"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Tirian and Sansa are married. In a way.
<<

नाही. मॅरेज कन्झुमेट झाले नाही म्हणून नलिफाय झाले. त्या नंतर ती त्या विकृत प्राण्याची -काय त्याचं ?- विधवा झाली. तेच तिचे मॅरिटल स्टेटस सध्या तरी आहे.

बरोबर. रामसे बंधू पेक्शा हजारपट भेसूर होता तो.

बोटीबोटी कर के कुत्तों को खिलानेके लायकीका च था वो. सान्स बिटियाने वोच्च किया.

नाही. मॅरेज कन्झुमेट झाले नाही म्हणून नलिफाय झाले. त्या नंतर ती त्या विकृत प्राण्याची -काय त्याचं ?- विधवा झाली. तेच तिचे मॅरिटल स्टेटस सध्या तरी आहे.
<
हो बरोबर, टिरियन आणि सान्सा हे कपल नाही, दोघही सिंगल आहेत Happy
विक्रुत, क्रुरपणाची परिसीमा म्हणजे रॅमजी बोल्टन, त्याच्यापुढे जॉफरी सुध्दा कमी क्रुर !

त्याच्यापुढे जॉफरी सुध्दा कमी क्रुर !
<<
माझ्या मते एकाला झाकावा अन दुसर्‍याला काढावा असे आहेत. नगास नग. त्या वेश्येला कसं मारलं होतं ते आठवतं आहे का जॉफ्रीने? जॉफ्री लवकर मारला गेल्याने जरा माईल्ड वाटू लागतो इतकेच. अन त्याचे चाळे रॅम्से इतके डिटेलवार दाखवले नाहियेत हे दुसरे कारण.

हो ते आहेच, सान्सा बिचारी सर्वात वाईट प्रकारे ट्रॅप झाली, तिच्या फॅमिलीला ज्यांनी अत्यंत क्रुरपणानी मारलं त्यांच्यातच राहून मेन्टल अँड फिजिकल टॉर्चर ! सर्सी, जॉफरी, लिट्लफिंगर आणि रॅमजी .. सगळे अर्क !
पहिल्यापासूनच मला सॉफ्ट कॉर्नर आहे सान्सा बद्दल.

सान्सा माठ आहे असे माझे मत होते. कदाचित मी किती सुंदर दिसते, जणू राजाची राणीच. हे डोक्यात बसलेली बिंबो अनेक झटके खात शेवटी रॅमसेने अती करून मग कुठेतरी वर्जिनल स्टार्क चा स्पार्क चमकून ठिकाणावर आली, अशी ती आहे. अजूनही मला ती फारशी आवडत नाही. तिच्या बर्‍याच भोगांना तीच जबाबदार आहे.

हम्म...

घोस्ट खूपच लहान दाखवलाय साईझने. सातव्या सिझनमध्ये आर्या नायमेरियाची भेट होते त्यावेळी नायमेरिया किती मोठी दाखवले.

ते ते वेगळ्या अर्थाने बोलते, आपण नाही का बोलतो पहिल्यासारखी मायबोली आता राहिली नाही. Wink ती नायमेरिया नसती तर हल्ला केला असता आर्यावर.

When Arya says thats not her has a big significance. Nimeria has found her pack and she can no longer fit into the mould of a domesticated pet. Just like Arya who has found her purpose in life. She cN no longer fit into the mould of a domesticated or married woman. Like owner like pet. Many dialogues should not be taken in the literal sense. Ghost appeared at the age it has died. I have a feeling Nimeria and pack will have a part to play in the battle.

Summer is the time for squabbles. In winter, we must protect one another, keep each other warm, share our strengths. When the snows fall and the white winds blow, the lone wolf dies but the pack survives. ~ सन्त आर.आर.मार्टीन
बिकट काळ आला आहे, एकत्र येऊन लढा द्ययाची वेळ आली आहे, स्टार्क्स- लॅनिस्टर्स- टार्गेरियन्स- बराथियन्स- मर्माँट वि. नाइटकिंग अँड हिज आर्मी.

This weekend is the biggest battle of and deaths of fictional characters. Avengers end game and GOT battle .

ह्या सिरीयल ची मॅरेथॉन करणं मला काही जमेल असं वाटतं नाहीये. शेवटचा सिझनला बरेचसे संदर्भ धूसर झालेत म्हणून परत बघायला लागले तर जेमतेम दोन दिवसात एखादा भाग बघून होतोय. नेड स्टार्क मरणार हे माहीत असून बघायला नको वाटतंय. आणि हा काय मूर्खपणा आहे असं अक्षरशः प्रत्येक दोन मिनिटाला वाटतंय.

इथलं वाचून वाचून काय आहे तरी म्हणून बघायला सुरुवात केलेली आहे.. पण अजून फारच मागे आहे... शेवटचा सिजन संपेपर्यंत तरी कॅचअप होईल का नाही हे माहिती नाहिये..

फार इंटरेस्टींग आहे GoT !
मी ठरवलं होतं की फायनल सिझन पूर्ण आल्यावरच बघणार, पण 6 दिवसांपूर्वी पहिला सिझन, पहिला एपिसोड बघायला सुरुवात केली, आणि कालच 8व्या सिझन चे दोन्ही एपिसोड संपवले.. आता सिझन संपेस्तोवर बेचैनी राहणार.. उत्कृष्ठ बांधणी, आणि अगदी कड्याच्या टोकावर सोडून संपवलेले एपिसोड/ सिझन.. एकदा बघायला सुरू केलं तर थांबणं अशक्य!

What is your house?
Adidas has brought out shoes with the name and sign of each house. A pair costs 13800 inr. Masaba Gupta has launched official GoT theme collection. Jewellery is also available on Amazon.in this weekend i am torn in between House stark and Tony stark. Have two tickets for Avengers at PVRICON for Sunday 11 am show and a holiday on Monday so can watch the battle for Winterfell at 8 am. immediately after the airing un the US there is a q n a on youtube. Plus live chat . Bran is night king. I am going by that. Har har Mahadev.

अजुन एकही पोस्ट नाही ????
मी अजुन हँगोव्हर मधे आहे, काय एपिसोड होता !
आर्या इट इज !
Too much excitement, non stop goosebumps moments, constant prayers for Arya and Winetfell , too much to handle !!! This was way more exciting than any India Pak match, tops everything else right now !
Those last few minutes with silent piano and symphony playing , no dialogues and Night king moving forward towards Bran almost killed me !
Today’s episode completely owned by Arya , Red woman, little lady of Mermont and Theon !
बाकी डिटेल्स उद्या, NOT TODAY !

नाईट किंग खरोखर मेलाय की बॉलिवूडच्या स्टोऱ्यांप्रमाणे परत एक जन्म घेऊन जिवंत होणार? तो खरोखर मेला असेल तर पुढच्या भागात काय दाखवणार

Pages