"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिचाऱ्या टॉर्मुंड चा प्रेमभंग झाला त्याचे कोणाला काही नाही, तो एकदम 'गरीब जानके' किंवा 'आंसू समझके क्यूँ मुझे ' असं तलतच्या आवाजात गायला लागेल असे वाटले होते. पण त्याची कसर ब्रीयान ने ' परदेसी परदेसी तू जाना नहीं ' वाला सीन करून भरून काढली.

घोस्ट ला गुडबाय म्हटले नाही म्हणजे जॉन राव कंडम पार्टी आहे.
सर्सी धूर्त आहे
टिरिअन टांगा पल्टी घोडे फरार
डेनेरिस यडी
सान्सा आतल्या गाठीची
ब्रॉन उंटा वरचा शहाणा
युरॉन ओरिजिनल हलकट पण उपयुक्त
रामसे बोल्टन मेंटल.
आर्या सुपारी किलर.

कशाला भेटणार परत घोस्ट असल्या तुसड्या गुडबायनंतर?

आधी मला वाटलं होतं की जॉन वॉलवर परत जाईल - पण आता एन्के गेल्यावर वॉलचा काही सिग्निफिकन्स उरलेलाच नाही, त्यामुळे जॉन त्याचं काय ते जीवितकार्य पार पाडून डंडारियनसारखा फायनल मरेल.

जॉन आणि घोस्ट रिलेशन , मुळात घोस्ट दिसायला वेगळा का आणि नाय्मेरिया /इतर डायरवुल्व्ह्ज पेक्षा छोटा का दिसतो वगैरे प्रश्नांसाठी मी सिझन १ एपिसोड १ पुन्हा पव्हिला.
मुळात डेझर्टरचं डोकं उडवून नेड स्टार्क अँड कंपनी परत येताना वाटेत ही पिल्लं दिसतात, त्यांची आई आधीच गेलेली असते.
नेडच्या संमतीने थिऑन त्या पिल्लांना मारणार इतल्यात जॉन डायरवुल्फ स्टार्क सिजिल असल्याने न मारायचा सल्ला देतो आणि ५ पिल्ले ५ स्टार्क बंधुभगिनींना द्यावा असा प्रस्ताव देऊन पुढे निघतो, इतक्यात समोर येतो घोस्ट , त्याला बघून जॉन म्हणतो रंट ऑफ लिटर , त्यावर चेष्टा करत थिऑन म्हणतो, दॅट्स फॉर यु जॉन !
Runt of litter : In a group of animals (usually a litter of animals born in multiple births), a runt is a member which is smaller or weaker than the others. Owing to its small size, a runt in a litter faces obvious disadvantage, including difficulties in competing with its siblings for survival and possible rejection by its mother. _ इति विकिपिडीआ

मग सगळे अर्थ लागत जातात जॉनच्या कंप्लिट जर्नीचे !
रिजेक्शन बाय मदर, सरव्हायवल, कंपिटींग विथ सिबलिंग्ज.. नाईटवॉचला जाणे, मरणे इ.
याशिवाय तात्पुरता त्या वुल्व्ह्ज ना मारायला सरसावलेला थिऑन म्हणजे मधे विंटरफेलला येऊन तात्पुरता पिसाळलेला थिऑन !

डिज्जे, सहीच. ह्या अशा थेअरिज लावण्यात छान वेळ गेला सहाएक सीजन. मात्र सातव्या आणि आठव्या सिजन्सनी माती करून टाकली आहे सिरिजची. एवढी कसली घाई होती उरकायची, छान पंधरा एक सीजन सुध्दा एन्जॉय केले असते की.

एका नविन थियरी नुसार "मदर ऑफ ड्रॅगन्स" (यु नो हु) ड्रॅगनच्या रुपात येणार आहे; र्हेगालच्या खुनाचा बदला आणि आयर्न थ्रोन मिळवायला. थोडक्यात आपल्या इच्छाधारी नागिणी सारखं... Proud

हो वाचली ती थिअरी. इंटरेस्टिंग. पण मंडळींचं सीजीआय चं बजेट संपलं होतं म्हणे ना. डायरवुल्फ मोठा दाखवायचे पैसे वाचवले त्यांनी!

खर्चाचा प्रश्न नाहि पण ते लोकांच्या गळी कसं उतरवतात हे बघावं लागेल. मिसँडेची शेवटची इच्छा (लाइट देम अप) डॅनी लिटरली खरी करणार कि काय?..

>>> इच्छाधारी नागिणी सारखं
आपल्या? Proud

एखादं गाणंही टाका म्हणावं ' मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा, मैं ड्रॅगन तू लुटेरा' वगैरे! Lol

पाचवा ट्रेलर पाहिलात काय, आर्या ड्रॅगनचा मुखवटा लावून यूरोनवर आक्रमक करते. सोबत घोस्तपण आहे.>>> हायला, हे बोकलत भाऊंनी टायपलंय होय...मी लईच सिरियसली घेतलं न वं.. Wink

हो, इच्छाधारी ड्रॅगिन बद्दल बरीच चर्चा आहे मिडीयावर, त्यावर थिअरी एक्सप्लेन करणारं अर्टीकल पाहिलं काल, मला मॅड क्वीन पेक्षा मॅड ड्रॅगन रुपात चालेल खलिसी Proud
यावेळी कोण मरेल ते माहित नाही पण अख्खी किंग्ज लँडींग वाइल्डफायर, ड्रॅगनफायरने मरण्याच्या मार्गावर आहे फिनाले पर्यन्त असं वाटतय, आयर्न थ्रोनला नॅरोसि पोटात घेईल.
सगळे जळून मेले तरी खलिसी काही आगीत मरणार नाही, तिला भोसकून मारावं लागेल.

अरे सगळे मरून कसं चालेल? ही काही एन्ड ऑफ द वर्ल्ड सीरियल नाहीये! आता रामराज्य येणार आहे - राज हॅज प्रॉमिस्ड अ हॅपी एन्डिंग! Proud

राज हॅज प्रॉमिस्ड अ हॅपी एन्डिंग! >>> Happy
लेखक बिटरस्वीट म्हणताहेत म्हणजे काही सो कॉल्ड गुड पीपल पण मरणार.
एकूण सध्या जॉन चीच लोखंडी खुर्चीवर बसण्याची चिन्हं दिसताहेत मला. त्याचं अवतार कार्य ना. किं. ला मारण्याचं नव्हतं मग दुसरं काय करणार मरून परत येऊन?

सगळे म्हणजे किंग्ज्लँडींग मधली जनता आणि युध्दवीर Proud
पण खरच जॉन बसला जर आयर्नथ्रोनवर तर भारीच आयडिअल सिच्युएशन, उत्तरेकडे स्टार्क राणी आणि इथे स्टार्कगेरीयन राजा , गुण्यागोविंदाने राज्य करणार!लॅनिस्टर आर्मी + आयर्न फ्लिट+ उरलीसुरली अन्सलिड आर्मीही एकत्रं येणार.
ब्रॉनभाऊंना हायगार्डन, टिरियनला कॅस्टर्ली रॉक.
ड्रॅगन विथ डॅनी संपवावे लागतील त्या आधी.

मुख्य व्हिलन सर्सीबाय हाय, यामुळे ती नक्की मरणार आणि तेही शेवटच्याच भागात.. पुढच्या एपि मधे ग्रे वर्म, युरॉन ग्रे जॉय, वारिस, क्युबार्न.. वगैरे दुसर्‍या फळीतले काही लोक धारातिर्थी पडणार..

>>राज हॅज प्रॉमिस्ड अ हॅपी एन्डिंग! >>> Happy
लेखक बिटरस्वीट म्हणताहेत म्हणजे काही सो कॉल्ड गुड पीपल पण मरणार.<<

ते मार्टीनकाका म्हणतायत, बिटरस्वीट म्हणुन. शोच्या लेखकांनी हॅपी एंडिंग आहे असं क्लियरली म्हटल्याचं बघितलंय एच्बीओ कमेंटरी किंवा इतर कुठेतरी. ती क्लिप आता हँडि नाहि तेंव्हा सध्या यावर समाधान मानुन घ्या... Happy

आनंदी शेवट असेल तर मग काय आता उरलेले सगळे स्टार्क कुटुंबीय जिवंत राहून सुखासमाधनाने राज्य करतील. सर्सी, एरॉन, डॅनी, ब्रॉन वगैरे सगळे वाईट लोकं मरून जातील. टिरियन, जेमी, व्हॅरिस, हाऊन्ड जिवंत राहतील.

कडूगोड शेवट असेल तर मला वाटतं जॉन डॅनी दोघेही नक्की मरणार, आर्या, ब्रॅन, जेमीदेखील मरायची शक्यता आहे. सान्सा, टिरियन आणि व्हॅरिस जिवंत राहतील.

Pages