भरजरी

Submitted by pulasti on 20 August, 2013 - 16:20

नेहमीच आपले पटावे अशी अपेक्षा जरी नसावी
एकदुज्यांच्या हेतूंबद्दल किमान शंका तरी नसावी

उदास झालो मीच, मुलाला पटू लागले आहे आता
नसतो सांताक्लॉज आणि ती दातांचीही परी नसावी

मिरवत बसते केवळ, काही कार्य तिच्या हातून घडेना
इतकीही आपली वेदना सुखासीन भरजरी नसावी

इथे बुडाली माझी गाथा, इथे हरवली माझी वाणी
ही माझी भीवरा नसावी, ही माझी पंढरी नसावी

देवांची त्या गणतीसाठीची पद्धत सापेक्ष असावी
म्हणून हल्ली कोणाचीही कधी भरत शंभरी नसावी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृत्त हाताळणी क्लिष्ट वाटली अनेकजागी अडखळलो (बहुधा प्रथमच आपणाकडून असे वृत्त निवडले गेले असावे किंवा अनेक दिवसांनंतर )
साहजिकच पंढरी हा शेर जास्त आवडला Happy

उदास झालो मीच, मुलाला पटू लागले जेव्हा हे - <<<< २ मात्रा बहुधा कमी पडल्या की काय Uhoh

वैवकु - दुरुस्ती केली आहे. धन्यवाद!

वृत्तहाताळणी - क्लिष्ट वाटण्याची शक्यता आहे. एक-दोनदा गुणगुणून पाहिले तेर ८|८ मात्रांमध्ये बर्‍यापैकी गुणगुणता येतेय... अर्थात हे माझं फारच वैयक्तिक मत!

छान...

मिरवत बसते केवळ, काही कार्य तिच्या हातून घडेना
इतकीही आपली वेदना सुखासीन भरजरी नसावी<<< सुंदर शेर!

लय व्यवस्थित उच्चारता आली मलाही!

मात्र पुलस्तिसाहेबांच्या गझलेकडून असतात तितक्या अपेक्षा पूर्ण झाल्यासारखे मात्र वाटले नाही.

क्षमस्व!

-'बेफिकीर'!

मिरवत बसते केवळ, काही कार्य तिच्या हातून घडेना
इतकीही आपली वेदना सुखासीन भरजरी नसावी

सुंदर शेर!

इथे बुडाली माझी गाथा, इथे हरवली माझी वाणी
ही माझी भीवरा नसावी, ही माझी पंढरी नसावी

----- वा!

जयन्ता५२

सगळी गझल लयीत गुणगुणता आली.

देवांची त्या गणतीसाठीची पद्धत सापेक्ष असावी
म्हणून हल्ली कोणाचीही कधी भरत शंभरी नसावी.........ह्या शेराने जरा अंतर्मुख केले.

सगळेच शेर आवडले.

मतला मलाही आवडला...

मिरवत बसते केवळ, काही कार्य तिच्या हातून घडेना
इतकीही आपली वेदना सुखासीन भरजरी नसावी

इथे बुडाली माझी गाथा, इथे हरवली माझी वाणी
ही माझी भीवरा नसावी, ही माझी पंढरी नसावी >>
सुरेख!!