतायेत आजच्या एपिसोडबद्दल पण मला आवडला हा सुध्दा भाग (बराचसा), अगदी हेच एक्स्पेक्ट केलं होतं डॅनी कडून !
डॅनी तशी वनसायडेड मॅच खेळली पण ड्रॅगन फायर आणि नंतर वाइल्ड फायर मुळे शहर उध्वस्तं होत जातानाचं धुसर शहर, आगीपासून धक्काबुक्की करत सुसाट पळणारे सामान्य माणसांचे लोंढे, जीवन्त माणसांचा कोळसा होत जाणारी भीषण शान्तता, सूडाने वेड लागलेली डॅनी , ही सगळी व्हिज्युअल्स अंगावर काटा आणणारी होती.
शेवटपर्यन्त जगण्याची आशा ठेवणारी सर्सी बघून टाय्टॅनिक बुडतानाही व्हॉयलिन वाजवत उभे राहणारे वादक आठवले Happy
जेमी मरे पर्यन्त अनप्रेडीक्टेबल राहिला हे ही आवडलं.
टिरियन जेमी सीन आवडला, स्कोअर सेट्ल्ड ऑफ हिज ग्रेट एस्केप !
सर्सी कोणाच्या हातून न मरता जेमी बरोबर मेली हे आवडलं.
आवडलं नाही ते हाउंड माउन्टन फाइट आणि युरॉन जेमी फाइट !
आर्या, टिरिय्स्न , जॉन वाचले खरे आणि ते आता डॅनीला नक्कीच घालवतील पण she has already done the damage !
इतल्या नुकसाना नंतर तिची विकेट घेऊन जिवाला शान्तता मिळेल का ?
असो, समजेलच.. The game is almost over, can’t believe GOT is ending for good !

आता जॉन नी डॅनीला सांगायला पाहिजे, "बस तू करत राज्य. मी चाललो माझ्या घरी विंटरफेल मधे. ह्या कोळश्यापेक्षा माझं विंटरफेलच बरय"..

एक अतिशय भाबडा प्रश्न.

सर्सी आणि जेमी खरंच मेलेत?
कारण फक्त छत कोसळताना बघितलं मी...
गेले असतील खरोखर?

हो बर्‍याच निगेटिव प्रतिक्रिया आहेत. मला इन पार्ट्स आवडला.
एपिसोड स्पेक्टॅक्युलर होता हे खरं! पण बर्‍याच गोष्टी खटकल्या.
डॅनी ने जे केले ते तिच्या कॅरेक्टर प्रमाणे अपेक्षित होतेच. व्हॅरिस चा शेवट, डॅनीचे जॉन , टिरियन शी बोलताना वेडाच्या उंबरठ्यावर असणे. जेमी - टिरिर्यन सीन , सुरुवातीचा ड्रॅगन हल्ला आणि गोल्डन कंपनी आणि सगळे स्कॉर्पियन्स उध्वस्त होणे इथपर्यन्त भारी.
डॅनी ब्रेकिंग बॅड हे पण लॉजिकल होते. पण नंतर तिला प्रत्येक गल्ली बोळ जाळताना दाखवत राहण्यातला थोडा वेळ महत्त्वाच्या कॅरेक्टर्स ना प्रॉपर क्लोजर ** देण्यात घालवायला हवा होता. गोल्डन कंपनी,कायबर्न, युरॉन, जेमीसुद्धा किरकोळीत निकालात काढले. युरॉन आणि जेमीची फाइट तर उगाच वाटली. इट डिड नॉट मॅटर!! मोर दॅन एनीवन, सर्सी डिझर्व्ड मच बेटर दॅन धिस एन्ड. शेवटीही सर्सी इज ऑल अबाउट लविंग हर चाइल्ड हे आवडलं, तिच्या कॅरेक्टर ला साजेसेच. जेमी शेवटाला तिच्यासोबत असतो हेही इंटरेस्टिंग पण अजून टैम हवा होता यार त्यांना! खूप वेळ शहरातली जाळ पोळ आणि जॉन, आर्या अँड कं. ते हेल्पलेसली बघताना दाखवण्यात गेला. रेड कीप कोसळतानाची व्हिजुअल्स स्पेक्टॅक्युलर होती मात्र. पण आता इतके झाल्यावर आयर्न थ्रोन ला आणि कशालाच काही अर्थ राहिलेला नाही. ( व्हिच वॉज एक्सपेक्टेड टू?!)
जॉन अ‍ॅज युज्वल फुकटच इमोशनल, " शिंगरू मेले हेलपाट्यांनी" अशी हालत. टिरियन चा स्मार्ट्नेस अ‍ॅज युज्वल फेल्ड.
आता शेवटच्या एपिसोड मधे डॅनी आणि ड्रोगॉन कसे मरणार हेच बघायचे फक्त. सान्सा , ब्रॅन , जॉन , आर्या चे पुढे काय होणार हेही . नॉट दॅट इट मॅटर्स मच.
** हा एपि. बघताना महाभारताची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. महायुद्ध आणि त्याचा अपरिहार्य विध्वंसक शेवट, पण त्यात प्रत्येक कॅरेक्टर ला कसलं पर्फेक्ट क्लोजर आहे!!

मला पण आवडला कालचा एपिसोड. खिळवून ठेवणारा झाला. बेस्ट वन सो फार धिस सिझन.
डॅनी कडून असा संहार अपेक्षितच होता. तिची व्यक्तिरेखा गेले २ सिझन हळूहळू डार्कर होत जातच होती.
तो संहार बघत असताना जॉनला पटत जात आहे वॅरिस काय म्हणाला ते. सॅम ने जे बोलून दाखवलं, सान्सा जे कानीकपाळी ओरडून सांगत होती.
जॉन मारेल काय डॅनीला?

टिरियन आणि जेमीमधला सीन खरच खूप आवडला. इमोशनल ड्रामा होता खरा पण गरजेचा होता. टिरियन लाइक अ ट्रू लॅनिस्टर पेड हिज डेट.

जेमी आणि सर्सी बरोबर जन्माला आले बरोबर मेले वॉज फिटिंग. डॅनी जशी थ्रोन प्रेमात आंधळी तशी सर्सी तिच्या मुलांच्या प्रेमात. प्रेक्षक म्हणून शेवटी आपल्याला तिच्याबद्दल कणव/दया वाटते हे लेखकाचं यश.

आर्या आणि हाउंडचा लहानसा संवाद पण आवडला. आर्या नीड्स टु लिव अ लिटल. बदल्याने आयुष्य व्यापण्यात अर्थ नाही हे तिला समजून पाथ फिरवून जात होती पण आता जे झालं ते बघता पुढे काय करेल काही सांगता येत नाही.

कालच्या एपिसोड मधला न आवडलेला भाग म्हणजे युरॉन आणी जेमीची अत्यंत बॉलिवुडी मारामारी..
गेम ऑफ थ्रोन्स ला गुड बाय म्हणायची वेळ आली जवळ.

शेवटाला पण महाभारत स्टाईल शेवट दिसतो आहे.. फक्त स्टार्क फॅमिली जिवंत, टिरियन म्हणजे अश्वत्थामा आणि बाकी सगळे उध्वस्त..

मला आवडला हा भाग.

यात डेनेरिइसची नेमकी मनःस्थिती खूप व्यवस्थित दिसते. तिनं लहानपणापासून भावाकडून आयर्न थ्रोन बद्दल आणि तो टार्गेरियन असल्याने खरा वारस कसा आहे हे ऐकलंय. त्यामुळे टार्गेरियनच खरे वारस असं तिला वाटत असल्यास नवल नाहीच. भाऊ गेल्यावर, ड्रॅगन, डोथ्रोकी, अनसलीड असे सगळे तिच्या बाजूनं असताना आता ते सिंहासन आपलंच असं तिला वाटत होतंच. तर मध्येच जॉन आला आणि तिच्या राणीपदाला दावेदार निर्माण झाला. त्यातून ती त्याच्या प्रेमात पडलेली.

नाईट किंग मरेपर्यंत तिला सर्वजण जो मान देत होते, तो अचानक कमी झाला कारण जॉनच राजा होण्यास जास्त लायक आहे हे तिला दिसत होतं आणि इतरही तिला जाणवून देत होते. अचानक आपण उपरे आहोत की काय असं वाटायला लागणं शक्य आहे. वॅरीससारखा सल्लागार आपल्याला मारण्याचा कट करतोय हे कोणाला सहन होईल? जॉन देखिल हात राखून प्रेम करतोय हे आतमध्ये कुठेतरी तिला जाणवतंय. जॉनसाठी प्रेमापेक्षाही त्याची फॅमिली महत्त्वाची आहे हे तिला स्पष्ट झालंय. स्वतः खरा कोण आहे हे त्यानं बहिणींना सांगून सगळा धुरळा उठवून दिला. त्याच्यावरचा तिचा विश्वास संपला. आता तिला कोणाबद्दल काही भावनाच नाहीयेत बहुधा. मला संपवायला निघाला आहात तर मी तुमचा नाश करू शकते या सूडबुद्धीनं तिच्या सारासार विवेकबुद्धीचा ताबा घेतलाय.

आजच्या युद्धाच्या पहिल्याच टप्प्यावर आयर्न फ्लीटची विल्हेवाट लावल्यावर तिचा आत्मविश्वास नको तितका वाढला. शिवाय समोर अभेद्य किल्ल्यात उभी असलेली सर्सेई बघून डेनेरीसचा उरला सुरला विवेक गळून पडला. सर्सेईनं तिची प्रजा किल्ल्यात आणली ती आपल्याला थोपवायला. पण जर प्रजेच्या राणीला त्यांची काळजी नाही, ती त्यांना केवळ युद्धातले मोहरे म्हणून वापरतेय तर मी तरी का त्यांची काळजी करू? जर मला सिंहासन मिळणारच नाहीये तर ते सिंहासन, ती प्रजा, तो किल्ला का म्हणून सांभाळावा? डेनेरीसची मनात जपलेली इतक्या वर्षांची सिंहासनाची आशा प्रचंड संहार करण्यापर्यंत तिला घेऊन गेली. मग तिनं आपले विश्वासू डोथ्रोकी, अनसलीड इतकंच काय जॉन ही तिथेच आत कुठेतरी आहे याचाही विचार न करता पूर्ण किंग्ज लँडिंग उद्ध्वस्त केलं.

आता आर्या हिरवे डोळे बंद करेल का हे बघायचं.

आजच्या भागाचे थोडक्यात वर्णन करायचे तर भयंकर रक्तपात आणि आगीचा वणवा.

सुरुवातीलाच वरिसला डॅनीशी विद्रोह केल्यामुळे जीवंत जाळ्यान्याची क्षिशा मिळते. टिरीयन डॅनीला आश्वत करतो की सकाळपर्यंत किंग्ज लॅण्डिंगमधील जनता उठाव करून किंवा ईतर मार्गानी घंटा वाजवून शरण येतील, त्यावर डॅनी सहमत होते. डॅनी टिरीयनला सांगते की किंग्ज लॅण्डिंगच्या मार्गावर जेमीला बंदी केले आहे, आणि यावेळी जर काही गडबड झाली तर टिरीयनलाही प्राणाला मुकावे लागेल.
टिरीयन जेमीला बंदिवासातून सोडवतो आणि सर्सीला शरण येण्यास जेमीने तिचे मन वळविण्याचा प्रयत्न करावा असे सांगतो. जेमीला पेंटॉसला पाठविण्याची व्यवस्था सर डेवासतर्फे करतो. इकडे आर्या आणि हाऊंड शहरात प्रवेश करतात, पाठोपाठ जेमीही दाखल होतो, परंतु रेड कीपचे दरवाजे बंद झाल्यामुळे त्याला दुसरा मार्ग पकडावा लागतो.
थोड्यात वेळात युद्धाचा थरार सुरु होतो. डॅनी ड्रॅगनवर आरुढ होऊन युरोन ग्रेजॉय आणि आर्यन फ्लीटला क्षणाचीही उसंत न देता संपूर्ण जहाजं उध्वस्त करून टाकते. तसेच तटबंदीवरील स्कॉर्पियनची फळीही ड्रॅगनच्या आगीत भस्मसात होते. तटबंदीबाहेर गोल्डन कंपनी पहारा देत असतांना आतून डॅनी तटबंदी उध्वस्त करून किंग्ज लॅण्डिंगचा तिच्या सैन्याचा प्रवेश मोकळा करते. कायबर्न सर्सीला शरण येण्याचा सल्ला देतो, परंतु तो ती धुडकावून लावते. इकडे लॅनिस्टर सैन्य शस्त्र खाली ठेऊन आणि सर्सीच्या आदेशाच्याशिवाय घंटा वाजवून संपूर्ण शरणागती पत्करते.
डॅनी आता संपूर्णपणे मनावरचा ताबा सोडून अनियंत्रतपणे ड्रॅगनसहित चौखुर उधळते आणि वाटेत येणारे सर्वकाही ड्रॅगनच्या आगीत भस्मसात करत सुटते. अनसलीड आणि डोथ्राकी शहरात मृत्युचे तांडव माजवत सुटतात. जॉन त्यांना थांबवायचा प्रयत्न करतो परंतु तो हतबल ठरतो. जॉन आणि सर डेवास आपआपल्या सैनिकांसहित परत फिरतात.
जेमी आणि युरोनमध्ये लढाई होऊन जेमी जखमी होतो आणि युरोनचा मृत्यू होतो. हाऊंड आर्याला तिचा सूड घेण्यापासून परावृत्त करतो आणि परत जायला सांगतो. हाऊंडचा सामना त्याचा मोठा भाऊ माऊंटनशी होतो. सर्सी आणि कायबर्न माउंटनला त्यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून चालण्याची आज्ञा करतात परंतु माउंटन कायबर्नला उचलून फेकतो आणि त्यातच कायबर्नचा मृत्यू होतो. हाऊंड आणि माऊंटन एकमेकांशी लढतात आणि लढता लढता उंचावरून पडून मरण पावतात. सर्सी आणि जेमी तळघरात पोहचतात परंतु सर्व बाजुंनी मार्ग बंद झालेले असतात आणि त्यातच छत कोसळते.
आर्या जेव्हा परत रस्त्यावर पोहचते तेंव्हा सामान्य जनता जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत असते. सगळीकडे विध्वंसाच्या खुणा पसरलेल्या असतात. डॅनीच्या ड्रॅगनने सगळीकडे हाहाकार माचवलेला असतो. आर्या काही लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते परंतु अयशस्वी ठरते आणि तिची शुद्ध हरपते. जेव्हा ती परत शुद्धीवर येते तेंव्हा एक पांढरा घोडा उभा असतो, त्यावर स्वार होऊन ती राजधानीतून बाहेर पडते.

आता पुढच्या शक्यता माझ्याप्रमाणे
१) आर्याने हा जो डॅनीने केलेला विध्वंस आहे तो पाहून नक्कीच तिच्या यादीत एक नाव वाढले आहे. मेलिसांड्रेने सांगितल्याप्रमाणे आर्या हिरवे डोळे कायमचे बंद करणार आहे, कदाचित ते डॅनीचे असू शकतात.
२) जॉनही डॅनीने केलेला विध्वंस पाहून मनातून हादरलेला आहे, तो डॅनीच्या हृदयात तलवार चालवून डॅनीची तिसरी भविष्यवाणी खरी करू शकतो, आणि त्याचसोबत Prince who Promised चे भविष्यदेखील सत्यात आणू शकतो. अझोर अहायची कथा पुस्तकात आहे. ज्याने आपल्या प्रिय व्यक्तीच्या हृदयात तलवार चालवून सात राज्यांवर अधिपत्य स्थापन केले होते आणि तो परत येणार ही भविष्यवाणी आहे. मेलिसांड्रेने आधीच्या भागात स्टॅनिसच्या बाबतीत अंदाज लावलेला आहे.
३) डॅनीने किंग्ज लॅण्डिंग संपूर्णपने उध्वस्त केले आहे, तेपण वीस हजार गोल्डन कंपनीचे सैनिक आणि युरोन ग्रेजॉयचे जहाज एकहाती नष्ट करून त्यामुळे कोणीही तिचे काहीही वाकडे करू शकत नाही निदान युद्धात तरी. हारेनहाल प्रमाणे किंग्ज लॅण्डिंगही उध्वस्त वास्तूप्रमाणे राहील. नंतर डॅनी इसॉसला जाईल कारण इथे कोणीच तीचे समर्थक किंवा पाठीराखे नाहीत. जॉन सगळा कारभार हाती घेऊ शकतो किंवा तो परत नाईट वॉचला रुजू होईल. सर्व राज्ये स्वत्रंत होतील आणि परत शह काटशहचे राजकारण किंवा गोंधळ निर्माण होईल आणि नवीन घडामोडींची सुरुवात असेल.

@मामी, +१११.
डॅनी पक्की मॅड क्वीन झाली. सान्साला एक्सपेक्टेड (की डिझायर्ड?) होतं तसंच झालं.
आता डॅनीचं मरण अटळ आहे. पण या सगळ्याच्या शेवट ती सान्सा राणी होण्यात होवू नये म्हणजे झालं. जानराव अथवा आर्या झालेले आवडतील.

कालच्या भागातील सगळ्यात आवडत्या घटना-
१. टिरीयन व जेमीची शेवटची भेट. मला वाटतं जेमी/सर्सी/दोघेही अजून जिवंत असतील.
२. आर्या व हाउंडची शेवटची भेट व त्यातील संवाद. स्पेशली आर्याने त्याला 'थँक यू' म्हणणं.
३. सर्सीच्या चेहर्यावर दिसणारा पराभव व भिती.
४. डॅनीनं आयर्न फ्लीट व सगळे स्पायडर्स एकहाती उध्वस्त करणं.
५. बेल वाजायच्या अधीची व वाजल्यानंतरची काही क्षणाची टेंस सिच्युएशन.
६. आणि व्हॅरिस, शेवटच्या क्षणी मरण तेही जळून दिसत असल्याने भिती लपवू न शकणारा आणि तरीही 'आय होप आय डिझर्व धिस' म्हणणारा.

अटलांटिक मधील हा लेखसंवाद मला आवडला

https://www.theatlantic.com/entertainment/archive/2019/05/game-thrones-s...

Maybe it’s a waste of space to list all the “ARE YOU SERIOUS?” moments of the episode, but I don’t want those to be totally overshadowed by all the grand spectacle. So here are some things that made me type in angry all-caps in my notes: Jaime wandering into King’s Landing with a hood and immediately taking the glove off his golden hand despite the fact that he knows his sister wants him dead and he would be very recognizable to any member of the Queensguard. Arya and the Hound also showing up, barely disguised, in King’s Landing at roughly the same time. Varys hastily setting fire to a scroll and then immediately placing it in a covered metal tin, which would have put out the fire (not to mention his horribly plotted spy efforts in general). The Hound changing his mind about Arya’s mission—right as they approach the Red Keep, after the fighting has broken out, after they’ve traveled thousands of miles from Winterfell—and telling the girl who assassinated the Night King she shouldn’t try to kill Cersei after all because … it’s too dangerous.

>>आता आर्या हिरवे डोळे बंद करेल का हे बघायचं.
Submitted by मामी on 13 May, 2019 - 09:11<<

संपुर्ण पोस्टला +१. डॅनीला वाटतंय आपल्याला आयसोलेट केलं जातंय आणि त्यामुळेच ती इन्सिक्योर झालेली आहे. जॉननेहि तिची साथ सोडली (हि डिडंट किस हर बॅक) हि भावना वॉज पासिबली ए लास्ट स्ट्रॉ फॉर वेकिंग अप दि ड्रॅगन...

आर्याला मात्र अगदिच पळपुटी दाखवलंय या एपिसोडमध्ये. लग रहा था कि वो पतली गलीसे जाके सर्सी + माउंटनका काम तमाम कर देगी. लेकिन वो एकदमीच भिगी बिल्ली निकली. आशा करुया फिनालेत ती जेंव्हा डॅनीला मारायला जाइल, तेंव्हा ड्रेगान डॅनीच्या आसपास नसेल... Happy

पण या सगळ्याच्या शेवट ती सान्सा राणी होण्यात होवू नये म्हणजे झालं.
<<
काब्रं भो?
ती ऑल्रेडी सर्सीची माजी सून आहे ना? एकेकाळची राणी?

फक्त ३०० वर्षांपूर्वी आलेल्या मोगलांसारखे ते टार्गॅरियन्स आहेत. ड्रॅगनवाले असले म्हणून काय झालं? ते कसले बोडक्याचे 'राईटफूल' ओनर्स?

जानराव आणि आर्या दोघेही बाय नेचर रूलर/गव्हर्नर नाहीत. सान्साच उरली आहे.>>> तेच तर दु:ख आहे. मला तरी ती अजूनही डिझर्विंग वाटत नाही. तिची एकमेव अचिव्हमेंट म्हणजे ती सर्वाय्व्हर आहे. 'बॅटल ओफ बास्टर्ड्स' दरम्यान तिने व्हेल ची फौज बोलावली (तेही जानराव मरायला टेकलेले असताना) याशिवाय तिची फारशी मदतही स्टार्क्स जिंकत असताना दिसत नाही. दुसरं म्हणजे तिच्यावर जॉफरी, बेलीश, राम्सी यांकडून झालेल्या अन्याय अत्याचारात ती व्हिक्टीम वाटून दया येते पण त्यातही ती स्वत:च्या मूर्खपणामुळे फसल्याचे वाटत राहते. माज तर तिचा डॅनीपेक्षा एक लेव्हल कमी एवढाच आहे. सो माझ्याकडून सान्साच्या राणीशिपसाठी, बिग नो!

जॉन स्नो आता ऑफिशिअली बावळट रेम्याडोक्या वाटायला लागला आहे. टीरियनचा आलोकनाथछाप बाबूजी करून टाकला आहे! जेमी आणि यूरॉन उथळ! बायाच जरा काहीतरी कॅरेक्टर ठेवून आहेत या शिरेलीतल्या! मॅड ऑर नॉट!

Pages