१६ ऑगस्ट

Submitted by सचिनकिनरे on 15 August, 2013 - 06:25

१६ ऑगस्ट

१६ ऑगस्ट्ला पाहतो आपले झेंडे,
केराच्या टोपलीत, अर्धे अर्धे चिरलेले.

दिसतात तेवढे उचलतो, जपून ठेवतो,
सगळेच दिसत नाहीत,
बघायची शक्तीही नसते.

म्हणतात बिचारे,
"प्रकाशाच्या वाटेचे वाटेकरी सारे",
अंधारात सारेच वाटमारे.

रंग अजुनही तसेच असतात,
शांततेचे, सुबत्ततेचे, सहिष्णूतेचे,
पण वेगवेगळे झालेले!
प्रत्येक जण, एक वेगळा रंग घेऊन बसलेला,
प्रत्येक रंग, एक जखम होऊन रुसलेला.
वर्षभरात, विसरुनही जातो त्याची जखम.
भरली असेल नक्कीच.
रंगही सांधले असतील कुणीतरी.

पुढील पंधरा ऑगस्ट्ला पुन्हा,
रंग खरोखरच सांधलेले असतात.
पण शहीदांच्या रक्ताने,
देशबांधवांच्या प्रेमाने,

आई अजुनही जिवंत असते,
मुलांचे रक्षण करायला.
छातीवरची शिवण लपवून,
हसायचे रंग आणते.
फक्त उद्यापर्यंत,

उद्या, पुन्हा फाटायचेच आहे.

सचिन किनरे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व उचलायचे, एकांत जागी न्यायचे आणि पुरायचे. जाळलेले देखील चालतात बहूदा. नक्की माहित नाही तपासावे लागेल. पुरताना / जाळताना राष्ट्रगीत म्हणायचे. Happy

जरा वि स्क ळी त पण बहुधा त्यामुळेच अतीशय परिणामकारकपणे महत्त्वाचे भाष्य करणारी कविता

आवडली