सर्दीने बंद असलेले नाक

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 17 August, 2013 - 14:27

सर्दीने बंद असलेले नाक
जेव्हा कशाने उघडते
स्वर्गाचे दार उघड्ल्यागत
सुख जणू ते वाटते
मोकळ्या श्वासात
आपल्या नेहमीच्या
किती सुख असते
हे हि तेव्हाच कळते
नाक बंद झाल्यावर
श्वास घेता येत नाही
नीट झोपता येत नाही
धड बोलता येत नाही
शिंकून शिंकून जीवाचे
हाल काही संपत नाही
रुमालाचे काय करायचे
सदा संकट हाती राही
अश्यावेळी डॉक्टर वैद्य
खरे देवदूत वाटतात
छोट्या छोट्या गोळ्या
त्या संजीवनी ठरतात
हुळहुळलेले नाक मग
लाख लाख दुवे देते
ड्रावजीनेसचे संकटहि
अगदी छोटे वाटू लागते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर डॉक्टर काय मी सांगू
कसं मी सांगू
नुकताच मी भोगलाय वाहता त्रास
नाकास म्हणायचो बास आता बास
काय काय लावलं मी धरणफुटीला
झंडू बाम विक्स चोळले नाकाला
गळतीला जणू एमसील लागले
नाक वहायचे एकदाचे थांबले
नवाच त्रास मग कुठून उपटला
उजव्याडाव्या नाकात जाम लागला
काय सांगू कसं सांगू काय काय झालं
तुमच्या कवितेत ते सगळंच आलं
मग त्यातलं थोडं चहात घातलं (आलं)
खवखवणा-या घशास जरा शेकलं
पण खरं सांगतो ही सर्दी हटत नाही जरा
घरचा उपाय अशा रोगावर नाहीच बरा
पातळ घट्ट जेली अशी रूपं बदलत राहते
घरच्या उपायांनी सर्दी मुक्काम वाढवते
श्वास अडकला कि मग आठवते मरण
पडतं घ्या अशा वेळी जा वैद्यास शरण

अप्रतिम वैद्यकीय कविता
( इंजिनियरिंग / मेडीकलला अशा कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या तर रूक्षता कमी होईल का ?)

प्रत्येक नव्या गोष्टीस प्रस्थापितांकडून विरोध हा होणारच. नव्याचं स्वागत करून त्यात सकारात्मक काय आहे हे खरं तर पहायला हवं. सर्दीने बंद झालेलं नाक ही एक शास्त्रीय कविता आहे जिला सृजनशील (सर्जनशील) म्हणता येईल. सर्दी या अनुभवातून गेलेल्यालाच या कवितेतल्या भावोत्कटतेची अनुभूती घेता येऊ शकेल. या दृष्टीने ती सृजनशील तर सर्दी या विषयाचं शास्त्रीय सत्य मांडणारी कविता म्हणून ती सर्जनशील देखील आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढा या विषयावर अनेक कविता आल्या होत्या. सर्दी या विषयावरील कवितेस नाक मुरडण्याचं काहीच कारण दिसत नाही. सर्दीमुळे होणा-या कोंडमा-याचं चित्रण कवितेतून उत्तम प्रकारे होऊ शकेल. फक्त प्रेम, पाऊस या विषयांवरच कविता असावी का ? खरं तर प्रेम, आकर्षण या सर्वच गोष्टींकडे शास्त्रीय नजरेतून पाहील्यास सृजन / सर्जनास अधिक वाव मिळून साहीत्य आणि काव्यक्षेत्रात शास्त्रीय दृष्टीकोण येईल असे वाटते.

http://www.loksatta.com/chaturang-news/first-love-of-einstein-163946/

प्रेमावर कविता करणा-यांना शास्त्रीय माहिती उपलब्ध व्हावी या दृष्टीने वरची लिंक उपयुक्त ठरावी ही अपेक्षा.

Kiranu | आपली प्रतिसादातील कविता हि कविता सुरेखच आहे .आणि आपण मांडलेला विचार अभिनंदनीय आहे .
आदिती, पाषाणभेद अनेक धन्यवाद .रिया, बेफिकीर ...... Happy