कधीही दूर जावे तू, कधीही जवळ यावे पण....

Submitted by सुशांत खुरसाले on 14 August, 2013 - 00:25

कधीही दूर जावे तू ,कधीही जवळ यावे पण..
जरासे ठेव सांभाळून माझे चोरलेले मन ..!

तसा शुद्धीत नाही मी,तसा बेशुध्दही नाही..
मला मग सावराया का इथे आलेत इतके जण.?

कितीही पेरणी झाली तरी नापीक मी आहे..
कुठे रे हरपला आहे तुझा तो 'अमृताचा घन!'

सुगंधाचा कशाला गोषवारा द्यायचा त्यांना..
कुरवाळीत बसती बाभळी जे समजुनी चंदन!

करमते का मला येथे? ,नको आता विचारू तू..
तुझ्या हातात आहे का फुलवणे येथ नंदनवन?

तुला आत्ता कळाले का?,तुझ्या नादात आहे मी..
कधीचे धडकते आहे तुझ्यासाठीच हे स्पंदन!

'सुशांता' वियदगंगेच्या तळ्यावर लहरतो सध्या..
तरी आनंदकंदाचा कधी विसरेल का तो क्षण?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंकु व अंजली जी तुम्ही "जादा" गाडीत बसला आहात
ही गाडी यार्डात जाते
बाकीचे प्रवासी आहेत तिथे जा

खुरसाले हे लेखन एडिट करून जादा झाले असल्याचे त्यात लिहा व रचणा उडवा ....हाच एक मार्ग व वाचकाना दुसर्‍या जागी जिथे ही आहे तिथली लिंक द्या संपादनातून