त्रिवेणी..

Submitted by गणेश कुलकर्णी on 18 August, 2013 - 03:07

१)
तुझ्या केसांनां असे
मोकळे मोकळे सोडू नकोस
.
.
.

वार्‍याची दिशा बदलतेय!

२)
मी गेल्यावर माझी हाडे
गंगेत विसर्जन करू नका
.
.
.

गंगा अगोदरच किती प्रदूषित झाली आहे!
३)
एकटेपणाचा एक मात्र
मोठ्ठा फायदा आहे
.
.
.

आपल्या सोबत आपलं मन असतं!

४)
काही वाईट करणे
म्हणजे पाप आहे...
.
.
.

आपण कितीदा आपले मन मारतो!

५)
मला खूप दिवसांनी
पावसावरची कविता सुचली....
.
.
.

बहुधा "ती" खूप भिजली असावी!

**************************
गणेश कुलकर्णी (समीप)
**************************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही वाईट करणे
म्हणजे पाप आहे...
.
.
.
आपण कितीदा आपले मन मारतो!

===========================
मला खूप दिवसांनी
पावसावरची कविता सुचली....
.
.
.
बहुधा "ती" खूप भिजली असावी!<<<

व्वा व्वा

पहिली आणि तिसरी आवडली..

मला खूप दिवसांनी
पावसावरची कविता सुचली....
.
.
.
बहुधा "ती" खूप भिजली असावी!>>> मस्त!

*****