"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>यूरॉन ड्रॅगनला मारून लगेच सर्सीबरोबर हजर होता, मग जॉनला पोचायला इतका वेळ का लागतोय?<<
युरानने अन्सलिडच्या फ्लीट आणि र्हेगालला जलसमाधी ब्लॅकवॉटर बे मध्ये दिली, जो किंग्जलँडिंग आणि ड्रॅगन्स्टोनचा कॉमन बॉडि ऑफ वॉटर आहे (आपल्या गेटवे ऑफ इंडिया आणि एलिफंटा केव्ज सारखा). डॅनी आणि इतर वाचलेले सैनिक ड्रॅगन्स्टोनला आश्रयाला आलेले आहेत. अनसलिड फ्लीट समुद्रमार्गे आली म्हणुन कदाचित जॉनच्या आधी पोचली असा बेनिफिट ऑफ डाउट मी तरी बाबा त्यांना दिला... Wink

कालच्या एपिसोड बद्द्ल मिक्स्ड फीलींग्ज आहेत.
डॅनी कशाच्या जीवावर सर्सीला सरेंडर करायला सांगते काही समजेना. ते ही असं खुल्या मैदानात. ड्रॅगन ला पण सोबत घेउन? त्या लोकांनी म्हणजे सर्सीने तिथल्यातिथेच शेवटचा ड्रॅगन का खलास केला नाही? ती एकदम व्हॅन्टेज पॉइंटवर होती. सरळ डॅनी ला ठार करणही शक्या होतच की.

सर्सी जेमीचं पोर युरॉन चं म्हणून खपवायला बघतेय आणि त्या येड्यालाही ते पटलय असं दाखवतात? टिरियन आणि सर्सी चं तिच्या बाळाने मरायची काही गरज नाही असलं संभाषण ऐकून पण युरॉनला काही क्लू कसा लागला नाही की बाबारे ही प्रेग्नंट आहे हे टिरियनला इतक्यात कसं समजलं? याचा अर्थ त्याला आधीपासून माहिते असणार याचा अर्थ ते पोर आपलं नाही.. मग युरॉन ने सर्सीलाच वरतून ढकलून दिलं असतं असं मला वाटत होतं.

सान्सा-हाउंड मधला सीन फार आवडला आणी शेवटी आर्या-हाउंड मधला पण.

डॅनी-जॉन काहीही युद्धनीती वापरताना दिसत नाहीत, व्हॅरिस आणि टिरियन आणि जेमी अशी सर्सीला ओळखून असलेली मंडळी पण काही प्लॅनिंग करताना दिसत नाहीत हे पचनी पडत नाही. नुसताच इमोशनल ड्रामा चाल्लाय.

नकाशासाठी धन्यवाद, पण तो बघून मी अजूनच गोंधळले आहे! Lol
समुद्रमार्गाने उलट आयरीला वळसा घालून (तिथे तो स्टार्क्सचा वेडा कझिन आहे ना?) जावं लागतंय - खुष्कीचाच मार्ग जवळचा वाटतो. आणि आयर्न आयलंड्सला यारा आहे ना? ते पार दुसऱ्या बाजूला दिसतंय. हम्म...

भारी आणि शॉकिंग होता कालच एपिसोड.
खूपच इंटरेस्टिंग वळणावर आहे शोरेल आता. डॅनिची सध्याची अवस्था फारच बेकार आहे...आधी डोथराकी मेले, मग बहुसंख्य अनसलीड, मग जोरा, मग २ ड्रॅगन्स, त्यातून ज्यांच्यापाठीशी एवढी फौज उभी केली ते नॉर्दर्नर्सपण जॉनच्या/स्टार्क्सच्या बाजूने. आता तर मिसांदे पण मेली..She is alone (emotionally) in this world...and according to Aemon, 'A Targarian alone in the world is a terrible thing!' मजा येणारे बघायला.
कालच्या Inside the episode मधे लेखक द्वयी ने बोलताना जेव्हा म्हटले की सान्सा ने टिरियन ला जॉनबद्दल सांगताना तिला खूप पुढचा विचार करुन व याचे परिणाम काय होतील माहीत असून घेतलेला निर्णय होता कारण she has learnt a lot from Littlefinger, तेव्हापासून असंच वाटतंय की हे ती स्वतःच्या क्वीन होण्याच्या महत्वाकांक्षेपायी करतेय. कारण जेव्हा कधी व्हॅरीस/टिरियनकडून त्यांनाही जॉनचे सत्य माहिती असल्याचे डॅनीला कळेल तेव्हा डॅनीला नक्कीच वाटेल की जॉनने दिलेला शब्द मोडला. सान्सा खरंच पक्की राजकारणी झालीय आता. लेट सर्सी, जॉन, डॅनी किल इच अदर, जे वाचेल त्यला बघून घेवू. तसंही ती लहानपणापासून कुठल्याच भावंडांबद्दल फार काही अ‍ॅटॅच्ड नाही वाटली, लहानपणापासूनच तिला क्वीन व्हायचं होतं. I think she is planning in that direction only.

आयर्न आयलंड्सला यारा आहे ना? ते पार दुसऱ्या बाजूला दिसतंय. >>> हो माझ्या डोक्यात पण समहाऊ ईरी आणि आयर्न आयलंड्स ची पोझिशन एक्स्चेन्ज केल्यावर जसा होईल तसा मॅप होता!!

टिरियन आणि सर्सी चं तिच्या बाळाने मरायची काही गरज नाही असलं संभाषण ऐकून पण युरॉनला काही क्लू कसा लागला नाही की बाबारे ही प्रेग्नंट आहे हे टिरियनला इतक्यात कसं समजलं? >> Exactly, मला तर जेव्हा टिरीयन सर्सीशी बोलायला पुढे झाला व तिच्या होणार्या बाळाबद्दल बोलायला लागला तेव्हाच वाटलं आपल्या बाळाच्या बापाची पोलखोल युरॉनसमोर होवू नये म्हणून सर्सी अचानक इम्प ला मारायचा आदेश देते की काय Uhoh .

युरॉन ला कळले की नाही ते आपल्याला अजून माहिती नाहीये>> ते ही आहेच. तोपण महा हलकट आहे त्यामुळे कळून पण गबसला असेल काही कारणाने

>>तेव्हा डॅनीला नक्कीच वाटेल की जॉनने दिलेला शब्द मोडला. <<
पण जॉनने डॅनीला ऑलरेडि क्ल्पना दिलेली होती कि तो बहिणींना सांगणार आहे म्हणुन...

>>जेव्हा टिरीयन सर्सीशी बोलायला पुढे झाला <<
सॉलिड टेंस मोमेंट होता तो; मला तर वाट्लेलं कि आता टिरियनचा भिष्म होणार... :फिदी::

सांसाला राणी व्हायचं आहे यात शंकाच नाहि पण डॅनी (जॉन) मेल्याशिवाय ते शक्य नाहि, आणि डॅनी/जॉन उभयता मेले तर मग हॅपी एंडिंग होणार नाहि... Proud

If you think this has a happy ending, you haven't been paying attention _ Ramasay Bolton.
Wink

>>Who said anything about happy endings?<<
लेखकद्वयी - बेनिआफ आणि वाइस...

पण जॉनने डॅनीला ऑलरेडि क्ल्पना दिलेली होती कि तो बहिणींना सांगणार आहे म्हणुन...>>> ते खरंय पण डॅनी इतकी रॅशनली विचार करणारी बाई नाही ना, तिला असंही वाटू शकतं की जॉनने स्वतःच्या स्वार्थापायी ही बातमी पसरवलीय...कदाचीत असंच सान्सालाही प्रोजेक्ट करायचं असेल...कारण २ ड्रॅगन्स एकत्र उडताना (डॅनी व जॉन दोघेही टार्गॅरियन्स आहेत हे माहीत असताना) तिच्या चेहर्यावरचे भाव कपटी/खुनशी वाटले.

बरं आता हिरवे डोळे कोणाकोणाचे आहेत त्याची यादी करायला घ्या.
मला सर्सीच आठवते फक्त.

सान्साचे डोळे कोणत्या रंगाचे आहेत?

कदाचीत असंच सान्सालाही प्रोजेक्ट करायचं असेल...>>>> होहो, सान्साला जॉन बद्दल लहानपणापासूनच काडीचं प्रेम नव्हतं. त्यामुळे सान्सा स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा बळी द्यायला मागेपुढे बघणार नाही आणी आतातर तो स्टार्क नाही हे ही कोलीत आहेच.

मला त्या हिरव्या डोळ्यांच्या लॉजिक मधे फारसा दम नाही वाटत. कितीतरी लोकांना आर्याने याआधी मारलेले आहे. त्यात ऑलरेडी येऊन गेले असतीलच की हिरव्या डोळ्यांचे कोणी ना कोणी.

एकंदरात स्क्रीनप्ले लेखकांचा प्रतिभा आटलेला राजकवी झाला आहे, असे मला तरी फीलींग येते आहे. भिक्कारचोट सीन लिहिताहेत अन काय वाट्टेल ते पंचेस मिस करताहेत.
टूक्स!
अगदीच टुकार एंडिंग होणारे या मालिकेचं.

शिवाय मध्येच काॅफीचा स्टारबक्स टाइप कप पण विसरतात Wink
त्या सिनमध्ये डॅनी एकटी आणि डिप्र्ेस्ड वाटते. मला डॅनीचेच दिवस भरत आलेत असं वाटतंय.

बाकी टिरियनने ग्राउंड फ्लोअरवरून सर्सीला इमोशनल अपील करणं आणि थिऑनने नाइटकिंगकडे भाला की काय उगारून धावणं यात जास्त येडपट काय वाटलं? व्हॉट वॉज द पॉइंट?
त्याआधी सर्सीला दाखवायला तो एक नाइटवॉकर पकडून आणायचा प्रकार असाच येटपट्ट होता - एकतर त्यापायी जीव धोक्यात घातला आणि निष्पन्न काय?!

टिरियनने ग्राउंड फ्लोअरवरून सर्सीला इमोशनल अपील करणं आणि थिऑनने नाइटकिंगकडे भाला की काय उगारून धावणं यात जास्त येडपट काय वाटलं? व्हॉट वॉज द पॉइंट?
त्याआधी सर्सीला दाखवायला तो एक नाइटवॉकर पकडून आणायचा प्रकार असाच येटपट्ट होता - एकतर त्यापायी जीव धोक्यात घातला आणि निष्पन्न काय?!
< Tyrion speech was the stupidest one , Theon was a good man Lol

तसा तर तो ग्राउंड फ्लोअर वर सर्सीपुढे हत्यारांना सामोरे जाण्याचा प्रकारच येडपट्ट होता. सर्सीमाता शांतीदूतच म्हणावी लागेल कारण तिने बाकीच्यांना नाही मारले.

त्या पकडलेल्या वाइटने सर्सीवर धाऊन जायचा प्रयत्न केला तर सर्सीला मरू द्यायचं होतं पण जॉनभाऊ आले ड्रॅगलग्लासचे प्रयोग दाखवायला, ते म्हणजे ढोकळ्याची चटणी वापरून अभी नया डेमो दे देंगे टाईप होते Proud

ॲमी, आधी डॅनी खुप आवडायची. मरीन, आस्तापोर, युंकाई या शहरांत ती ज्या तडफेने आणि सदुद्देशाने कारभार करत होती तेव्हा भारी वाटलेली. आता मात्र रेड वुमनप्रमाणे दैवाधिन आणि बावळट वाटतेय.

स्टॉर्म्स एंड, कॅस्टर्ली रॉक, ईरी, फ्रे,रिव्हररन, हाय्गार्डन, रिव्हररन, डॉर्न्स या सगळ्या राज्यांना आपली ऑथरिटी पटवून देण्यासाठी तिने काही केले? किंग्ज लॅंडिंग्जमध्ये लोकांना सर्सीपेक्षा आपण चांगले शासक ठरू हे पटवून देण्यासाठी तिने काही केले? आर्मीची संख्या व शक्ति दोन्हीही कमी झालीये हे कळूनदेखिल नविन अलाईज मिळवावेत किंवा इसॉसवरून नव्या दमाचे रिक्रुट्स भरती करून घ्यावेत, दारिओ नहारिसला बोलवावे असले कसलेही प्रयत्न ती करत नाहीये. मी राणी, मी राणी असा नुसता धोसरा काढल्याने लोकांना ती हवीशी वाटेल असे नव्हे ना!

जॉन, ड्रॅगन यापुढे तिच्या बुद्धीची मजल जात नाहीए. त्याउलट सर्सी व्हिजनरी, उत्तम स्ट्रॅटेजिस्ट, राजकारणकुशल राज्यकर्ती म्हणून प्रोजेक्ट होतेय.

पुंबा,
मी फक्त सिझन ३ पर्यंतच पोचलेय अजून. पण > ती ज्या तडफेने आणि सदुद्देशाने कारभार करत होती तेव्हा भारी वाटलेली. > गुलामांना मुक्त करण्यात तिचा सदुद्देश होता की नाही शंका आहे. तिला प्रजेपैकी कोणीही ओळखत नाही, तिच्याबद्दल ममत्व नाही, ती/तिचे घराणे परत गादीवर यावी/वं असेही सर्वसामान्यांपैकी कोणाला वाटत नव्हते. तिला आपले फॉलोवर्स निर्माण करावेच लागणार होते. गुलाम वॉज बेस्ट बेट! बाकी तडफ वगैरे ड्रॅगन्सच्या भरवशावर चालली आहे.
The Dothraki Are Dead. Does Game of Thrones Care? हा लेख चांगला आहे.

>>या सगळ्या राज्यांना आपली ऑथरिटी पटवून देण्यासाठी तिने काही केले? <<
सर्सीने तरी कुठे मोठे तीर मारले आहेत तिची ऑथरिटी पटवुन द्यायला? मला तरी डॅनीत, सर्सी+सांसा पेक्षा जास्त लिडर्शिप क्वालिटिज दिसतात. शिवाय तिचं लिनिएज, करिष्मा हे प्लस पॉइंट्स आहेतंच. जॉन/टिरियन पासुन डेवोस सीवर्थ पर्यंत सगळ्यांची लॉयल्टी तिने अर्न केलेली आहे; हे नक्किच दखलपात्र आहे.

कालच्या शेवटच्या सीनमधे डॅनी लुक्ड रियली पिस्स्ड; आय थिंक सर्सीज काउंटडाउन हॅज बीन स्टार्टेड...

What Is Game of Thrones ’ Legacy in Epic Fantasy?

J.R.R. Tolkien seemed to believe that if we had courage, faith, and did the right thing without concern for personal cost, God would protect us and humanity would triumph.
G.R.R. Martin, at least in his famous work of fiction (abetted now by the showrunners who are finishing the story for him), has made it very clear that not only is innocence or a good heart no defense, in many cases they are magnets for disaster. The strong will destroy the weak, proclaims the Westeros philosophy, and only cunning and moral flexibility matter. No one can be trusted completely, nor should be. The world is without form except for that which human agency can give it, and power is the only protection, though even that protection can turn out to be insufficient, as various assassinations in Game of Thrones have made all too clear.

अ‍ॅमी, हो इन्टरेस्टिंग आहे ते.
त्या दृष्टीनेही गॉट महाभारताच्या बरंच जवळ जातं. आयुष्यातल्या हार्श रिआलिटीज शुगरकोट करत नाही. इथे आदर्श नाहीत, आपला वैयक्तिक धर्म ओळखून तो आचरणात आणणं, पार पाडणं हेच लक्ष्य आहे. काही पात्रांना ते जमतं, काही शेवटपर्यंत चाचपडत राहतात.

अवांतर : हॅरी पॉटरमध्ये लव कसं अल्टिमेट मॅजिक असतं - हे कितीही ओव्हरसिम्प्लिस्टक वाटलं तरीही - हा मेसेज होता.

वाईट एपिसोड. त्याहूनही फालतू बिहाईंड द सीन्स. डॅनी म्हणे आयर्न फ्लीट आहेत हे विसरली. Bronn सरळ ह्यांच्या खोलीत घुसतो, टिरियन सारख्या पात्राचे तर पार माकड करून ठेवले आहे.
मार्टिन बाबाच्या गंभीर कथेचा पार चांदोबा करून ठेवलाय.

Pages