प्रगती प्रतिष्ठान ला मायबोलीकरांची भेट

Submitted by विनय भिडे on 18 August, 2013 - 02:16

नमस्कार मायबोलीकर,
मायबोली टी शर्ट २०१३ या उपक्रमाची देणगी दिली आणि या उपक्रमाच काम पूर्ण झाल. आपण दिलेल्या देणगी बद्दल "प्रगती प्रतिष्ठान" यांनी एक पत्र मायबोलीला दिले आहे. याचबरोबर देणगीचा कसा वापर केला याबद्दल माहिती सुद्धा पुढे पत्रकात दिली आहे.
1.JPG3.JPG

आधी सांगितल्याप्रमाणे या देणगीतुन त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश शिवुन घेतले आणि १५ ऑगस्ट च्या कार्यक्रमात सगळ्या मुलांना घालायला मिळाले. आपण सगळ्यांनी दिलेल्या योगदानातुन जे गणवेश विद्यार्थ्यांकरता बनवले गेले आणि ते परिधान केलेल्याचा आनंद पाहण्याकरता आणि या मुलांच्या भेटीकरता आम्ही काही मायबोलीकर १५ ऑगस्ट ला जव्हार येथे "प्रगती प्रतिष्ठान संचलित निलेश ल. मुर्डेश्वर कर्णबधीर विद्यालय" ला भेट देउन आलो. तेथील काही क्षणचित्रे येथे देत आहे.

संस्थेचा परिसर :-
217.JPG

सुनंदा ताई पटवर्धन आणि तिथल्या शाळेचा कर्मचारी वर्ग यांनी आम्हाला शाळेची माहिती करुन दिली.
221.JPG

कर्णबधीर मुलांच्या बाबतीत येणार्‍या समस्या , याचबरोबर असणारे इतर आजार ,पालकांचा अशिक्षीतपणा मुळे अशा मुलांकडे होणार दुर्लक्ष त्याचबरोबर संस्थेत उपलब्ध असणार्‍या सोयी आणि राबवले जाणारे निरनिराळे उपक्रम यांची त्यांनी माहिती करुन दिली.

230.JPG

संदीप खांबेटे( घारुआण्णा ) माहिती वाचताना :-
231.JPG

शाळेत मुलांनी केलेले किल्ले :-
233.JPG

व्यवस्थितपणा :- ( हे बघुन मला माझ कपाट आठवल्याशिवाय राहिल नाही )
239.JPG

तेथील मुलांनी केलेली वारली चित्र परदेशात सुद्धा विकली जातात , त्यातील काही चित्रे दाखवताना मुग्धा कुलकर्णी ( मुग्धानंद ) आणि संदीप खांबेटे ( घारुआण्णा )
270.JPG

तेथील मुलांची माहिती करुन देताना शिक्षक :-
234.JPG2.JPG253.JPG246.JPG242.JPG

सगळ्यात शेवटी मुलांबरोबर एक मायबोलीकरांचा फोटो :-
260.JPG

आणि त्या लहान मुलांनी त्यांच्या भाषेत व्यक्त केलेला आनंद :-
262.JPG
सर्व मायबोलीकरांना हा क्षण नक्कीच आनंद आणि एक छानशी आठवण देउन जाईल. Happy

पुन्हा पुढच्या वर्षी नवीन जोमाने नवीन संयोजकांबरोबर मायबोलीच्या सगळ्याच उपक्रमात आपणही सगळे सहाभागी व्हाल अशी आशा आहे. Happy

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशू + १.

हा अख्खा बाफ वाचता वाचता अंगावर रोमांच उभे राहिले.

टिशर्ट समितीचं अगदी मनापासून कौतुक!

मुग्धा,मधुरा,विनय, घारू तुम्ही प्रत्यक्ष जाऊन आलात आणि इथे हे सगळं शेअर केलंत त्याबद्दल धन्यवाद लोक्स

समितीचे अभिनंदन ,
विनय,आण्णा आणि मुग्धा , फोटो मधील मुलांच्या चेह-यावरचा आनंद बघून मन सुखावले,
धन्यवाद

Pages