तर कधी ..नरेंद्र दाभोलकर

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 August, 2013 - 09:33

समोरच्या व्यक्तीचे अस्तित्व
पुसून टाकण्या एवढी
माणसे का बरे होतात कट्टर ?
धर्म जात भाषा प्रांत
यांचा अट्टाहास का राज्य करतो
माणसाच्या मनावर ?
अहंकाराच्या उदात्तीकरणातून
मारायला अथवा मारायला
उद्युक्त करणारा आवेश
कसा निर्माण होवू शकतो बर ?
कधी ते चढतात फासावर
कधी ते चढवतात फासावर
झाडाच्या फांद्या तोडाव्या तशी
पडतात माणसांची कलेवर
हिंसेचे हे तांडव पाहतांना
मनातील माणूस भयभीत होतो
माणसावरील माझाच विश्वास
उडून जावू लागतो
निमित्त होते कधी मार्टिन ल्युथर
तर कधी ..नरेंद्र दाभोलकर

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रांत, कविता आवडली. अतीव दु:खातून कविताच उमलते. कारण अशी भावनोत्कटता बहुधा कवितेतूनच व्यक्त होऊ शकते.
अंजली, ते दाभोलकरच आहे. दाभोळकर नाही. दक्षिण कोंकणात दाभोली नावाचे गाव आहे. तिथले म्हणून दाभोलकर. दाभोळचा काही संबंध नाही.