दुनियादारी - pdf version

Submitted by sacheen on 12 August, 2013 - 01:13

दुनियादारीचे pdf version कोणाकडे असल्यास शेअर करु शकाल का? धन्यवाद!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sacheen,
Duniyadari maayboli chya kharedi vibhagat upalabdha aahe. Pdf che vitaran ha pratadhikarabhanga ahe.

मायबोलीवरून 'दुनियादारी' खरेदी करण्यासाठी इथे पहा - http://kharedi.maayboli.com/shop/search.php?mode=search&page=1

सस्मित, मायबोली खरेदी विभाग - http://kharedi.maayboli.com/shop/home.php

याच पानावर खाली 'खरेदी' टॅगवर क्लिक केलंत की तुम्ही मायबोलीच्या खरेदी विभागात पोचाल.

धन्यवाद चिनुक्स,सस्मित्...जरुर खरेदी करेन

पत्ता दे>>>>>> आता जे काही द्यायचं घ्यायचं असेल ते भेटल्यावरच. एक पुस्तक हरवलय ते बास.

खरेदी विभागात चक्कर मारुन आले. ह्या सोपस्कारांपेक्शा २० मिनिटांचा वॉक घेउन आयडीयल मधुन घेउन यायचा विचार केलाय. दोन्ही फायद्याची कामं होतील. बघु कसं जमतय ते.

आगाऊ+१.

मायबोलीवर अनेक वेळा अनेकांनी या पुस्तकाबद्दल पॉझिटिव्ह लिहिलं होतं आणि चित्रपट बघण्यापूर्वी पुस्तक वाचायचंच होतं म्हणून खास विकत घेतलं. पण अगदीच अपेक्षाभंग झाला. सपक भाषा आणि सवंग कथानक. मध्ये मध्ये कायच्या काय इंग्रजी घुसडलं आहे. त्याकाळी तसंच बोलत असावेत असा एक अंदाज.

मायबोलीवर अनेक वेळा अनेकांनी या पुस्तकाबद्दल पॉझिटिव्ह लिहिलं होतं आणि चित्रपट बघण्यापूर्वी पुस्तक वाचायचंच होतं म्हणून खास विकत घेतलं. पण अगदीच अपेक्षाभंग झाला. सपक भाषा आणि सवंग कथानक. मध्ये मध्ये कायच्या काय इंग्रजी घुसडलं आहे. त्याकाळी तसंच बोलत असावेत असा एक अंदाज

होता है होता है.... माझे कोसला वाचायच्या आधी आणि वाचल्यानंतर अगदी असेच झाले होते. Happy आणि म्हणुन इथे दुनियादारीबद्दल इतके वाचुनही मी अजुन दुनियादारी वाचायची हिंमत केली नाहीय.

काही काही पुस्तके वाचायचे एक वय असते, त्या वयाच्या पुढे निघुन गेल्यानंतर जर ती पुस्तके वाचली तर तो परिणाम साधला जात नाही.

आगाऊ, सिंडरेला, साधना>>>>>सगळ्यांना प्रचंड अनुमोदन........!!!!
माझही हेच मत आहे.....फुकटची डोकेदुखी विकत घेतल्याचा मनस्ताप झाला हो मला. Sad

काही काही पुस्तके वाचायचे एक वय असते, त्या वयाच्या पुढे निघुन गेल्यानंतर जर ती पुस्तके वाचली तर तो परिणाम साधला जात नाही.
>>>
हं असच असेल कदाचित Happy
मला तर अजुन तरी हे पुस्तक प्रचंडच आवडतय Happy

सिंडरेला व अगाऊ यांना +१ दिलेला आहेच
मुळात सुशि नामक लेखकच एकंदरात वाचणेबल वाटले नाहीत, हेमावैम.

काही काही पुस्तके वाचायचे एक वय असते, त्या वयाच्या पुढे निघुन गेल्यानंतर जर ती पुस्तके वाचली तर तो परिणाम साधला जात नाही.+१

काही काही पुस्तके वाचायचे एक वय असते, त्या वयाच्या पुढे निघुन गेल्यानंतर जर ती पुस्तके वाचली तर तो परिणाम साधला जात नाही>>>+१

सुदैवाने पुलंची, वपुंची काही पुस्तके अजुनही मस्त वाटतात. Happy अजुनही काही असतीलच.

सुशींच पहिलच पुस्तक वाचलं.
"तो" नावाच. अरारा!!!!!!!!!
परत हात नाय लावला त्यांच्या पुस्तकाना.

मग एक मित्र फार मागे लागला म्हणुन हृदयस्पर्शी वाचलं.
ते त्यावेळी चांगल वाटलं होतं.

आता दुनियादारी वाचेन.
माबो मित्राने दिलय वाचायला.

काही काही पुस्तके वाचायचे एक वय असते, त्या वयाच्या पुढे निघुन गेल्यानंतर जर ती पुस्तके वाचली तर तो परिणाम साधला जात नाही>>>+१
नंतर वाचू हि नाहीत , आपल्याला असे काही खूप आवडले होते याचे आश्चर्य वाटत राहते. आपण बदललो की आपले जग बदलले की अजून काय बदलले काहीच कळत नाही . काही तरी हरवल्याची हुरहूर मात्र लागून राहते

एखादी गोष्ट आवडली नाही / नसली तर त्या गोष्टीची अगदी तीव्र बोचर्‍या शब्दात निंदा करणे हा येथील नियम वगैरे आहे का? दुनियादारी नाही आवडले तर नाही आवडले म्हणून लिहून मोकळे होता येईल की? त्या पुस्तकाचा आणि त्या दिवंगत लेखकाचा जाहीर अपमान केल्याशिवाय टेस्ट बड्स सॅटिस्फाय होत नसल्यासारखे का करायचे?

बेफ़िकीर +१
सर्वांना अगदी हौस फिटेपर्यंत वाद घालू शकतो ..पण पालथ्या घड्यावर पाणी ओतुन काही उपयोग नाही ..हे आजवरच्या आंजालावरच्या अनुभवावरून शिकलोय ..

कंड शमवून घेतात हो लोक्स . बाकी काही नाही ..दुर्लक्ष करायचं

आजच माबो भविष्य.

भक्त आणि ना भक्त लोकांमध्ये तुम्बळ वाकयुद्ध जुम्पेल.
मग ते चित्रपट प्रेमी असोत वा पुस्तकप्रेमी.

पुराव्यासाठी पहा चैनै एक्सप्रेस आणि दुनियादारी बाफ...

@Golden star ,

"वाईट मत म्हणजेच खरी का ? ज्या लोकांना पुस्तक आवडला आणि चित्रपट आवडला नाही " ती मते खरी नाही का?

मुद्दा चित्रपट चांगला आहे की नाही हा नाहिये ! ..मुद्दा हा आहे की हा चित्रपट दुनियादारी वर बनवला आहे अशी जाहीरात करून त्यांनी लोकांना उल्लु बनवले ..फसवणूक केली ..

आमिर खान ने ३ इडियट बनवताना स्पष्ट सांगितले होते , हा ५ पाँइट समवन वर आधारीत नाही ..त्यामुळे अपेक्षा भंग झालाच नाही ...एक पुर्णपणे वेगळी कलाकृती म्हणून बघितला गेला !

उद्या राधेय वर / मृत्यूंजय वर चित्रपट बनवून त्यात कर्ण हीरो म्हणून द्रौपदी मांडवातून त्याच्याबरोबर पळून जाते अस बदल दाखवाल का ? आणि दाखवण्यास प्रत्यवाय नाही ..ते अभिव्यक्ती स्वातंर्त्र्य आहेच..फक्त मग त्याला मूळ कादंबरीशी जोडू नका
====================================================================

कांदबरी बद्दल म्हणाल तर काही लोकांना आवडते आणि काही लोकांना नाही ..प्रत्येक कादंबरी प्रत्येकाला आवडते असा नाहिये .. भिक्कार म्हणा काही फरक पडत नाही ,,कारण आज वर खपलेल्या प्रती आणि आवृत्या यांचे आकडेच त्याला उत्तर आहेत ..
==================================================================
आवड / निवड
ही वैयक्तीक असते ..

"सहवेदना , किंवा रीलेट करणे " हा कोणत्याही मनुष्य प्राण्याच्या आवड निवडीचा एक महत्वाचा भाग आहे ..

एखादे मेडिकल वरचे पुस्तक त्या क्षेत्रामधल्या माणसांना प्रचंड आवडते .. पण बाकीच्यांना झेपेल असे नाही..
सासू सुनांच्या डेली सोप मागे हेच तत्व आहे ..त्या सीरीयल बरोबर महिला वर्ग रीलेट करतो ..

काहींना दुनियादारी संवंग वाटते ..काळानुरूप सवंगतेच्या व्याख्याही बदलतात ... तर कॉलेज कट्ट्यावर बसलेल्या पोरांना ती आपलीशी वाटते..

रॉक म्युझिक , हेवी मेटल म्युझिक हे शहरी तरूणांच्या मधे लोकप्रिय आहे..तर लोकसंगीत ग्रामीण भागात ..सुगम संगीत खुपच जणांना आवडता ..पण म्हणून दुसर्‍यां कलाकृतीला नावे ठेवताना ती का ठेवतो आहे याचे विवेचन हवे ..

तुम्ही " दुनियादारी" वर अक्षरश प्रत्येक धाग्यावर वाईट लिहित सुटलात. .वाचू नका ..पैसे वाया गेले ..घालवू नका ..खरे तर त्या पुस्तकामध्ये काय वाईट आहे , का वाचू नये ..याचे सविस्तर टिप्पण करता आले असते ..

खर तर तुम्हाला पुस्तक ना आवडो ..पण दुसर्यांना ते वाचू नका हे सांगणे चुकीचे आहे ,,सांगायचे असेल तर का वाचू नका हे मुद्देसूद सांगा ..

-----------------------------------------------------------------------------

मला काही बोल म्हणुन अक्षता घेऊन आले का मी तुझ्याकडे? >>>

नाही....मला वाटलं तुला माझ्याशी अजून वाद घालायचे आहेत. म्हणून मीचं सुरवात केली. Proud

@शाहीर :

१. पुस्तकातील टपोरी भाषा एकवेळ आपण सहन करू शकू सुद्धा पण त्यातल्या शिव्या? 'भेन्चोद, भाड्या' ह्या अत्यंत घाणेरड्या शिव्या सु.शिं. च्या पुस्तकात सातत्याने संवादांत दिसून येतात.

२. शिवाय कथेतील पात्र (मुख्य पात्र) श्रेयस हा त्याच्या भावनांशीसुद्धा प्रामाणिक नाही. कथेत श्रेयस प्रेम एकीवर, लाईन दुसरीवर आणि लग्न तिसरीबरोबरच करतो.

३. त्याची आई जर त्या M.K. वर प्रेम करत होती आणि त्याच्या शिवाय दुसऱ्याचा विचार देखील करणार नव्हती, तर कथेत तिच्या वर्तमानकाळात ती तिच्या कामाच्या ठिकाणच्या माणसाबरोबर असल्याचं का दाखवलेलं आहे?

कथेत शेवटी काही पात्र, जसे दिग्या, अश्क्या यांचे धागे दोरे सापडत नाहीत असे वाटते.

जेव्हा दुनियादारी अगदी नवीन होतं, तेव्हा वाचायचं वय होतं पण तेव्हा सुशी वाचणं हे डाऊनमार्केट समजलं जायचं.
तरीही सुशी वाचायचा प्रयत्न केलाच होता पण नाही जमलं! अजून चित्रपट पहायचा आहे. पाहू...............जमतं का!

काहीही म्हणा. मी सुशी पंखा हाये.:स्मित: दुनियादारी त्यावेळी अर्धवट वाचुन सोडलं कारण मला फिरोझ, अमर, दारा या कथा तुफान आवडायच्या आणी अजूनही त्यांची पारायणे करतेच. रोमँटीक कथा का कोण जाणे मला झेपत नाही, फक्त बरसात चांदण्यांची आवडले होते.

मधुरा सुशीच काय बर्‍याच जणांच्या लेखनात तुला शिवराळ भाषा सापडु शकेल, त्याकडे दुर्लक्ष करुन बाकी वाचत जा की. सुशीची म्हणून वाच, मस्त आहे.

आता इथे वाद घालायचा असेल तर मला दुनियादारी वाचावं लागेल शिवाय सिनेमाही पहावा लागेल. <<< असंच काही नाही. Proud

झकास, तुला वाटतंय का की आता दुनियादारी वाचायचं तुझ वय आहे, आँ? Proud

तुला वाटतंय का की आता दुनियादारी वाचायचं तुझ वय आहे, आँ?>>> काय मिस केलं त्यासाठी तरी वाचेनच. Happy

मलाही सुशींचं लिखाण त्या वयातही आवडलं नाही आणि आता तर नाहीच नाही. कंटाळा आला आहे, दुसरं काहीही वाचायला नाही अशा वेळेस डोकं बाजुला ठेवुन वाचण्यासाठी 'दुनियादारी' एकदा वाचायला ठीक आहे. विकत आणुन कलेक्शन मधे ठेवण्याएवढं मला काही ग्रेट वाटलं नाही.

Pages