अवघड गोष्ट

Submitted by डॉ अशोक on 11 August, 2013 - 09:08

*-------------------------*
अवघड गोष्ट
*-------------------------*
सोपे नसते..........................
पुन्हा झोपणे, स्वप्नात तिला बघितल्यावर
हवे-हवे ते तिथे, पुन्हा-पुन्हा केल्यावर !
*
सोपे नसते..........................
तिला पहाणे, सन्मुख असतांना
नजर खाली, बोटांनी जमीन उकरतांना !
*
सोपे नसते..........................
गूज मनीचे पहिल्यांदा, तिला सांगतांना
सांगावे की नकोच आता, हेच ठरवतांना !
*
सोपे नसते..........................
तिला सावरणे, अश्रू ढाळतांना
कशास अश्रू, कळलेले नसतांना !
*
सोपे नसते..........................
सावरणे, कोसळत्या बटांना
मधे मोगरा, केसातून सुटतांना !
*
सोपे नसते..........................
भांडून मग, जवळ येतांना
थोडे हरतांना, थोडे जिंकतांना !
*
सोपे नसते..........................
अनपेक्षितसा, नकार तिचा घेतांना
घेवून मग वर्षांनी, पुन्हा तिला बघतांना !

-अशोक
११/०८/२०१३

Group content visibility: 
Public - accessible to all site users