अधांतरी

Submitted by मॄण्मयि on 16 August, 2013 - 06:51

बाभळीच्या काट्याचा ताज मी घातला
मनीच्या भावनांनचा न कळला त्यास कळवळा
झिजलेल्या त्याच्या पाऊलवाटेवर
अबोल मी चालत राहिले
परी न माझे मन त्यास कधि ऊमगले
त्याच्या सावलीच्या अंधारात
मी कधिच मिटुन गेले
श्वासातले श्वासांचे अंतर
कधिही न मिटले
मी अधांतरी आयुष्याचा
कोणता हा घेतला वसा
त्याच्यासमवेत असुनहि
सहन करते विरहाचा विष प्याला...

मृण्मयि

Group content visibility: 
Public - accessible to all site users